maharashtraprimenews
ठळक बातम्या
generalPublic Interest

वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी ग्लोबल कंझ्युमर प्रॉडक्ट्स – कॅरेटलेन ची भागीदारी

मुंबई, ७ ऑगस्ट २०२५ : भारतातील आघाडीचे ओम्नी-चॅनल ज्वेलर्स, टाटा परिवारातील एक कंपनी कॅरेटलेन यांनी वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी ग्लोबल कंझ्युमर प्रॉडक्ट्सच्या सहयोगाने ‘F.R.I.E.N.D.S.’ प्रेरित सोने आणि हिऱ्यांच्या अनोख्या, आकर्षक दागिन्यांच्या कलेक्शनचे अधिकृत लाँचची घोषणा केली आहे. ‘फ्रेंड्स’ आणि कॅरेटलेनने मिळून तयार केलेले हे कलेक्शन सोने आणि हिऱ्यांच्या जगात सिटकॉमच्या लोकप्रियतेचा अनुभव घेऊन येते. मैत्री दिनाच्या निमित्ताने भारतात लाँच करण्यात आलेले हे कलेक्शन ग्राहकांसाठी एक खास पर्वणी ठरत आहे.

जगभरात ‘फ्रेंड्स’ ह्या शोचे कोट्यवधी चाहते आहेत. आज अनेक पिढ्या ह्या शोला त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग मानतात. पॉप संस्कृती आणि मैत्रीवर या शोने स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. हे कलेक्शन ९० आणि २००० च्या दशकातील तरुणांमध्ये शोच्या आठवणी व त्यावरील प्रेम पुन्हा जागृत करते हीच ती पिढी आहे जी चँडलरच्या व्यंगाचे अनुकरण करत आणि फीबीच्या गाण्यांवर थिरकत मोठी झाली आहे. ९ कॅरेट आणि १४ कॅरेट सोने, इनॅमल आणि हिऱ्यांनी बनवलेल्या या कलेक्शनमध्ये ३० हून अधिक डिझाईन्स आहेत, जी जुन्या आठवणींना उजाळा देतात. सिटकॉममधील सुप्रसिद्ध घटकांपासून प्रेरित डिझाइन्स यामध्ये आहेत जसे की, लॉबस्टर, सोफा, स्मेली कॅट, पिवळी दरवाजाची चौकट आणि जोईचा पिझ्झा.

श्री.शोमेन भौमिक, व्यवस्थापकीय संचालक, कॅरेटलेन म्हणाले,“कॅरेटलेनमध्ये, आम्ही नेहमीच असे मानत आलो आहोत की दागिने असे असावेत की त्यांनी तुमची कहाणी सांगावी. एका संपूर्ण पिढीसाठी, F.R.I.E.N.D.S शो हा त्यांच्या कथेचा एक भाग आहे. वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी ग्लोबल कंझ्युमर प्रॉडक्ट्ससोबत पुन्हा एकदा सहयोग करून आणि हा आयकॉनिक आयपी तयार करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्हाला आमच्या विद्यमान हॅरी पॉटर आणि द पॉवरपफ गर्ल्स कलेक्शनमध्ये हे जोडताना खूप अभिमान वाटत आहे. आमचे ब्रँड वाक्य “खुल के करो एक्सप्रेस” च्या अनुषंगाने, हे कलेक्शन ग्राहकांना आठवणींच्या दुनियेत घेऊन जाईल, आणि आयुष्याला अधिक मौल्यवान आणि अविस्मरणीय बनवणाऱ्या मैत्रीचे महत्त्व साजरे करते.”

या लाँचच्या निमित्ताने कॅरेटलेनने आपल्या ग्राहकांना ह्या लोकप्रिय सिटकॉमच्या जगाचा अद्भुत अनुभव देण्यासाठी मॉल ॲक्टिव्हेशनचे आयोजन केले होते. या रोमांचक कार्यक्रमात F.R.I.E.N.D.S. बद्दल अनेक मनोरंजक तथ्ये सादर केली गेली, ज्यामुळे एक हलकेफुलके, जुन्या आठवणींना उजाळा देणारे आणि विनोदी वातावरण निर्माण झाले होते. तिथे भेट देणाऱ्यांना मोफत स्टिकर्स कार्ड्स दिली गेली. F.R.I.E.N.D.S. प्रेरित क्षण टिपण्यासाठी एक मजेदार फोटो बूथ, तसेच सोशल मीडियावर रीपोस्ट करण्यासाठी मोफत पोलरॉइड्स देखील उपलब्ध होते. ग्राहकांना उत्साहित करण्यासाठी आणि ब्रँडप्रती त्यांचे प्रेम अधिक दृढ करण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली होती.

