maharashtraprimenews
ठळक बातम्या
generalPublic Interest

क्रिप्टो गुंतवणूकदारांसाठी सुरक्षितता हाच #1 प्राधान्यक्रम, कॉइनस्विच सर्वेक्षणातील निष्कर्ष

बंगळुरु, 25 ऑगस्ट 2025कॉइनस्विच या दोन कोटींहून अधिकवापरकर्ते असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या क्रिप्टो व्यासपीठानेभारतभरात केलेल्या नव्या सर्वेक्षणानुसार भारतातील क्रिप्टोगुंतवणूकदारांसाठी सुरक्षितता हा #1 प्राधान्यक्रमाचा मुद्दा आहे. सुमारे एकतृतीयांश वापरकर्त्यांच्या मते या व्यासपीठांना अधिक चांगल्या सुरक्षाउपाययोजना अमलात आणल्यास त्यांना गुंवणुकीविषयी अधिक सुरक्षितआणि आत्मविश्वास वाटेल. भारतीय क्रिप्टो परिसंस्थेत अधिक बळकटसुरक्षा, उत्तम पारदर्शकता आणि वापरकर्त्यांच्या संरक्षणाला प्राधान्यदेणाऱ्या प्रणालीची मागणी वाढत असल्याचे या सर्वेक्षणात अधोरेखित झालेआहे.

क्रिप्टो सेफ्टी पल्स:२०२५ या सर्वेक्षणात देशभरातील सुमारे ३००० सक्रियक्रिप्टो गुंतवणूकदारांची मते जाणून घेण्यात आली. सकारात्मक, तटस्थ, नकारात्मक अशी कोणतीही भावना असली तरी सर्वांमध्ये एक बाब समानहोती, ती म्हणजे परताव्याइतकीच सुरक्षितता महत्त्वाची आहे. कमी फीआणि विविध वैशिष्ट्ये या पलिकडे आता गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढतआहेत.

भारतातील क्रिप्टोचा अवलंब हा नाविन्यतेइतकाच विश्वासावर अवलंबूनआहे,असे कॉइनस्विचचे सहसंस्थापक आशिष सिंघल म्हणाले. “आम्हीकायमच ज्यावर विश्वास ठेवला आहे तेच मुद्दे या सर्वेक्षणात महत्त्वाचे ठरलेआहेत आणि ते म्हणजे वापरकर्त्यांना व्यासपीठाकडून फक्त नफ्याचीअपेक्षा नसते तर त्यात सुरक्षितता, जबाबदारी आणि पारदर्शक तक्रारनिवारण हेही मुद्दे आवश्यक असतात. प्रगतीच्या पुढील टप्प्यासाठी हाचपाया आहे. कॉइनस्विचमध्ये या अपेक्षा पूर्ण करण्यास आम्ही बांधिल आहोतआणि प्रत्येक गुंतवणूकदारासाठी अधिक सुरक्षित, अधिक लवचिक क्रिप्टोपरिसंस्था उभारत आहोत, असे ते पुढे म्हणाले.

ठळक वैशिष्ट्ये:

क्रिप्टो गुंतवणुकीसंदर्भातील त्यांच्या भावनांबद्दल विचारले असता ६० टक्के सहभागींनी त्यांना सकारात्मक वाटत असल्याचे सांगितले, तर२० टक्के सहभागींना नकारात्मक वाटते तर २० टक्के अद्याप यापैकीकोणत्याही भावनेकडे झुकलेले नाहीत. या गुंतवणुकीबद्दल मोठ्याप्रमाणात सकारात्मक आहे मात्र एक मोठा वर्ग अद्यापही यापरिसंस्थेसंदर्भात सावध असल्याचे यातून स्पष्ट होते.
क्रिप्टोबद्दल सकारात्मक भावना असलेल्या गुंतवणूकदारांमध्ये ४५.९ टक्क्यांहून अधिक सहभागींनी अधिक परतावा अधोरेखित केला तरदरपैकी जवळपास एकाने दीर्घकालीन क्षमतांवर भर दिला. मात्र, ८.२ टक्के सहभागींनी त्यांच्या आत्मविश्वासाचे कारण म्हणूनसुरक्षित व्यासपीठा’ला महत्त्व दिले. क्रिप्टोवरील विश्वास आणिक्रिप्टो व्यासपीठांवरील विश्वास यातील दरी यामुळे अधोरेखित झालीआहे.
३३.९ टक्क्यांहून अधिक सहभागी, जे क्रिप्टोबद्दल अनिश्चित किंवानकारात्मक होते अशांनी सुरक्षेचा धोका ही त्यांची काळजी असल्याचेनमूद केले. इतर चिंतांमध्ये भूतकाळातील नकारात्मक अनुभव (२५.९ %) किंवा तक्रार निवारण फारसे चांगले नसणे (१९.९ %) यांचासमावेश आहे.
तटस्थ गुंतवणूकदारांमधील संकोचाची प्रमुख कारणे म्हणजे सुरक्षेचीचिंता (१६.%), अस्थिरता (२५.%) आणि मर्यादित ज्ञान (३०.%). अद्याप कुंपणावर असलेले किंवा विचाराधीन असलेले गुंतवणूकदारहीजोखीम आणि सुरक्षिततेबद्दल सावध आहेत, हे यातून सूचित होते.
हॅकिंग झाल्यास रिकव्हरी प्रोग्रामचा आधार या सुरक्षा वैशिष्ट्यालासर्वाधिक मागणी आहे. सुमारे २५.% प्रतिसादकर्त्यांनी हा पर्यायनिवडलाऑडिट किंवा २४/ ग्राहक सेवा अशा इतर मुद्द्यांपेक्षा हामुद्दा सरस ठरला.

