maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

भारताच्या ऐतिहासिक महिला विश्वचषक विजयाच्या औचित्याने ‘यूवा’तर्फे लिमिटेड एडिशन लाँग बुक्स सादर

महाराष्ट्र, 24 नोव्हेंबर 2025 : 2 नोव्हेंबर 2025 रोजी भारताच्या महिला क्रिकेट संघाने स्पर्धेच्या 50 वर्षांच्या इतिहासात आयसीसी महिला विश्वचषक जिंकून प्रथमच इतिहास घडवला. या ऐतिहासिक विजयाचा सन्मान करण्यासाठी नवनीत एज्युकेशन लिमिटेडच्या ‘यूवा’तर्फे ‘विमेन्स वर्ल्ड कप लाँग बुक्स’ (ए4, 172 पृष्ठे) ही लिमिटेड एडिशन सीरिज सादर करण्यात आली आहे. या खास कलेक्शनच्या निमित्ताने संघाच्या जिद्दीचा, चिकाटीचा आणि भारतभरातील क्रिकेटप्रेमींना एकत्र आणणाऱ्या पॅशनचा गौरव करण्यात आला आहे. #TeamIndia

या अभिमानास्पद क्षणाने लाखो भारतीयांचे हृदय आनंद आणि गर्वाने भरून आले. कारण या संघाची मेहनत, चिकाटी आणि एकीमुळे देशाला हे वैभव प्राप्त झाले आहे. या सीरिजमधील प्रत्येक वहीमध्ये, आपल्या महिला चॅम्पियन्सचा आत्मविश्वास व अभिमान प्रतिबिंबित करणाऱ्या दृश्यांसह या ऐतिहासिक विजयाचा उत्साह टिपण्यात आला आहे. #YouvaGirlPower

नारीशक्ती आणि सबलीकरणाचा गौरव करणाऱ्या प्रभावी दृश्यरचनेमुळे कव्हर डिझाइन उठून दिसते आणि ताकद, साहस आणि आत्मविश्वास असेल तर त्यांना कोणतेही ध्येय साध्य करणे शक्य आहे, याची तरुण वाचकांना आठवण करून देते. हे केवळ एक लाँग बुक नाही तर चिकाटी व संघभावनेने इतिहास घडवता येतो, याचे प्रत्येक महत्त्वाकांक्षी विद्यार्थी आणि तरुणांना आठवण करून देणारे स्मरणचिन्ह आहे. #DreamBelieveAchieve
‘यूवा’चे चीफ स्ट्रॅटजी ऑफिसर अभिजीत सान्याल म्हणाले, “भारतात क्रिकेट हा केवळ एक खेळ नाही तर ती भावना आहे. आपल्या महिला संघाने मिळवलेला हा ऐतिहासिक विजय म्हणजे भारतीय क्रिकेटच्या नव्या युगाची सुरुवात आहे. ‘यूवा’मध्ये आम्हाला महिला क्रिकेट संघाची ही यशस्वी कामगिरी अशा पद्धतीने साजरी करायची होती, ज्यामुळे प्रत्येक मुलीला मोठी स्वप्ने पाहण्याची आणि मेहनत करण्याची प्रेरणा मिळेल. आमची लिमिटेड एडिशन महिला विमेन्स वर्ल्ड कप लाँग बुक्स ही त्यांच्या यशाला दिलेली छोटीशी मानवंदना आहे आणि ताकद व साहसाला कोणत्याही सीमा नसतात याची आठवण करून देणारी आहे.”

ही लिमिटेड सीरिज भारतातील आघाडीच्या स्टेशनरीच्या दुकानांमध्ये आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे. या लाँग बुक्सचे उत्तम डिझाइन आणि अर्थपूर्ण संकल्पनेमुळे या लाँग बुक्समध्ये प्रेरणा व दैनंदिन वापर यांची परिपूर्ण सांगड घातली गेली आहे.

Related posts

रिटेल लेण्डिंग क्षेत्रात रोजगार मागणीत वाढ: टीमलीज सर्विसेस

Shivani Shetty

फॉर्च्युनची सोया चंक्स साठी ‘बनाओ कुछ हटके’ मोहीम

Shivani Shetty

स्पॉटिफायने आयोजित केली ‘कूली – द पावरहाउस’सोबत अनिरुद्ध रविचंदर आणि कलाकारांची सुरेल संध्या

Shivani Shetty

Leave a Comment