maharashtraprimenews
ठळक बातम्या
generalPublic Interest

कृष्णाज फ्रीडम टॉक्स’; खरी ‘स्वातंत्र्याचे संदेश’ स्वातंत्र्यदिन व जन्माष्टमीच्या संयोगाने प्रकाशित

मुंबई, 15ऑगस्ट 2025*: यावर्षी जन्माष्टमी व स्वातंत्र्यदिन हे दोन्ही एकाच दिवशी येत असल्याने, श्री जयेश राठोड यांच्या संकलनातून ‘कृष्णाज् फ्रीडम टॉक्स’ या नावाचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून, यामधून जनतेपर्यंत ‘खऱ्या स्वातंत्र्याचा’ संदेश पोहोचविण्याचा उद्देश आहे. जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला, जुहू येथील श्री राठोड यांच्या निवासस्थानी आयोजित विशेष जन्माष्टमी व स्वातंत्र्यदिन सोहळ्यात या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

जन्माष्टमीच्या शुभदिनी, डर्बनस्थित भारतीय वंशाच्या तरुण कलाकार विशाल मोतीलाल यांनी रेखाटलेल्या श्रीनाथजींच्या अप्रतिम चित्राचे देखील अनावरण करण्यात आले. भारतीय देवी-देवतांची वैशिष्ट्यपूर्ण चित्रे साकारण्याची ओढ असलेल्या विशाल यांच्या या चित्राने सोहळ्यास एक वेगळी शोभा आणली.

‘कृष्णाज् फ्रीडम टॉक्स’ या पुस्तकात भगवद्गीतेतील निवडक श्लोकांचा समावेश असून, ते विविध प्रकारच्या ‘त्याग’ किंवा ‘बलिदानां’बाबत मार्गदर्शन करतात, ज्यायोगे खरी स्वातंत्र्यप्राप्ती होते. भारतातील प्रत्येक नागरिकाने हे अंगीकारणे गरजेचे आहे, जेणेकरून आपण एक राष्ट्र म्हणून उभे राहून संपूर्ण मानवजातीचे कल्याण साधू शकू.

या अनोख्या संकल्पनेविषयी बोलताना, *भगवान श्रीकृष्णाचे भक्त श्री जयेश राठोड* म्हणाले, _“स्वातंत्र्यदिन हा परकीय सत्तेच्या जोखडातून आपल्या देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा उत्सव असतो, तर जन्माष्टमी ही भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेतून दिलेल्या ‘मोक्ष’ किंवा ‘मुक्ती’च्या शिकवणीचा उत्सव असतो. मी या दोन्ही उत्सवातील हा विरोधाभास दाखवण्याचा प्रयत्न केला असून, भगवद्गीतेतील ‘स्वातंत्र्य’ दर्शविणारे श्लोक मांडून लोकांमध्ये स्वातंत्र्य, स्वतंत्रता आणि मुक्ति यांचा खरा अर्थ व सार समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे.”_

*श्रीनाथजींचे चित्र सादर करताना विशाल मोथीलाल* म्हणाले, _“एक कलाकार म्हणून, मी ज्या समृद्ध हिंदू संस्कृतीचा भाग आहे, ती मला अत्यंत भावते. दक्षिण आफ्रिकेत वाढत असताना, माझा हिंदू शास्त्र, देव-देवतांशी एक खोल संबंध निर्माण झाला. जन्माष्टमीच्या या दिवशी, भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणी उजागर करण्यासाठी श्रीनाथजींचे चित्र साकारण्याचा मला सन्मान मिळाला. माझी चित्रे ही माझ्या कल्पनाशक्तीची अभिव्यक्ती असून, त्यातून आध्यात्मिक संदेश देणे व जीवनाला उद्देशपूर्ण करण्याची प्रेरणा देणे हा हेतू असतो.”_

डर्बन येथे जन्मलेल्या, उत्तर प्रदेश व बिहार या मूळगावी असलेल्या भारतीय वंशाच्या कुटुंबातील विशाल यांच्या कुटुंबाला दक्षिण आफ्रिकेत तीन पिढ्या झाल्या आहेत. वयाच्या चौथ्या वर्षीच त्यांची कला प्रवासाला सुरुवात झाली. औपचारिक प्रशिक्षण न घेताही, त्यांच्या नैसर्गिक प्रतिभेने चांगली उंची गाठली. डर्बन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी येथून वास्तुकलेची पदवी घेतल्यानंतर, त्यांनी आपल्या व्यवसायाबरोबर भक्तिपूर्ण चित्रकलेची आवड जोपासली.

विशाल यांच्या शिव-पार्वती, श्रीनाथजी, भगवान कृष्ण, देवी लक्ष्मी व सरस्वती, माँ दुर्गा आणि सीता यांच्या चित्रांना त्यांच्या शांत व प्रसन्न भावमुद्रांसाठी ओळखले जाते. उदाहरणार्थ, देवी दुर्गा महिषासुराचा वध करताना त्यांनी रागीट रूपाऐवजी शांत व संयत भावाने चित्रित केली आहे.

Related posts

रिषभ पंतच्‍या गाथेने सुरक्षित भविष्‍यासाठी एचडीएफसी लाइफची नवीन मोहिम लाँच

Shivani Shetty

सणासुदीच्या काळात भारतातच पर्यटनाचा आनंद घेण्‍याची भारतीयांची इच्‍छा: कायक

Shivani Shetty

बिट्स पिलानीचे ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील अभ्यासक्रम परिवर्तनशील

Shivani Shetty

Leave a Comment