मुंबई, २१ डिसेंबर २०२५: विजय सेल्स ही भारतातील प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स ओम्नीचॅनेल रिटेल साखळी २०२५ मधील सर्वात उत्साहवर्धक टेक इव्हेण्ट ‘आयआयसीएफ कंझ्युमर एक्स्पो’सह परतले आहेत. विजय सेल्स २३ डिसेंबर २०२५ ते ५ जानेवारी २०२६ पर्यंत बीकेसीमधील एमएमआरडीए ग्राऊंड्स येथे मुंबईतील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शनाचे आयोजन करण्यास सज्ज आहे.
विशाल ६०,००० चौरस फूट जागेवर आयोजित करण्यात येणाऱ्या या १४ दिवसीय इलेक्ट्रॉनिक्स शॉपिंग फेस्टिवलमध्ये विविध श्रेणींमधील १०० हून अधिक टॉप ब्रँड्स पाहायला मिळतील. हा इव्हेण्ट सर्वोत्तम अनुभवासाठी डिझाइन करण्यात आला आहे, जेथे सुट्टीच्या हंगामामधील उत्साहासह ग्राहक एकाच छताखाली इलेक्ट्रॉनिक्सच्या सर्वात मोठ्या प्रदर्शनाचा आनंद घेतील.
अभ्यागत उत्सावर्धक उत्पादन लाँचेस, लाइव्ह प्रात्यक्षिके आणि अॅप्पल, सॅमसंग, एलजी, सोनी, वनप्लस, बोट, हायर, व्हर्लपूल, असुस, हिताची, गोदरेज, आयएफबी, मॉर्फी रिकार्डस, फिलिप्स, वंडरशेफ, एओ स्मित अशा विश्वसनीय जागतिक व देशांतर्गत टेक प्रमुखांच्या विशेष ऑफर्स पाहू शकतात. नवीन स्मार्टफोन्स व एआय-सक्षम गॅझेट्सपासून प्रीमियम होम अप्लायन्सेस व स्मार्ट किचन सोल्यूशन्सपर्यंत प्रत्येक डिवाईस सर्वांचे लक्ष वेधून घेईल.
प्रत्येक प्रमुख स्वत:चे समर्पित एक्स्पीरिअन्स झोन तयार करण्यासह हे प्रदर्शन ग्राहकांना खरेदीपूर्वी प्रत्यक्ष अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची संधी देते.
या प्रदर्शनाबाबत मत व्यक्त करत *विजय सेल्सचे संचालक श्री. निलेश गुप्ता* म्हणाले, ”हे प्रदर्शन नाविन्यतेचे साजरीकरण, अनेक शक्यतांचे सादरीकरण आणि बहुमूल्य ग्राहकांकरिता नवीन गॅझेट्सचा शोध घेण्यासाठी संधी आहे. आम्ही त्यांना सर्वोत्तम टेक बँड्सचे नवीन लाँचेस आणि विविध ऑफरिंग्जचा अनुभव व आनंद देण्यासाठी हा इव्हेण्ट डिझाइन केला आहे. २०२५ चा निरोप घेत असताना विजय सेल्समध्ये आम्ही सर्वांना या टेक महोत्सवामध्ये सामील होण्याचे आणि प्रत्यक्ष भावी इलेक्ट्रॉनिक्सचा अनुभव घेण्याचे आवाहन करतो.”
ग्राहक त्यांच्या खरेदीवर विशेष त्वरित बँक सूट व कॅशबॅकचा देखील लाभ घेऊ शकतात, ज्यामधून त्यांना यंदा सणासुदीच्या काळादरम्यान त्यांच्या पैशांचे उत्तम मूल्य मिळेल. मायव्हीएस लॉयल्टी प्रोग्राम ग्राहकांना बचत वाढवण्यास मदत करतो, जेथे स्टोअर्समध्ये शॉपिंगवर ०.७५ टक्के लॉयल्टी पॉइण्ट्स देतो. मिळालेला प्रत्येक पॉइण्ट रिडम्प्शनच्या वेळी एक रूपयाएवढा आहे.
यंदाचा अनुभव अधिक उत्साहवर्धक करण्यासाठी विजय सेल्स प्रदर्शनामध्ये भेट देणाऱ्या सर्व अभ्यागतांना विशेष अतिरिक्त फायदे देणार आहे. अभ्यागतांना इक्सिगोकडून १,००० रूपयांचे फ्लाइट व १,००० रूपयांचे हॉटेल वाऊचर मिळेल, ज्यासह ते त्यांच्या उत्साहवर्धक प्रवासाचे नियोजन करू शकतात. तसेच, अभ्यागतांना २५० रूपयांचे मायव्हीएस रिवॉर्ड्स लॉयल्टी पॉइण्ट्स मिळतील, ज्यासाठी त्यांना प्रदर्शनामध्ये दाखवण्यात आलेला क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल.
