maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

जालिंदरनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगातील टॉप 10 शाळांमध्ये प्रथम क्रमांकावर

नवनीत एज्युकेशन लिमिटेड तर्फे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे गुरुजी यांचा गौरव
पुणे, महाराष्ट्र, ३ नोव्हेंबर २०२५:
इंग्लंडस्थित T4 Education ही संस्था दरवर्षी “World’s Best School Competition” चे आयोजन करते, ज्याद्वारे नावीन्यपूर्ण कल्पना, उपक्रम आणि सामाजिक प्रभाव निर्माण करणाऱ्या शाळांना सन्मानित केले जाते. या प्रतिष्ठित उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा, जालिंदरनगर (पुणे) या शाळेने Community Choice या श्रेणीत जगातील टॉप 10 शाळांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या उल्लेखनीय यशाचे मानकरी आहेत शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे गुरुजी. “आपली शाळा – आपली जबाबदारी” या तत्त्वावर वारे गुरुजींनी २०२२ मध्ये फक्त ३ पटसंख्येसह शाळेची धुरा स्वीकारली. त्यांचे अथक परिश्रम, नावीन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोग आणि प्रेरणादायी नेतृत्व यामुळे आज या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या १५० हून अधिक झाली आहे.
त्यांनी सुरू केलेले अनेक उपक्रम – विद्यार्थी मंत्रिमंडळ, म्युझिक प्रॉडक्शन, परदेशी भाषा शिक्षण, रोबोटिक्स, क्रीडा, अनुभवाधारित शिक्षण, स्वअभ्यास, विषयमित्रांची मदत, तंत्रज्ञानाची मदत, दुपारची योगनिद्रा आणि वाचन स्वातंत्र्य – यांनी शाळेला कायापालट करून सर्जनशील आणि आनंदी शिक्षणकेंद्रात रूपांतरित केले आहे.
या ऐतिहासिक यशाबद्दल नवनीत एज्युकेशन लिमिटेड या आघाडीच्या शैक्षणिक साहित्य प्रकाशन संस्थेने वारे गुरुजींचा गौरव केला. या प्रसंगी अनिलभाई गाला (संचालक, नवनीत एज्युकेशन लि.), बसंती रॉय (प्रमुख – शिक्षक प्रशिक्षण विभाग), कल्पेश शाह (प्रमुख व्यवस्थापक) तसेच नवनीत टीम यांनी जालिंदरनगर शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसह हा आनंद साजरा केला. श्रीमती शुभदा चौकर यांनी वारे गुरुजींशी अनौपचारिक संवाद साधला. तसेच विद्याधर शुक्ल व संपदा जोशी यांनी शिक्षक, विद्यार्थी व पालक प्रतिनिधींशी बातचीत केली. या सोहळ्याची संकलित ‍चित्रफीत नवनीतच्या ‘नवदिशा’ या खास शिक्षकांसाठीच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
या कौतुक सोहळ्याच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना नवनीतकडून भेटवस्तू देण्यात आल्या.
नवनीत एज्युकेशन लिमिटेडचे संचालक अनिल गाला म्हणाले, “नवनीत नेहमीच शिक्षणाच्या परिवर्तनशील क्षमतेवर विश्वास ठेवते. वारे गुरुजींनी घडवलेला बदल खरोखरच प्रेरणादायी आहे. खंबीर नेतृत्वामुळे समाजाचा कसा कायापालट होऊ शकतो, याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांच्या या यशाचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यांच्या प्रवासातून अनेक शिक्षकांना प्रेरणा मिळेल, अशी आशा आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या आणि शिक्षणाची पायाभरणी अधिक मजबूत करणाऱ्या देशभरातील शिक्षकांना नवनीत एज्युकेशन लिमिटेड कायम प्रोत्साहन देते.”

Related posts

एटंेरोहल्ेथकेयरसोल्यशुन्सलिलिटेडनेसबेीकडेडीआरएचपीफाईिकेिे

Shivani Shetty

फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलदरम्‍यान सॅमसंग गॅलॅक्‍सी ए१४ ५जी फक्‍त ९९९९ रुपायांमध्ये

Shivani Shetty

क्रिकेट जगतातील महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांची रेडिटचे ब्रँड अॅम्‍बेसेडर म्‍हणून नियुक्‍ती

Shivani Shetty

Leave a Comment