maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

कायनेटिक ग्रीनचे जागतिक विस्‍तारीकरणाचे लक्ष्‍य; मोबिलिटी अँड इंटरनॅशनल बिझनेसचे अध्‍यक्ष म्‍हणून सुधांशू अग्रवाल यांची नियुक्‍ती केली

२४ मार्च २०२५: कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्‍यूशन्‍स लिमिटेड या भारताील इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकींच्‍या आघाडीच्‍या उत्‍पादक कंपनीला मोबिलिटी अँड इंटरनॅशनल बिझनेसचे अध्‍यक्ष म्‍हणून श्री. सुधांशू अग्रवाल यांच्‍या नियुक्‍तीची घोषणा करताना आनंद होत आहे. ऑटोमोटिव्‍ह क्षेत्रात देशांतर्गत व आंतरराष्‍ट्रीय व्‍यवसायामध्‍ये दोन दशकांहून अधिक काळाचा संपन्‍न अनुभव असलेले श्री. अग्रवाल धोरणात्‍मक नेतृत्‍व, व्‍यवसाय विकास, विस्‍तारीकरण आणि गतीशीलता सोल्‍यूशन्‍समध्‍ये कुशल आहेत. त्‍यांची नियुक्‍ती मोठी उपलब्‍धी आहे, जेथे ते दोन नवीन उच्‍च क्षमता असलेली क्षेत्रे – लास्‍ट माइल सोल्‍यूशन्‍सकरिता ईव्हींची निर्यात व तैनातीमध्‍ये विकासाच्‍या कंपनीच्‍या पुढील टप्‍प्‍याला चालना देण्‍यास सज्‍ज आहेत. भारतातील या दोन्‍ही क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे, ज्‍याचे श्रेय भारतामधील झपाट्याने विकसित होत असलेल्‍या गतीशीलता क्षेत्रातील ईकॉमर्स व क्विक कॉमर्स नेतृत्वित होम डिलिव्‍हरी सेगमेंटमधील अपवादात्‍मक वाढीला जाते.

श्री. अग्रवाल महत्त्वाच्‍या टप्‍प्‍यावर कायनेटिक ग्रीनमध्‍ये सामील झाले आहेत, जेथे कंपनीने विकासाच्‍या गतीशील टप्‍प्‍याला सुरूवात केली आहे. श्री. अग्रवाल यांचे नेतृत्‍व असलेला विभाग लास्‍ट-माइल लॉजिस्टिक्‍स आणि क्विक-कॉमर्स डिलिव्‍हरीमध्‍ये परिवर्तन घडवून आणण्‍यासाठी महत्त्वाचा आहे, ज्‍यामुळे आघाडीच्‍या ई-कॉमर्स, क्विक कॉमर्स आणि संस्‍थात्‍मक कंपन्‍यांच्‍या गरजांची पूर्तता होईल. कमी कार्यसंचालन खर्च व शाश्‍वत फायद्यांमुळे ईव्‍हींसाठी मागणी वाढत असताना कायनेटिक ग्रीन व्‍यापक अवलंबनाला गती देण्‍यासाठी उत्तमरित्‍या सुसज्‍ज आहे. कंपनीची लास्‍ट-माइल गतीशीलतेसाठी उद्देशरित्‍या निर्माण केलेली ई-लुना, तसेच कंपनीचा प्रबळ तीन-चाकी कार्गो सेगमेंट पोर्टफोलिओ या विस्‍तारीकरणाला प्रबळ करत आहे, ज्‍यामुळे पुरवठा साखळी व्‍यवस्‍थापन, ई-कॉमर्स आणि निर्यातींमधील कंपनीची उपस्थिती अधिक दृढ होत आहे.

‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत प्रबळ देशांपर्यंत पाया निर्माण करत कायनेटिक ग्रीन आता आपल्‍या जागतिक महत्त्वाकाक्षांना पुढे घेऊन जात आहे. कंपनी दक्षिण आशिया, आग्‍नेय आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका अशा प्रमुख आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठांमध्‍ये धोरणात्‍मकरित्‍या विस्‍तार करत आहे. दुचाकी व तीनचाकी क्षेत्रांमधील उल्‍लेखनीय कौशल्‍य, तसेच व्‍यापक जागतिक अनुभवासह श्री. सुधांशू अग्रवाल या विस्‍तारीकरणाला गती देण्‍यासाठी उत्तमरित्‍या सज्‍ज आहेत, ज्‍यामुळे कायनेटिक ग्रीन जगभरातील शाश्‍वत गतीशीलतेमध्‍ये अग्रस्‍थानी पोहोचेल.