पेपर फायनान्स पर्यायांचा वापर करत व्यवहार करणाऱ्या अभ्यागतांना बजाज फिनसर्व्ह, आयडीएफसी बँक आणि एचडीबी फायनान्सकडून मोफत गिफ्ट्स मिळतील. तसेच ब्रँड ईएमआयच्या माध्यमातून किंवा पेटीएम पीओएसद्वारे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड्सचा वापर करत फुल स्वादइपच्या माध्यमातून २५,००० रूपये व त्यापेक्षा अधिक किमतीपर्यंत खरेदी करणारे ग्राहक १,००० रूपयांच्या पेटीएम फ्लाइट वाऊचर किंवा मूव्ही वाऊचरसाठी पात्र ठरतील.
तर मग, इलेक्ट्रॉनिक्स एक्झिबिशन २०२५ मध्ये स्पेशल इव्हेण्ट किमतींमध्ये सर्वोत्तम गॅझेट्स खरेदी करण्याची ही संधी चुकवू नका. तारखांची नोंद करून ठेवा आणि शहरातील सर्वात मोठ्या, उत्साहवर्धक टेक प्रदर्शनाचा आनंद घेण्यास सज्ज राहा.
टॉप बँकांकडून विद्यमान त्वरित सूट ऑफर्स
एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डधारक ७,५०० रूपये व त्यापेक्षा अधिक ईएमआय व्यवहारांवर जवळपास ७,५०० रूपयांच्या त्वरित सूटचा आनंद घेऊ शकतात. अमेरिकन एक्स्प्रेस क्रेडिट कार्डधारक २५,००० रूपयांपेक्षा अधिक ईएमआय व्यवहारांवर १५,००० रूपयांच्या त्वरित सूटचा आनंद घेऊ शकतात. आयसीआयसीआय कार्डधारक क्रेडिट व डेबिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर जवळपास १५,००० रूपये त्वरित सूटचा आणि २५,००० रूपये व त्यापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड नॉन-ईएमआय व्यवहारांवर जवळपास १२,५०० रूपयांच्या त्वरित सूटचा आनंद घेऊ शकतात. एचएसबीसी बॅाक कार्डधारक संपूर्ण आठवडा २०,००० रूपये व त्यापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर जवळपास ७,५०० रूपयांच्या त्वरित सूटचा आणि शनिवारी व रविवारी २०,००० रूपये व त्यापेक्षा अधिक क्रेडिट व डेबिट कार्ड नॉन-ईएमआय व्यवहारांवर जवळपास ६,००० रूपयांच्या त्वरित सूटचा आनंद घेऊ शकतात. आरबीएल बँक क्रेडिट कार्डधारक १५,००० रूपये व त्यापेक्षा अधिक ईएमआय व्यवहारांवर जवळपास ४,००० रूपयांच्या त्वरित सूटचा आनंद घेऊ शकतात. वनकार्ड क्रेडिट कार्डधारक १५,००० रूपये व त्यापेक्षा अधिक ईएमआय व्यवहारांवर जवळपास २०,००० रूपयांच्या त्वरित सूटचा आनंद घेऊ शकतात. आयडीएफसी फर्स्ट बँक क्रेडिट कार्डधारकांना ५,००० रूपये व त्यापेक्षा अधिक ईएमआय व्यवहारांवर जवळपास १०,००० रूपयांची म्हणजेच ५ टक्के त्वरित सूट मिळू शकते. एयू स्मॉल फायनान्स बँक क्रेडिट कार्डधारक १०,००० रूपयांपेक्षा अधिक नॉन-ईएमआय व्यवहारांवर जवळपास १,००० रूपयांची म्हणजेच ५ टक्के त्वरित सूटचा आणि फक्त रविवारी १००,००० रूपयांपेक्षा अधिक नॉन-ईएमआय व्यवहारांवर ३,००० रूपयांच्या त्वरित सूटचा लाभ घेऊ शकतात. येस बँक क्रेडिट कार्डधारकांना १०,००० रूपयांपेक्षा अधिक ईएमआय व्यवहारांवर जवळपास २,५०० रूपयांची ५ टक्के त्वरित सूट मिळू शकते.
बॉबकार्डधारकांना ७,५०० रूपये व त्यापेक्षा अधिक बॉबकार्ड ईएमआयवर जवळपास ३,००० रूपयांची म्हणजे १० टक्के त्वरित सूट मिळू शकते. पीएनबी बँक क्रेडिट कार्डधारकांना फक्त स्टोअर्स व प्रदर्शनामध्ये १५,००० रूपये व त्यापेक्षा अधिक ईएमआय व्यवहारांवर जवळपास ५,००० रूपयांची म्हणजेच १० टक्के त्वरित सूट मिळू शकते. डीबीएस बँक क्रेडिट कार्डधारक ईमएआय व्यवहारांवर जवळपास ३,००० रूपयांच्या त्वरित सूटचा आणि १५,००० रूपये व त्यापेक्षा अधिक नॉन-ईएमआय व्यवहारांवर जवळपास १,५०० रूपयांच्या त्वरित सूटचा लाभ घेऊ शकतात.

