maharashtraprimenews
ठळक बातम्या
generalPublic Interest

डॉ.सिद्धार्थ तुरकर यांची अपोलोत नियुक्ती

नवी मुंबई, २६ ऑगस्ट २०२५: अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने प्रसिद्ध ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सिद्धार्थ तुरकर यांची वैद्यकीय ऑन्कोलॉजी सल्लागार म्हणून नियुक्ती करून कर्करोग देखभाल सेवा आणखी वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दोन दशकांहून अधिक काळाचा समृद्ध अनुभव गाठीशी असलेले डॉ. तुरकर यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये देखील काम केले आहे. त्यांच्याकडे सॉलिड ऑर्गन ट्यूमरच्या व्यवस्थापनात, इम्युनोथेरपी प्रोटोकॉलमध्ये अग्रणी आणि पुराव्यावर आधारित, वैयक्तिकृत उपचार योजना चालविण्याची सखोल कौशल्ये आहेत. त्यांची नियुक्ती करून, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने पश्चिम भारतात अत्याधुनिक, रुग्ण-केंद्रित ऑन्कोलॉजी काळजी प्रदान करण्याच्या आपल्या वचनबद्धतेमध्ये एक धोरणात्मक पाऊल उचलले आहे.

प्रतिष्ठित टाटा मेमोरियल हॉस्पिटल (डीएम – मेडिकल ऑन्कोलॉजी) मधून पदवीधर असलेले डॉ.तुरकर यांनी यापूर्वी एमएमआय नारायण सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि बाल्को मेडिकल सेंटर, रायपूर सारख्या उच्च संस्थांमध्ये ऑन्कोलॉजी सेवांचे नेतृत्व केले आहे. बाल्को मेडिकल सेंटरमध्ये डीएनबी मेडिकल ऑन्कोलॉजी कार्यक्रम सुरू करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि कर्करोग तज्ञांच्या पुढील पिढीला मार्गदर्शन केले आहे. युरोपियन सोसायटी फॉर मेडिकल ऑन्कोलॉजी (ईएसएमओ) आणि युरोपियन हेमॅटोलॉजी असोसिएशन (ईएचए) द्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षित आणि प्रमाणित, डॉ. तुरकर यांच्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी, पॅलिएटिव्ह ऑन्कोलॉजी आणि मर्यादित संसाधनांमध्ये क्लिनिकल प्रोटोकॉल डेव्हलपमेंट यांचा समावेश आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये त्यांचे सुरु असलेले कार्यकारी प्रशिक्षण, आयआयएम रायपूर आणि आयआयएम बंगळुरूकडून मिळालेले नेतृत्व प्रमाणपत्र हे औषध आणि व्यवस्थापन या दोन्ही क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी त्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न दर्शवितात.

डॉ.सिद्धार्थ तुरकर, मेडिकल ऑन्कोलॉजी कन्सल्टंट, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई म्हणाले,“अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथील प्रतिष्ठित टीममध्ये सामील झाल्याचा मला अभिमान आहे. ऑन्कोलॉजीमधील जलद प्रगतीसह, रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधन-आधारित प्रोटोकॉलद्वारे समर्थित मल्टी-डिसिप्लिनरी देखभाल सेवांची उपलब्धता असणे अत्यावश्यक आहे. केवळ आजारावरील उपचारच नव्हे, तर रुग्णांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भावनिक आणि मानसिक गरजा पूर्ण करणाऱ्या समग्र, वैयक्तिकृत उपचार धोरणे प्रदान करून कर्करोग देखभालीमध्ये उत्कृष्टतेच्या अपोलोच्या वारशात योगदान देण्यास मी उत्सुक आहे.”

असंख्य पीयर-रिव्युड पब्लिकेशन्स, राष्ट्रीय स्तरावरील सादरीकरणे आणि संपादकीय योगदान देणारे सक्रिय संशोधक, डॉ. तुरकर हे त्यांच्या पुराव्यावर आधारित दृष्टिकोन आणि रुग्णांप्रती सहानुभूती यासाठी भारतातील ऑन्कोलॉजी वर्तुळात त्यांना अतिशय आदरणीय मानले जाते. छत्तीसगडमधील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी, त्यांना अलीकडेच माय हेल्थकेअर एक्सलन्स अवॉर्ड २०२४, वैद्यकीय सन्मान आणि सार्वजनिक कर्करोग सेवेतील प्रभावी योगदानाबद्दल एमिनेन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.

Related posts

टाटा मोटर्सकडून लखनौ आणि रायपूरमध्‍ये अडवान्‍स्‍ड वेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटी – Re.Wi.Re चे उद्घाटन

Shivani Shetty

इन्श्युरन्सदेखोद्वारे विमा एजन्ट्सचे सक्षमीकरण

Shivani Shetty

आयएमएस रोलआउटमुळे रिटेलर्सच्या सणासुदीच्या काळातील विक्रीच्या संधी होऊ शकतात कमी: एम्पॉवर इंडिया

Shivani Shetty

Leave a Comment