maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneral

अभिनेत्री तब्बू च्या हस्ते कल्याण शोरूमचे शुभारंभ

मुंबई, २८ जुलै २०२५ – कल्याण ज्वेलर्स या भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि आघाडीच्या दागिने कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीने आज फिनिक्स मार्केटसिटी – कुर्ला, मुंबई येथे नवी शोरूम लाँच केली. बॉलिवूड अभिनेत्री तब्बू यांच्या हस्ते या शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. या शोरूममध्ये कल्याण ज्वेलर्सच्या दागिन्यांची विविध कलेक्शन्स खरेदी करता येणार आहेत. यावेळी उत्साही चाहत्यांनी केलेली गर्दी आणि स्वागतामुळे शोरूम लाँचला नवी उर्जा मिळाली.

तब्बू,बॉलिवूड-अभिनेत्री उपस्थितांना उद्देशून म्हणाल्या,‘‘आज कल्याण ज्वेलर्सच्या नव्या शोरूमच्या उद्घाटनासाठी हजर राहाताना मला आनंद होत आहे. कल्याण ज्वेलर्ससारख्या विश्वास, पारदर्शकता आणि ग्राहककेंद्रीत दृष्टीकोन अशी मूल्ये जपणाऱ्या ब्रँडचे प्रतिनिधीत्व करणं माझ्यासाठी सन्माननीय आहे. मला विश्वास आहे, की आमचे ग्राहक कल्याण ज्वेलर्सचे मनापासून स्वागत करतील आणि इथली अनोखी सेवा तसेच दागिन्यांच्या विस्तृत श्रेणीचा आनंद घेतील.’’

श्री.रमेश कल्याणरामन, कार्यकारी संचालक, कल्याण ज्वेलर्स म्हणाले,’‘मुंबईत कल्याण ज्वेलर्सची नवी शोरूम लाँच करताना आम्ही इथल्या ग्राहकांच्या अनोख्या गरजा पूर्ण करण्याचे व त्यांचा खरेदीचा अनुभव उंचावण्याचे ध्येय ठेवले आहे. आम्ही नाविन्यपूर्ण सेवा, ग्राहकांना जागतिक दर्जाच्या वातावरणात देण्यासाठी आणि विश्वास व पारदर्शकता या कंपनीच्या तत्वांशी एकनिष्ठ राहाण्यासाठी बांधील आहोत. कल्याण ज्वेलर्समध्ये आम्ही कायम दर्जा व सेवेवर लक्ष केंद्रित करत अनोख्या दागिन्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करण्यावर भर देतो.”

