maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

भारतातील पहिला एक्‍स्‍पेरिअन्‍सेस-टू-कंझ्युमर ब्रँड ‘दिलसे’ लाँच

मुंबई, १६ जुलै २०२५:* मुंबईतील प्रतिष्ठित एक्‍स्‍पेरिमेण्‍टल थिएटर, एनसीपीए येथे १५ जुलै रोजी आयोजित करण्‍यात आलेल्‍या लाइव्‍ह नाट्य प्रदर्शनादरम्‍यान दिलसे, द हॅप्‍पीनेस कलेक्टिव्‍ह प्रायव्‍हेट लिमिटेड हा भारतातील पहिला एक्‍स्‍पेरिअन्‍सेस-टू-कंझ्युमर (ई२सी) ब्रँड लाँच करण्‍यात आला.

“दिलसे – द लव्ह थिएट्रिकल” असे शीर्षक असलेले हे दोन तासांचे तल्लीन करणारे सादरीकरण पारंपारिक ब्रँड इव्हेंट नव्हते, तर सखोल भावनिक अनुभव होता, ज्यामध्ये मूळ कविता, लाइव्‍ह म्‍युझिक, नाट्यकथन आणि सिनेमॅटिक दृश्ये यांचे संयोजन पाहायला मिळाले.

हर्षवर्धन चौहान यांनी या शोची संकल्‍पना मांडण्‍यासोबत लेखन देखील केले. तसेच त्‍यांनी मुख्‍य पात्राची भूमिका देखील बजावली. या शोमध्ये मूळ कविता, नाट्य संवाद, लाइव्‍ह म्‍युझिक, धार्मिक कथाकथन आणि चित्रपटातील दृश्ये यांचा समावेश होता, ज्‍यामधून भावनिक अनुभव मिळाला. प्रत्येक संवाद, प्रत्येक गीत, प्रत्येक संगीतमय मोटिफ या क्षणासाठी तयार करण्यात आले होते.

सुमित शर्मा दिग्दर्शित, दिलीप रावत आणि राहुल भल्ला यांच्या संगीतासह, या कार्यक्रमात तरुण खेम यांचे कथन, देविका सिंग, तोशी रावल, रिया भल्ला आणि रविंदर पाठक यांचे भावपूर्ण गायन आणि अमन उप्पल, दिया राजपूत, गौतम आणि द दिलसे गर्ल अँड एन्सेम्बल यांचे आकर्षक सादरीकरण होते. हा कार्यक्रम दोन भागांमध्ये विभागला गेला: मीडिया, निर्माते आणि सांस्कृतिक संरक्षकांसाठी इन्‍व्‍हाइट-ओन्‍ली प्रीमियर, त्यानंतर डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटोद्वारे सार्वजनिक प्रदर्शन.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्‍हणून उपस्थित असलेल्‍या अभिनेत्री चित्रगंधा सिंग म्‍हणाल्‍या, ”या कार्यक्रमामध्‍ये अत्‍यंत वास्‍तविक अनुभव मिळाला. प्रत्‍येक परफॉर्मन्‍स प्रामाणिक व अत्‍यंत वैयक्तिक वाटला. दिलसेने असा अनुभव दिला, जेथे भावना व्‍यक्‍त होण्‍यासह खऱ्या अर्थाने जाणवल्‍या. मी अशा प्रामाणिक गोष्टीचा भाग होऊ शकल्‍याने स्‍वत:ला भाग्‍यशाली मानते.”

दिलसे – द लव्ह थिएट्रिकलसह भारतातील वाणिज्य क्षेत्रात नवीन श्रेणी एक्‍स्‍पेरिअन्‍सेस-टू-कंझ्युमर (ई२सी)चा उदय झाला. प्रत्‍यक्ष उत्पादनांची विक्री करणाऱ्या समकालीन ब्रँड्सच्‍या तुलनेत दिलसे कामगिरी, साऊंड, आवाज, डिझाइन आणि डिजिटल कथाकथन यांद्वारे भावनिक अनुभव देते. ही उत्‍साहपूर्ण चळवळ आहे, जी रूपांतरण नाही तर संबंधाच्‍या माध्‍यमातून भारतातील वाणिज्‍याला नवीन आकार देत आहे.

*दिलसेचे संस्‍थाप‍क व निर्माता हर्षवर्धन चौहान* म्‍हणाले, ”हे फक्‍त लाँच नव्‍हते तर आत्‍मीय करार होता. या कथानकामधील प्रत्येक शब्द आपल्‍या लुप्‍त व शांत भावनांमधून आला आहे. मला रंगमंच नको होता. मला आरसा हवा होता. आणि या परफॉर्मन्‍सच्‍या माध्‍यमातून आम्‍ही अभिनय साकारला नाही तर जुन्‍या आठवणींना उजाळा दिला. आम्‍ही भावनांना व्‍यक्‍त करण्‍यासोबत त्‍यामधील अर्थाला सादर केले. भारतात मोठ्या जल्‍लोषात ब्रँड्स निर्माण होताना दिसण्‍यात आले आहे, पण दिलसे उत्‍साहपूर्ण भावनेसह निर्माण करण्‍यात आला आहे. आमची उत्‍पादने परिधान करण्‍यासोबत जाणवली जातील. रंगमंचावर हे फक्‍त नाटक नव्‍हते तर आठवण होती.”

लाँच प्रदर्शनाला मिळालेल्‍या यशानंतर दिलसे आता २३ जुलै २०२५ रोजी दिलसे अॅपच्‍या सॉफ्ट लाँचसह आपले स्‍थान दृढ करण्‍यास सज्‍ज आहे, ज्‍यामागे भारतातील पहिले आत्‍मीय डिजिटल क्षेत्र म्‍हणून दर्जा स्‍थापित करण्‍याचा दृष्टिकोन आहे. ऑगस्‍ट २०२५ पासून ब्रँड उत्‍पादने व वीअरेबल्‍स लाँच करण्‍यास सुरूवात करेल, जी ई२सी अनुभवाला अधिक दृढ करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहेत.

Related posts

चिल अॅट होम’ स्‍प्राइटकडून मोहिम लाँच

Shivani Shetty

कुपोषणाविरुद्ध लढा देणाऱ्या सुपोषण संगिनींचा सन्मान

Shivani Shetty

अनंता क्वेस्टचा भव्य शुभारंभ; अशिष विद्यार्थी यांनी ‘प्राइमर्स’चे केले स्वागत

Shivani Shetty

Leave a Comment