मिरे अॅसेट निफ्टी एनर्जी ईटीएफ आणि मिरे अॅसेट निफ्टी स्मॉलकॅप २५० ईटीएफचा गुंतवणूकदारांना भारतातील सर्वसमावेशक ऊर्जा परिसंस्थेचा, तसेच वैविध्यपूर्ण स्मॉल-कॅप वाढीचा अनुभव देण्याचा मनसुबा आहे.
मिरे अॅसेट निफ्टी एनर्जी ईटीएफ भारतातील संपूर्ण ऊर्जा मूल्य साखळी: हायड्रोकार्बन्स, वीज आणि अक्षय ऊर्जा इत्यादींमध्ये वैविध्यपूर्ण अनुभव देण्याचा प्रयत्न करते.
लाँच करण्यात आलेले मिरे अॅसेट निफ्टी स्मॉलकॅप २५० ईटीएफ मिरे अॅसेटच्या व्यापक मार्केट-कॅप ईटीएफच्या श्रेणीला अधिक मजबूत करते, ज्यामध्ये सध्या निफ्टी ५०, निफ्टी नेक्स्ट ५० आणि निफ्टी मिडकॅप १५० निर्देशांकांचा मागोवा घेणाऱ्या ऑफरिंग समाविष्ट आहेत.
मुंबई, ऑक्टोबर 31, 2025: मिरे अॅसेट इन्वेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रा. लि.ने दोन न्यू फंड ऑफर्स (एनएफओ)च्या लाँचची घोषणा केली आहे: मिरे अॅसेट निफ्टी एनर्जी ईटीएफ (निफ्टी एनर्जी टोटल रिटर्न इंडेक्सचा मागोवा घेणारी ओपन-एंडेड इक्विटी स्कीम) आणि मिरे अॅसेट निफ्टी स्मॉलकॅप २५० ईटीएफ (निफ्टी स्मॉलकॅप २५० टोटल रिटर्न इंडेक्सचा मागोवा घेणारी ओपन-एंडेड स्कीम). ही उत्पादने पारदर्शक, नियम-आधारित आणि तुलनेने कमी किमतीच्या रचनेद्वारे गुंतवणूकदारांना वैविध्यपूर्ण अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेली आहेत.
मिरे अॅसेट निफ्टी एनर्जी ईटीएफचा गुंतवणूकदारांना भारतातील सर्वसमावेशक ऊर्जा परिसंस्था उपलब्ध करून देण्याचा मनसुबा आहे, ज्यामध्ये पारंपारिक हायड्रोकार्बन्स, वीज सुविधा आणि आधुनिक अक्षय ऊर्जा इत्यादींचा समावेश आहे. निफ्टी एनर्जी इंडेक्समध्ये तेल व वायू, ऊर्जा व भांडवली वस्तू क्षेत्रांचा समावेश आहे, ज्यामधून हायड्रोकार्बन्स, युटिलिटीज आणि शुद्ध ऊर्जा उपकरण उत्पादनामधील सहभाग दिसून येतो.
हा इंडेक्स (निर्देशांक) संतुलित रचना राखतो, ज्यामध्ये ५० टक्के वाटप तेल, वायू व उपभोग्य इंधनांसाठी, २५ टक्के वीजेसाठी आणि २५ टक्के भांडवली वस्तूंसाठी केले जाते, ज्यामध्ये भारताच्या ऊर्जा परिवर्तनाचे वारसायुक्त ऊर्जा उत्पादक आणि पायाभूत सुविधा सक्षमकर्त्यांचा समावेश आहे.
मिरे अॅसेट निफ्टी एनर्जी ईटीएफचा स्थिरता व चक्रीयतेचे धोरणात्मक संयोजन देण्याचा मनसुबा आहे, ज्यामध्ये युटिलिटीजमधून मिळणारे स्थिर उत्पन्न आणि तेल, वायू व वस्तूशी संबंधित कंपन्यांकडून चक्रीय वाढीचा समावेश आहे. रणनीतिक गुंतवणूकदार जागतिक कमोडिटी आणि चीनच्या सुधारणा चक्रावर मत व्यक्त करण्यासाठी देखील या ईटीएफचा वापर करू शकतात, तर दीर्घकालीन गुंतवणूकदार भारतातील रचनात्मक वीज व ऊर्जा पायाभूत सुविधेच्या निर्माणासाठी या ईटीएफकडे पूरक पैलू म्हणून पाहू शकतात. मिरे अॅसेट निफ्टी मेटल ईटीएफसोबत सहयोगाने मिरे अॅसेट निफ्टी एनर्जी ईटीएफचा गुंतवणूकदारांना पारदर्शक व किफायतशीर रचनेच्या माध्यमातून भारतातील कमोडिटी व औद्योगिक अपसायकल उपलब्ध करून देण्यासाठी सर्वसमावेशक मार्ग देण्याचा मनसुबा आहे.