Related posts

*एनओव्‍हीएसी ३.०: क्‍लीअरट्रिपच्‍या फ्लॅगशिप ट्रॅव्‍हल सेलचे आकर्षक डिल्‍ससह पुनरागमन* सर्वात मोठा समर ट्रॅव्‍हल महोत्‍सव फ्लाइट्स, हॉटेल्‍स, बसेस् व हॉलिडे पॅकेजेसवरील अद्वितीय डिल्‍ससह परतला आहे! राष्‍ट्रीय, २० मार्च २०२५: समर ट्रॅव्‍हल सीझन जवळ आला असताना क्‍लीअरट्रिप ही फ्लिपकार्ट कंपनी आपल्‍या बहुप्रतिक्षित #NationOnVacation (एनओव्‍हीएसी) सेलच्‍या तिसऱ्या एडिशनसह परतली आहे. २० मार्चपासून सुरू होत असलेला हा ९-दिवसीय ट्रॅव्‍हल महोत्‍सव फ्लाइट्स, हॉटेल्‍स आणि इतर पॅकेजेसवर सर्वात मोठ्या सूट देतो, ज्‍यामुळे ग्राहक अद्वितीय दरांमध्‍ये त्‍यांचे स्‍वप्‍नवत व्‍हेकेशन्‍स बुक करू शकतात. वर्दळीच्‍या प्रवास महिन्‍यांदरम्‍यान विमानभाडे दर किमान १५ टक्‍क्‍यांनी वाढण्‍याची अपेक्षा असताना क्‍लीअरट्रिप ग्राहक बुकिंग वर्तणूकीमधील परिवर्तनाचे नेतृत्‍व करत आहे, तसेच प्रवाशांना आधीच प्रवास योजना आखण्‍यास आणि दरांमध्‍ये वाढ होण्‍यापूर्वी सर्वोत्तम भाडेदरांचा आनंद घेण्‍यास प्रेरित करत आहे. एनओव्‍हीएसी ३.० सह क्‍लीअरट्रिप उद्योग नवप्रवर्तक म्‍हणून आपले स्‍थान अधिक दृढ करत आहे, तसेच किंमतीमधील पारदर्शकता, किफायतशीरपणा आणि स्थिर प्रवास पर्यायांवर लक्ष केंद्रित करत आहे. ग्राहक-केंद्रित नाविन्‍यतेप्रती कटिबद्ध क्‍लीअरट्रिपने ‘क्‍लीअरचॉईस’ उपक्रमांतर्गत आपल्‍या ऑफरिंग्‍ज वाढवत आहे, ज्‍यामुळे प्रवाशांना उत्तम बुकिंग स्थिरतेचा लाभ घेता येईल. क्‍लीअरचॉईस प्‍लस व क्‍लीअरचॉईस मॅक्‍ससह ग्राहक त्‍यांच्‍या बुकिंग्‍जमध्‍ये बदल करू शकतात किंवा संपूर्ण रिफंडसह रद्द करू शकतात, ज्‍यामुळे एअरलाइन बुकिंग रद्दीकरणासाठी कोणतेही शुल्‍क आकारले जाणार नाहीत. मिंत्रा आणि फ्लिपकार्ट लॉयल्‍टी सदस्‍यांना देखील क्‍लीअरिट्रिप व फ्लिपकार्ट ट्रॅव्‍हल प्‍लॅटफॉर्म्‍सवर विशेष सूट व ऑफर्सचा आनंद घेता येईल. या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत क्‍लीअरट्रिपचे चीफ ग्रोथ अँड बिझनेस ऑफिसर अनुज राठी म्‍हणाले, “क्‍ली‍अरट्रिप ट्रॅव्‍हल किंमत मॉडेल्‍समध्‍ये नाविन्‍यतेला चालना देण्‍याप्रती कटिबद्ध आहे. आगामी महिन्‍यांमध्‍ये विमानभाडे दर मोठ्या प्रमाणात वाढण्‍याची अपेक्षा असताना एनओव्‍हीएसीचे हे एडिशन प्रवाशांना सर्व स्‍तरावर पुढे राहण्‍यास मदत करण्‍याची आमची पद्धत आहे. आधीच नियोजन करत ग्राहक किंमत वाढीच्‍या अनिश्चिततेला टाळू शकतात आणि विनासायासपणे, किफायतशीर व उत्‍साहाने प्रवासाचा आनंद घेऊ शकतात.” प्रमुख ऑफर्स: ● ९९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या देशांतर्गत फ्लाइट्स ● ५९९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट्स ● २४९९ रूपयांपासून सुरू होणारे लक्‍झरी हॉटेल्‍स (४- व ५-स्‍टार) ● बस बुकिंग्‍जवर जवळपास ४० टक्‍के सूट ● हॉटेल बुकिंग्‍जवर ३० टक्‍के ते ८० टक्‍के सूट ● मिंत्रा इनसाइडर आयकॉनसाठी १ रूपयामध्‍ये क्‍लीअरचॉईस प्‍लस ● फ्लिपकार्ट व्‍हीआयपीसाठी १ रूपयामध्‍ये क्‍लीअरचॉईस मॅक्‍स सर्व ऑफर्स उपलब्धतेच्या अधीन आहेत आणि मर्यादित कालावधीसाठी वैध आहेत. मूल्य पारदर्शकतेला प्राधान्‍य देत एनओव्‍हीएसी ३.० चा भारतातील प्रवाशांच्‍या ट्रिप प्‍लॅनिंग करण्‍याच्‍या पद्धतीला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याचा मनसुबा आहे. लवकर बुकिंग करून प्रवासी किंमत वाढ टाळू शकतात, अधिक स्थिरता मिळवू शकतात आणि त्यांच्या पैशाचे अधिक मूल्य मिळवू शकतात. गेल्‍या वर्षी बुकिंग्‍जमध्‍ये ८० टक्‍के वाढीसह मिळालेल्‍या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादानंतर क्‍लीअरट्रिप ग्राहक-केंद्रित ट्रॅव्‍हल सोल्‍यूशन्‍स डिझाइन करण्‍याप्रती समर्पित आहे. एनओव्‍हीएसीचे तिसरे एडिशन विविध प्रवाशांसाठी उपलब्‍धता आणि किफायतशीरपणामध्‍ये अधिक वाढ करण्‍यास सज्‍ज आहे.

Shivani Shetty

यंदा सायबरसुरक्षा जागरूकता महिन्‍यामध्‍ये #SatarkNagrik बना आणि एआय-समर्थित धूर्त घोटाळ्यांपासून स्‍वत:चे संरक्षण करा

Shivani Shetty

साठये कॉलेज विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी कार्यरत मानसिक आरोग्य कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न

Shivani Shetty

Leave a Comment