maharashtraprimenews
ठळक बातम्या
generalPublic Interest

प्रो गोविंदा सीझन ३ च्या चषकावर उमटवली नागपूर निंजास् संघाने (आर्यन्स गोविंदा पथक) विजयाची मोहोर

मुंबई , ९ – प्रो गोविंदा सीझन ३ च्या चषकावर नागपूर निंजास् संघाने (आर्यन्स गोविंदा पथक) आपल्या विजयाची मोहोर उमटवली. विजेत्या संघाला ७५ लाख रुपयांचा धनादेश व ट्रॉफी देऊन परिवहन मंत्री मा. श्री. प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा सीझन ३ चे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर ख्रिस गेल यांच्या हस्ते पुर्वेश सरनाईक यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

प्रो गोविंदा सीझन ३ च्या स्पर्धेत द्वितीय पारितोषिक गोवा सर्फर्स (शिवसाई गोविंदा पथक) रुपये ५० लाख , तृतीय पारितोषिक अलिबाग नाईट्स (बाल उत्साही गोविंदा पथक) रुपये २५ लाख देऊन सन्मानित करण्यात आले. उर्वरित सहभागी संघांना प्रत्येकी ३ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

सुप्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते, संगीत संयोजक सलीम – सुलेमान यांच्या लाईव्ह कॉन्सर्टने सांगता कार्यक्रमास वेगळ्या उंचीवर नेले.

प्रो गोविंदा लीगचे संस्थापक तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, मी पाहिलेले स्वप्न पुर्वेश सरनाईक व त्यांच्या टीमने सत्यात उतरवले. आपला गोविंदा सात समुद्रापलीकडे पोहचला आहे. याचा मला खूप अभिमान आहे. ख्रिस गेल यांच्या सहभागामुळे यंदाचा सीझन ग्लोबल झाला. गोविंदा खेळाला ऑलिम्पिकमध्ये घेऊन जायचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करतो.

प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष श्री. पुर्वेश सरनाईक म्हणाले, यंदाचे पर्व आपल्या गोविंदाला ग्लोबल प्रतिष्ठा मिळवून देण्यास समर्पक ठरले आहे. सर्व गोविंदांनी अथक परिश्रम, जिद्द, संघटन कौशल्य याचे अद्भूत प्रदर्शन दाखवले. आपल्या दहीहंडी खेळाला ऑलिम्पिकमध्ये घेऊन जायचे आहे. हे स्वप्न लवकरच सत्यात उतरेल असा विश्वास यंदाच्या पर्वातून निर्माण झाला आहे.

प्रो गोविंदा सीझन ३ च्या अंतिम सामान्यात सोळा संघ सहभागी झाले होते. यंदाचा सामना अधिकच रोमहर्षक झाला. शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहचली होती.

प्रो गोविंदा सीझन ३ अंतिम सामान्यासाठी क्रिकेट पटू श्रेयस अय्यर, माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, मुंबई टी २० लीगचे चेअरमन विहंग सरनाईक, माजी नगरसेविका परिषा सरनाईक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
०००००

Related posts

हिरो मोटोकॉर्पने नवीन श्रेणी व भावी कन्‍सेप्‍टमधील प्रॉडक्‍शन-रेडी वेईकल्‍ससह ईआयसीएमए २०२३ येथेसर्वांचे लक्ष वेधून घेतले

Shivani Shetty

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू च्या हस्ते कल्याणच्या नव्या शोरूमचे शुभारंभ

Shivani Shetty

सांगलीच्या शाळांमधील वाचनातील तफावत भरून काढण्यासाठी सोसायटी टीने “द ब्लू बेंच प्रोजेक्ट” सुरू केला

Shivani Shetty

Leave a Comment