मिरे अॅसेट निफ्टी स्मॉलकॅप २५० ईटीएफचा गुंतवणूकदारांना एकच, वैविध्यपूर्ण वेईकलच्या माध्यमातून भारतातील गतीशील स्मॉल-कॅप श्रेणीचा किफायतशीर अनुभव देण्याचा उद्देश आहे. निफ्टी स्मॉलकॅप २५० इंडेक्स निफ्टी ५०० विश्वात पूर्ण बाजार भांडवलीकरणानुसार २५१ ते ५०० क्रमांकावर असलेल्या २५० कंपन्यांचे प्रतिनिधीत्व करतो आणि भारताच्या उदयोन्मुख विकासगाथांचा कणा असलेल्या लघु-भांडवलीकरण कंपन्यांच्या कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी डिझाइन केलेला आहे.
या लाँचसह, मिरे अॅसेट भारतातील काही अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांपैकी एक बनली आहे, जी निफ्टी ५०, निफ्टी नेक्स्ट ५०, निफ्टी मिडकॅप १५० आणि निफ्टी स्मॉलकॅप २५० या चारही मुलभूत मार्केट-कॅप श्रेणीमध्ये ईटीएफ ऑफर करते, तसेच निफ्टी ५०० मल्टीकॅप ५०:२५:२५ निर्देशांक देखील प्रदान करते, ज्यामुळे बाजारपेठ भांडवलीकरण क्षेत्रामध्ये संपूर्ण कव्हरेज शक्य होते. याव्यतिरिक्त, मिरे अॅसेट आधीच निफ्टी स्मॉलकॅप २५० मोमेंटम क्वॉलिटी १०० ईटीएफ प्रदान करते, जी एकाच विश्वातून तयार केलेले स्मार्ट-बीटा धोरण आहे, जे मुलभूत आणि फॅक्टर-आधारित गुंतवणूकांमध्ये वैविध्यपूर्ण, पारदर्शक व विकासात्मक निष्क्रिय उपाययोजना तयार करण्यात एएमसीच्या नेतृत्वाला बळकटी देते. मिरे अॅसेट निफ्टी स्मॉलकॅप २५० ईटीएफ लाँच करत मिरे अॅसेट स्मॉल-कॅप श्रेणीमध्ये मार्केट-कॅप आणि स्मार्ट-बीटा एक्स्पोजरचा समावेश असलेली ईटीएफ ऑफर करणारी पहिली एएमसी बनली आहे, ज्याला पूरक लाँच करण्यात आलेला सक्रियपणे व्यवस्थापित स्मॉल-कॅप फंड आहे.
दोन्ही फंडसाठी न्यू फंड ऑफर (एनफओ) सबस्क्रिप्शनसाठी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरू होईल आणि ४ नोव्हेंबर २०२५ रोजी बंद होईल. या योजना १० नोव्हेंबर २०२५ रोजी पुन्हा सुरू होतील. एनएफओदरम्यान किमान सुरूवातीची गुंतवणूक ५,००० रूपये आहे आणि १ रूपयाच्या पटीत आहे.
मिरे अॅसेट निफ्टी एनर्जी ईटीएफचे व्यवस्थापन श्रीमती एकता गाला आणि श्री. अक्षय उदेशी संयुक्तपणे करतील, तर मिरे अॅसेट निफ्टी स्मॉलकॅप २५० ईटीएफचे व्यवस्थापन श्रीमती एकता गाला आणि श्री. रितेश पटेल संयुक्तपणे करतील. ”हे ईटीएफ भारतीय इक्विटी बाजारपेठेच्या दोन प्रमुख विभागांमध्ये आमची उत्पादन क्षमता अधिक मजबूत करतात. मिरे अॅसेट निफ्टी एनर्जी ईटीएफ भारतातील ऊर्जा क्षेत्राच्या संपूर्ण मूल्य साखळीचा वैविध्यपूर्ण अनुभव देते, तर मिरे अॅसेट निफ्टी स्मॉलकॅप २५० ईटीएफ स्मॉल-कॅप कंपन्यांना निफ्टी ५०० विश्वातील व्यापक कव्हरेज देते. दोन्ही ईटीएफ गुंतवणूकदारांना त्यांच्या संबंधित विभागांमध्ये कार्यक्षमतेने रणनीतिक भूमिका घेण्यास किंवा बाजारपेठेतील दोन महत्त्वाच्या विभागांमध्ये दीर्घकालीन, कमी किमतीचे आणि वैविध्यपूर्ण निष्क्रिय एक्सपोजर तयार करण्यास सक्षम करतात,” असे मिरे अॅसेट इन्वेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया)चे ईटीएफ प्रॉडक्ट्सचे प्रमुख व फंड मॅनेजर सिद्धार्थ श्रीवास्तव म्हणाले.
सर्व डेटाचा स्रोत: मिरे अॅसेट इंटर्नल रिसर्च, एनएसई इंडेक्सेस; ३० सप्टेंबर २०२५ रोजीचा डेटा.

