maharashtraprimenews
ठळक बातम्या
generalPublic Interest

सामान्य लोकांना प्राधान्य देणाऱ्या सुविधांची पॉलीकॅब व्यवस्था

मुंबई, सप्टेंबर २०२५ : गणेशोत्सवाच्या काळात मुंबई भक्ती आणिउत्सवाच्या वातावरणाने भारलेली असतानाच, पॉलीकॅबने आपल्याग्राहक केंद्रित दृष्टिकोनाची प्रचिती दिली. शहरातील दोन सर्वातप्रतिष्ठित आणि महत्त्वाची उत्सव स्थळेलालबागचा राजा आणि जुहूबीच येथे भाविकांची सोय लक्षात घेत योग्य व्यवस्था करत मजबूत बंधनिर्माण केले आहेत. भाविकांच्या गरजा ओळखून पॉलीकॅबने आराम, सुरक्षा आणि सुलभतेला प्राधान्य देणाऱ्या कार्यात्मक, भाविकांच्यासोयीसाठी जागा तयार करून त्यांचे स्थान अधिक भक्कम केले आहे. मुंबईतील भाविकांच्या गर्दीच्या गरजा ओळखून त्यांनी आपले उपक्रमतयार केले आहेत. या माध्यमातून पॉलीकॅब सामाजिक भान जपतआणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये आपले स्थान भक्कमकरते आहे.

लालबागचा राजा येथे दर्शन प्रवास अधिक सुरळीत आणि आरामदायीकरण्यासाठी, पॉलीकॅबने दर्शन मार्गावरील स्थानिक बस स्टॉपचेरूपांतरकम्फर्ट झोनमध्ये केले आहे. यामुळे दर्शन रांगेतीलभाविकांना जरा विसावा घेता येईल. त्यांचे मोबाइल रिचार्जकरण्यासोबतच ऊन तसेच पावसापासून बचावासाठी हा बस स्टॉपचाउपयोग करता येईल. याशिवाय भाविक तसेच स्वयंसेवकांचीकनेक्टिव्हिटी राहावी म्हणून पॉलीकॅबने पंडालमध्ये मोबाइल चार्जिंगस्टेशन, सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रमकरणाऱ्या पोलिसांसाठी कम्फर्ट झोन, तसेच हवा खेळती राहणारेपॉलीकॅब पंख्यांनी सुसज्ज अशा  वॉकवे झोनची व्यवस्था केली आहे.

श्वेताल बसू, वरिष्ठ उपाध्यक्ष, ब्रँड आणि मार्कॉम, पॉलीकॅब इंडियालिमिटेड म्हणाल्या,गणेश चतुर्थी हा एकता आणि भक्तीचा उत्सवआहे. या व्यवस्थेद्वारे आम्ही समाजाला आराम देण्याचे उद्दिष्ट ठेवतो. केवळ उत्पादनांच्या पलीकडे जाऊन अर्थपूर्ण, ग्राहक प्रथम कनेक्शनतयार करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.”

प्रमुख विसर्जन स्थळ असलेल्या जुहू बीचवर विसर्जनादरम्यान गर्दीवरलक्ष ठेवण्यासाठी पॉलीकॅबने ब्रँडेड सेफ्टी वॉच टॉवर्स बसवले आहेत. यामुळे अधिकाऱ्यांना देखील गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल. अशाप्रयत्नांमुळे लाखो भाविकांशी असलेले पॉलीकॅबचे नाते अधिक दृढ होतेआहे. पॉलीकॅबच्या भारतातील यशस्वी सांस्कृतिक कार्यक्रमांवर हाउपक्रम आधारलेला आहे. पुरीमधील रथयात्रेपासून मुंबईतील गणेशचतुर्थीपर्यंत पॉलीकॅब स्थानिक परंपरांशी जुळवून घेताना आराम, काळजी आणि मजबूत बंधाद्वारे लोकांना प्राधान्य देत उत्सवाचा आनंदद्विगुणित करत आहे.

Related posts

महाराष्‍ट्रासाठी यामाहाकडून स्‍पेशल नवरात्री फेस्टिव्‍ह ऑफर्सची घोषणा

Shivani Shetty

सॅमसंगकडून भारतात फर्स्‍ट-एव्‍हर ग्‍लासेस-फ्री ३डी व ४के २४० हर्टझ ओएलईडी लाँच

Shivani Shetty

बहुप्रतिक्षित चित्रपट ‘झिम्मा 2’ चं दसऱ्याचा शुभ मुहूर्तावर पोस्टर आऊट

Shivani Shetty

Leave a Comment