maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

भारताच्या प्रमुख निवासी बाजारपेठांमध्ये विक्री आणि नवीन पुरवठा स्थिर

मुंबई, ९ नोव्हेंबर २०२५: हाऊसिंग डॉटकॉम या भारताच्या आघाडीच्या रियल इस्टेट टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मच्या अलीकडच्या अहवालानुसार, जुलै ते सप्टेंबर २०२५ या सदर कॅलेंडर वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत, ज्यामध्ये पावसाळ्याचा मोठा भाग होता, देशातील मोठ्या निवासी बाजारपेठांमध्ये सुस्ती दिसून आली. जुलै-सप्टेंबर या कालावधीत गेल्या वर्षाच्या तुलनेत देशातील ८ मोठ्या निवासी बाजारपेठांमध्ये विक्रीचा कारभार स्थिर राहिला, तर नवीन पुरवठ्यात अगदी नाममात्र ३% वाढ झाल्याचे अहवालात दिसून आले.

*आरईए इंडिया (हाऊसिंग डॉटकॉम) चे सीईओ श्री. प्रवीण शर्मा म्हणाले,* “गेल्या अर्ध्या दशकात किंमतीत वाढ झाल्यामुळे परवडण्याजोग्या घरांच्या सेगमेन्टमध्ये विक्री कमी झाली आहे, जी या क्षेत्राच्या दीर्घकालीन स्थिरता आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण श्रेणी आहे. प्रीमियम आणि हाय-एन्ड सेगमेन्टमध्ये मागणी आणि पुरवठा दमदार असल्याचे दिसून आले, ज्याला उपभोक्त्यांच्या तीव्र भावनांचे समर्थन प्राप्त आहे, पण किफायतशीर निवासी श्रेणीत मागणी स्थिर असूनही पुरवठा मर्यादित राहिला आहे.”

श्री. शर्मा पुढे म्हणाले, “दुहेरी दृष्टिकोन असणे आवश्यक आहे: पहिले म्हणजे, किफायतशीर निवासी सेगमेन्टमध्ये पुरवठा वाढवण्यासाठी विकासकांना प्रोत्साहन देणे आणि दुसरे म्हणजे, एन्ड-यूझर्सचे खरेदीचे सामर्थ्य वाढवणे.”

या क्षेत्रातील विकासकांचा विश्वास अढळ आहे

या अहवालात हे दिसून आले की, २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत देशातील सर्वोच्च आठ निवासी बाजारपेठांमध्ये एकूण ९४,४१९ नवीन घरे लॉन्च झाली, जी २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत ९१,८६३ होती. गेल्या काही तिमाहींमध्ये पुरवठ्यातील निरंतर चढ-उतारांनंतर झालेली ही एक माफक पण अर्थपूर्ण रिकव्हरी आहे. नवीन पुरवठ्यात तिमाहीत १२% वाढ झाली, ज्यामधून वर्षाच्या प्रारंभी मागणीच्या पुनर्संतुलनाच्या टप्प्यानंतर विकासकांचा वाढलेला आत्मविश्वास दिसतो.

नवीन लॉन्चेसच्या बाबतीत बंगळूर (२२%), हैदराबाद (२१%) आणि अहमदाबाद (२३%) सारख्या बाजारांनी त्रिमासिक वाढीचे नेतृत्व केले. मागील वर्षाच्या तुलनेत कोलकाता (६९%) आणि चेन्नई (५१%) मध्ये विशेष विस्तार झालेला दिसला. यावरून समजते की, उगवत्या आणि उच्च-मागणीच्या भागात विकासकांचे काम वाढले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय पुरवठ्याच्या बाबतीत मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि पुण्याने मिळून वर्चस्व कायम राखले. या तिमाहीतील एकूण नवीन लॉन्चिस पैकी ४०% वाटा त्यांचा आहे. एमएमआरमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत १७% घट झाली असली, तरी पुणे मात्र मोठ्या प्रमाणात स्थिर आहे. यावरून पश्चिम भारतातील हाऊसिंग ईकोसिस्टममधील स्थिर वृद्धी सूचित होते.

विक्रीत मध्यम आणि प्रीमियम सेगमेन्टचे वर्चस्व

हा अहवाल दर्शवितो की, या विश्लेषणासाठी निवडलेल्या आठ बाजारपेठांमध्ये १००,००० पेक्षा कमी घरे विकली गेली. ही १% ची क्रमिक घसरण आहे.

४५ लाख रु. वरील सेगमेन्टचे त्रिमासिक विक्रीतील योगदान ८४% आहे. यावरून हे स्पष्ट होते की, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात मालमत्तेच्या वाढत्या किंमती लक्षावधी लोकांना महागडी भाडी देऊन राहण्यास भाग पाडत आहे.

मोठ्या बाजारपेठांपैकी, दमदार रोजगार मार्केट आणि कामकाजी व्यवसायिकांच्या निरंतर ओघामुळे उत्साहित बंगळूर (२३%), कोलकाता (४३%) आणि चेन्नई (५१%) ने विक्रीत वार्षिक वृद्धी नोंदविली आहे. याच्या उलट, एनसीआर आणि एमएमआरमध्ये अनुक्रमे १४% आणि ४% वार्षिक घट झाली आहे, ज्याचे कारण प्रीमियम सेगमेन्टमधील किंमतींचे समायोजन हे आहे.

या अहवालात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, संतुलन साधण्यासाठी आणि गती राखण्यासाठी धोरणांचा लक्ष्यित हस्तक्षेप आवश्यक आहे- ज्यामध्ये आर्थिक प्रोत्साहन, सुव्यवस्थित मंजुरी आणि विकासक आणि खरेदीदार दोघांसाठी नावीन्यपूर्ण वित्तपुरवठा यंत्रणेचा समावेश आहे.

Related posts

सॅमसंगचे वॉन-जून चोई म्‍हणाले, मानव-केंद्रित, हायब्रिड एआयने नवीन क्षमता आणल्‍या आहेत

Shivani Shetty

परफॉर्मिंग आर्ट्स क्षेत्रातील दिग्गजांना दिलेली ही सर्वोच्च राष्ट्रीय मान्यता ‘निलाद्री कुमार’ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

Shivani Shetty

अॅथलेटिक सर्वोत्तमतेचे साजरीकरण: लिम्‍का बुक ऑफ रेकॉर्ड्सने वर्ल्‍ड अॅथलेटिक्‍स डे निमित्त भारतीय खेळाडूंच्‍या उल्‍लेखनीय कामगिरीचा गौरव केला

Shivani Shetty

Leave a Comment