टीममध्‍ये त्‍यांचे स्‍वागत करत कायनेटिक ग्रीनच्‍या संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती सुलज्‍जा फिरोदिया मोटवानी म्‍हणाल्‍या, ”आम्‍हाला आमच्‍या परिवर्तनाच्‍या या टप्‍प्‍यामध्‍ये श्री. सुधांशू अग्रवाल कायनेटिक ग्रीनमध्‍ये सामील होण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही शाश्‍वत गतीशीलतेमधील आमच्‍या नेतृत्‍वाला गती देत असताना जागतिक व्‍यवसाय विस्‍तारीकरण व धोरणात्‍मक विकासामध्‍ये त्‍यांना असलेला व्‍यापक अनुभव बहुमूल्‍य ठरेल. त्‍यांच्‍या कौशल्‍यासह आम्‍ही आमची उद्योग-ते-उद्योग व निर्यात उपस्थिती वाढवण्‍यास, हरित गतीशीलतेमधील नाविन्‍यतेमध्‍ये अगस्‍थानी असण्‍यास आणि देशांतर्गत व आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठांमध्‍ये अनपेक्षित यश संपादित करण्‍यास उत्तमरित्‍या सुसज्‍ज आहोत. त्‍यांचे नेतृत्‍व हरित परिवहनाच्‍या भविष्‍याला आकार देण्‍यामध्‍ये आणि शुद्ध, हरित भविष्‍याप्रती आमची कटिबद्धता दृढ करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावेल.”

या नवीन पदभारासाठी आपला आनंद व्‍यक्‍त करत श्री. सुधांशू अग्रवाल म्‍हणाले, ”मला कायनेटिक ग्रीनमध्‍ये त्‍यांच्‍या प्रवासाच्‍या अशा महत्त्वपूर्ण टप्प्‍यादरम्‍यान सामील होण्‍याचा आनंद होत आहे. कंपनी भारतातील शाश्‍वत गतीशीलतेला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍यासोबत जागतिक स्‍तरावर अर्थपूर्ण प्रभाव घडवून आणत आहे. त्‍यांचा नाविन्‍यतेचा प्रबळ वारसा आणि भविष्‍यासाठी उत्तम दृष्टिकोनासह मी लीडरशीप टीमसोबत सहयोग करून व्‍यवसाय विस्‍तारीकरणाला गती देण्‍यास, सखोल बाजारपेठ संबंध स्‍थापित करण्‍यास आणि जगभरात शुद्ध गतीशीलता सोल्‍यूशन्‍सच्‍या अवलंबतेला गती देण्‍यास उत्‍सुक आहे. सहयोगाने आम्‍ही भविष्‍याला आकार देऊ शकतो, जे हरित असण्‍यासोबत अधिक शाश्‍वत असेल, ज्‍यामधून भावी पिढ्यांसाठी आरोग्‍यदायी पर्यावरणाची खात्री मिळेल.”