वापरकर्त्यांच्या अपेक्षांमध्ये लक्षणीय बदल झालेत हे या निष्कर्षांमधून स्पष्ट होते. यात क्रिप्टो केवळ संधींपुरते मर्यादित नसून व्यासपीठाची विश्वासार्हता आणिसंरक्षण हेही महत्त्वाचे आहे.

काही गंभीर अडचणींच्या पार्श्वभूमीवर या भावना निर्माण झाल्या आहेत: वर्षभरात भारतातील आघाडीच्या क्रिप्टो एक्स्चेंजवर झालेल्या दोन मोठ्यासायबर हल्ल्यांमुळे असेट्सचे लाखो डॉलर्सचे नुकसान झाले आणित्यामुळे वापरकर्त्यांचा विश्वास ढळला. भारतीय गुंतवणूकदारांसाठी अशाप्रसंगांमुळे सुरक्षितता ही फक्त एक सोय नाही तर अत्यावश्यक बाब बनलीआहे.

सुरक्षा आणि सुरक्षितता नेहमीच कॉइनस्विचच्या केंद्रस्थानी आहेत आणित्याचे महत्त्व मागील वर्षभरात स्पष्ट झाले. खालील उपाययोजनांच्यामाध्यमातून आम्ही आमच्या वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवण्याची बांधिलकीअधिक दृढ केली आहे:

व्यावसायिक दर्जाची कस्टडी: क्रिप्टो साठवणुकीसाठी आम्ही उत्तमकस्टडी प्रदातांसोबत काम करतो. आमचे कस्टडी प्रदाता स्टोरेज आणिट्रान्सफर दरम्यान असेटचा विमा करतात.
ISO/IEC 27001:2022 प्रमाणित: माहिती सुरक्षितता दमदारअसावी यातील आमची बांधिलकी यातून प्रतित होते.
मल्टी पार्ट कम्प्युटेशन (एमपीसी): सुरक्षित असेट मॅनेजमेंटसाठीमहत्त्वाच्या टप्प्यांमधील कोणत्याही प्रकारच्या तडजोडी नष्ट केल्याजातात.
दमदार पॉलिसी इंजिन: अधिक सुरक्षिततेसाठी सखोल व्यवहारमान्यता
रिस्क मॅनेजमेंट: बहूतांश असेट कोल्ड वॉलेट्समध्ये स्टोअर केल्याजातात, ५ टक्क्यांहून कमी हॉट वॉलेट्स आणि एक्स्चेंजमध्येअसल्याने धोरणात्मक धोके कमी होतात
पारदर्शकता: आम्ही ठेवींचे ऑडिटेड पुरावे ठेवतो, रुपये आणिक्रिप्टोमध्ये वापरकर्त्यांच्या ठेवींना किमान १:१ पाठबळ असते
आर्थिक बळकटी: दमदार गुंतवणूक आणि गुंतवणूकदारांच्यापाठबळामुळे आम्हाला अगदी प्रतिकूल परिस्थितीतही वापरकर्त्यांनासंरक्षण देणे शक्य होते.

Related posts

एल्‍गीकडून डी.व्‍ही.पी. व्‍हॅक्‍यूम टेक्‍नॉलॉजी एस.पी.ए., इटलीसोबत बहुवार्षिक तंत्रज्ञान परवाना कराराची घोषणा

Shivani Shetty

एचडीएफसी लाइफचा मेट्रोपोलिस आणि कॉलहेल्थसह त्रिपक्षीय सहयोग

Shivani Shetty

डिजिकोअर स्टुडिओचा आयपीओ २५ सप्टेंबर रोजी खुला होणार

Shivani Shetty

Leave a Comment