सुधांशू अग्रवाल अनुभवी ऑटोमोबाइल उद्योग प्रमुख असण्‍यासोबत व्‍यवसाय विस्‍तारीकरण, धोरणात्‍मक सहयोग आणि जागतिक बाजारपेठ विकासामध्‍ये कुशल आहेत. अगदी नुकतेच, व्‍ही ट्रेड विंग्‍ज प्रा. लि. येथे चीफ बिझनेस ऑफिसर म्‍हणून त्‍यांनी झपाट्याने आंतरराष्‍ट्रीय विस्‍तारीकरणाला गती दिली. यापूर्वी, पियाजिओ वेईकल्‍स प्रा. लि.मध्‍ये इलेक्ट्रिक वेईकल्‍स अँड इंटरनॅशनल बिझनेसचे कार्यकारी उपाध्‍यक्ष व व्‍यवसाय प्रमुख म्‍हणून त्‍यांनी विक्री, विपणन व व्‍यवसाय विकासाचे नेतृत्‍व केले, ज्‍यासह तीनचाकी इलेक्ट्रिक एल५ कॅटेगरीमध्‍ये पियाजिओचे नेतृत्‍व सुनिश्चित केले आणि निर्यातींना गती दिली. सुरूवातीला दुचाकी विभाग (वेस्‍पा व अॅप्रिलिया)चे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष व व्‍यवसाय प्रमुख म्‍हणून त्‍यांनी विक्री वाढवण्‍यामध्‍ये आणि नवीन मॉडेल्‍स लाँच करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्‍यांच्‍या नेतृत्‍वामध्‍ये इंटरनॅशनल ट्रॅक्‍टर्स लि. (सोनालिका अँड सोलिस ट्रॅक्‍टर्स), बाळकृष्‍ण इंडस्‍ट्रीज लि. (बीकेटी) आणि अपोलो इंटरनॅशनल येथील महत्त्वपूर्ण पदांचा समावेश आहे, जेथे त्‍यांनी आंतरराष्‍ट्रीय विस्‍तारीकरणाला गती देण्‍यामध्‍ये, प्रबळ डिलर नेटवर्क्‍स स्‍थापित करण्‍यामध्‍ये आणि मोठ्या प्रमाणात महसूल विकास संपादित करण्‍यामध्‍ये साह्य केले.

कायनेटिक ग्रीनमध्‍ये श्री. अग्रवाल कायनेटिक ग्रीनचे सह-संस्‍थापक व कार्यकारी संचालक श्री. रितेश मंत्री यांच्‍यासोबत सहयोगाने काम करतील आणि गतीशीलता क्षेत्र व जागतिक बाजारपेठांमधील कंपनीची उपस्थिती धोरणात्‍मकरित्‍या वाढवतील, तसेच शाश्‍वत व उदयोन्‍मुख परिवहन सोल्‍यूशन्‍समधील कंपनीच्‍या भावी विकासगाथेला गती देतील.

Related posts

ग्लोटीस लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री सोमवार 29 सप्टेंबर 2025 पासून होणार सुरू

Shivani Shetty

येत्या वर्षात मोठ्या सदनिकांसह लक्‍झरी राहणीमानाला भारतीयांची पसंती: हाऊसिंग डॉटकॉम

Shivani Shetty

*एनओव्‍हीएसी ३.०: क्‍लीअरट्रिपच्‍या फ्लॅगशिप ट्रॅव्‍हल सेलचे आकर्षक डिल्‍ससह पुनरागमन* सर्वात मोठा समर ट्रॅव्‍हल महोत्‍सव फ्लाइट्स, हॉटेल्‍स, बसेस् व हॉलिडे पॅकेजेसवरील अद्वितीय डिल्‍ससह परतला आहे! राष्‍ट्रीय, २० मार्च २०२५: समर ट्रॅव्‍हल सीझन जवळ आला असताना क्‍लीअरट्रिप ही फ्लिपकार्ट कंपनी आपल्‍या बहुप्रतिक्षित #NationOnVacation (एनओव्‍हीएसी) सेलच्‍या तिसऱ्या एडिशनसह परतली आहे. २० मार्चपासून सुरू होत असलेला हा ९-दिवसीय ट्रॅव्‍हल महोत्‍सव फ्लाइट्स, हॉटेल्‍स आणि इतर पॅकेजेसवर सर्वात मोठ्या सूट देतो, ज्‍यामुळे ग्राहक अद्वितीय दरांमध्‍ये त्‍यांचे स्‍वप्‍नवत व्‍हेकेशन्‍स बुक करू शकतात. वर्दळीच्‍या प्रवास महिन्‍यांदरम्‍यान विमानभाडे दर किमान १५ टक्‍क्‍यांनी वाढण्‍याची अपेक्षा असताना क्‍लीअरट्रिप ग्राहक बुकिंग वर्तणूकीमधील परिवर्तनाचे नेतृत्‍व करत आहे, तसेच प्रवाशांना आधीच प्रवास योजना आखण्‍यास आणि दरांमध्‍ये वाढ होण्‍यापूर्वी सर्वोत्तम भाडेदरांचा आनंद घेण्‍यास प्रेरित करत आहे. एनओव्‍हीएसी ३.० सह क्‍लीअरट्रिप उद्योग नवप्रवर्तक म्‍हणून आपले स्‍थान अधिक दृढ करत आहे, तसेच किंमतीमधील पारदर्शकता, किफायतशीरपणा आणि स्थिर प्रवास पर्यायांवर लक्ष केंद्रित करत आहे. ग्राहक-केंद्रित नाविन्‍यतेप्रती कटिबद्ध क्‍लीअरट्रिपने ‘क्‍लीअरचॉईस’ उपक्रमांतर्गत आपल्‍या ऑफरिंग्‍ज वाढवत आहे, ज्‍यामुळे प्रवाशांना उत्तम बुकिंग स्थिरतेचा लाभ घेता येईल. क्‍लीअरचॉईस प्‍लस व क्‍लीअरचॉईस मॅक्‍ससह ग्राहक त्‍यांच्‍या बुकिंग्‍जमध्‍ये बदल करू शकतात किंवा संपूर्ण रिफंडसह रद्द करू शकतात, ज्‍यामुळे एअरलाइन बुकिंग रद्दीकरणासाठी कोणतेही शुल्‍क आकारले जाणार नाहीत. मिंत्रा आणि फ्लिपकार्ट लॉयल्‍टी सदस्‍यांना देखील क्‍लीअरिट्रिप व फ्लिपकार्ट ट्रॅव्‍हल प्‍लॅटफॉर्म्‍सवर विशेष सूट व ऑफर्सचा आनंद घेता येईल. या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत क्‍लीअरट्रिपचे चीफ ग्रोथ अँड बिझनेस ऑफिसर अनुज राठी म्‍हणाले, “क्‍ली‍अरट्रिप ट्रॅव्‍हल किंमत मॉडेल्‍समध्‍ये नाविन्‍यतेला चालना देण्‍याप्रती कटिबद्ध आहे. आगामी महिन्‍यांमध्‍ये विमानभाडे दर मोठ्या प्रमाणात वाढण्‍याची अपेक्षा असताना एनओव्‍हीएसीचे हे एडिशन प्रवाशांना सर्व स्‍तरावर पुढे राहण्‍यास मदत करण्‍याची आमची पद्धत आहे. आधीच नियोजन करत ग्राहक किंमत वाढीच्‍या अनिश्चिततेला टाळू शकतात आणि विनासायासपणे, किफायतशीर व उत्‍साहाने प्रवासाचा आनंद घेऊ शकतात.” प्रमुख ऑफर्स: ● ९९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या देशांतर्गत फ्लाइट्स ● ५९९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट्स ● २४९९ रूपयांपासून सुरू होणारे लक्‍झरी हॉटेल्‍स (४- व ५-स्‍टार) ● बस बुकिंग्‍जवर जवळपास ४० टक्‍के सूट ● हॉटेल बुकिंग्‍जवर ३० टक्‍के ते ८० टक्‍के सूट ● मिंत्रा इनसाइडर आयकॉनसाठी १ रूपयामध्‍ये क्‍लीअरचॉईस प्‍लस ● फ्लिपकार्ट व्‍हीआयपीसाठी १ रूपयामध्‍ये क्‍लीअरचॉईस मॅक्‍स सर्व ऑफर्स उपलब्धतेच्या अधीन आहेत आणि मर्यादित कालावधीसाठी वैध आहेत. मूल्य पारदर्शकतेला प्राधान्‍य देत एनओव्‍हीएसी ३.० चा भारतातील प्रवाशांच्‍या ट्रिप प्‍लॅनिंग करण्‍याच्‍या पद्धतीला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याचा मनसुबा आहे. लवकर बुकिंग करून प्रवासी किंमत वाढ टाळू शकतात, अधिक स्थिरता मिळवू शकतात आणि त्यांच्या पैशाचे अधिक मूल्य मिळवू शकतात. गेल्‍या वर्षी बुकिंग्‍जमध्‍ये ८० टक्‍के वाढीसह मिळालेल्‍या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादानंतर क्‍लीअरट्रिप ग्राहक-केंद्रित ट्रॅव्‍हल सोल्‍यूशन्‍स डिझाइन करण्‍याप्रती समर्पित आहे. एनओव्‍हीएसीचे तिसरे एडिशन विविध प्रवाशांसाठी उपलब्‍धता आणि किफायतशीरपणामध्‍ये अधिक वाढ करण्‍यास सज्‍ज आहे.

Shivani Shetty

Leave a Comment