Related posts

*खेतान अँड कं., मेकमायट्रिप आणि शार्दुल अमरचंद मंगलदास लिंक्‍डइनच्‍या २०२५ टॉप मिडसाइज कंपनीज इंडिया लिस्‍टमध्‍ये अनुक्रमे टॉप ३ स्‍थानावर* ● कायदा, तंत्रज्ञान, आरोग्‍यसेवा क्षेत्रांमधील कंपन्‍यांनी टॉप १५ स्‍थानांपैकी १० स्‍थान मिळवले आहेत. ● १५ पैकी १४ मिडसाइज कंपन्‍या मुंबई (४), दिल्‍ली-एनसीआर (४), हैदराबाद (३) आणि बेंगळुरू (३) येथील आहेत भारत, १५ एप्रिल २०२५: लिंक्‍डइन (LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल नेटवर्कने आज भारतासाठी २०२५ टॉप मिडसाइज कंपनीज लिस्‍टचे अनावरण केले, ज्‍यामध्‍ये जगभरातील ५,०००० पेक्षा कमी कर्मचारी आणि भारतातील किमान २५० कर्मचारी असलेल्‍या, तसेच प्रोफेशनल्‍स त्‍यांचे करिअर घडवू शकतील अशा १५ कंपन्‍यांचा समावेश आहे. प्‍लॅटफॉर्मवरील लाखो प्रोफेशनल्‍सच्‍या एक्टीव्हिटीजच्‍या आधारावर ही लिस्‍ट या कंपन्‍यांमधील मागणीत असलेली कौशल्‍ये, टॉप लोकेशन्‍स आणि सर्वात मोठ्या जॉब फंक्‍शन्‍सबाबत माहिती देते, ज्‍यामुळे नोकरीसाधकांना त्‍यांच्‍या भावी संधीचा शोध घेण्‍यास मदत होते. प्रगती करण्‍याची क्षमता, कौशल्‍ये वाढ, बाह्य संधी आणि कंपनीशी जवळीक यांसह लिंक्‍डइनच्‍या आठ आधारस्‍तंभांमधील डेटामधून मिळवलेली ही लिस्‍ट स्‍पर्धात्‍मक रोजगार बाजारपेठेत टॅलेंटमध्‍ये गुंतवणूक करणाऱ्या आणि सक्रियपणे हायरिंग करणाऱ्या कंपन्‍यांना दाखवते. खेतान अँड कं. (Khaitan & Co) (#1) या वर्षीच्‍या लिस्‍टमध्‍ये अव्‍वलस्‍थानी आहे, ज्‍यानंतर मेकमायट्रिप (MakeMyTrip) (#2) आणि शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कं. (Shardul Amarchand Mangaldas & Co) (#3) यांचा क्रमांक आहे, ज्‍यामधून भारतभरात करिअर संधी निर्माण करण्‍यामध्‍ये कायदा व पर्यटन क्षेत्रांची क्षमता दिसून येते. ते वकील, कायदेशीर सहयोगी, खाते व्यवस्थापक आणि व्यवसाय विकास व्यवस्थापक यांसारख्या पदांसाठी हायर करत आहेत, ज्यामध्ये संवैधानिक कायदा, प्रवास व्यवस्थापन आणि महसूल विश्‍लेषण यांसारख्या कौशल्यांना मोठी मागणी आहे. मुंबई, गुरुग्राम आणि दिल्ली-एनसीआर येथे या हायरिंगचे प्रमाण सर्वाधिक आहे. लिंक्‍डइन करिअर एक्‍स्‍पर्ट आणि भारतातील वरिष्‍ठ व्‍यवस्‍था‍पकीय संस्‍थापिका (Nirajita Banerjee, LinkedIn Career Expert and India Senior Managing Editor) निरजिता बॅनर्जी म्‍हणाल्‍या, ”या वर्षीची लिस्‍ट कंपन्‍यांमधील विकास संधींना प्रकाशझोतात आणते, जेथे टीम्‍स कमी आहेत, भूमिका व्‍यावहारिक आहेत आणि प्रत्‍यक्ष व्‍यवसाय प्रभाव घडवण्‍याची शक्‍यता भरपूर आहे. १५ कंपन्यांपैकी चौदा कंपन्यांचे मुख्यालय मुंबई, दिल्ली-एनसीआर, बेंगळुरू आणि हैदराबाद येथे आहे. मुंबई व दिल्ली-एनसीआरमधील कायदा संस्था सक्रियपणे कायदेशीर टॅलेंटना नियुक्त करत आहेत, बेंगळुरूमध्‍ये सॉफ्टवेअर चाचणी व एआय अॅप्‍लीकेशन्‍स भूमिकांसाठी हायर केले जात आहे आणि हैदराबादमध्‍ये फार्मा, सेमीकंडक्टर आणि मीडिया ऑपरेशन्ससाठी मागणी वाढत आहे. डोमेन ज्ञान, टेक्निकल कौशल्य आणि प्रबळ संवाद व समस्या सोडवण्याची कौशल्ये असलेले प्रोफेशनल्‍स या क्षेत्रांमध्ये काम करतील आणि त्यांना या मिडसाइज कंपन्यांमध्‍ये नोकरी मिळण्याची शक्यता आहे.” या लिस्‍टमधून निदर्शनास येते की, मिडसाइज कंपन्‍या औषध शोध, आरोग्‍यसेवा तंत्रज्ञान व ग्राहक रिटेल अशा विभाग-संबंधित क्षेत्रांमध्‍ये करिअर संधी देत आहेत. अॅराजेन लाइफ सायन्‍सेस (Aragen Life Sciences) (#4) जेनेटिक इंजीनिअरिंग व फार्मास्‍युटिकल मॅन्‍युफॅक्‍चुरिंग कौशल्‍ये असलेल्या प्रोफेशनल्‍सना हायर करत आहे, तर ट्रायकॉग हेल्‍थ (Tricog Health) (#7) बायोमेडिकल इंजीनिअरिंग व सार्वजनिक आरोग्‍यामधील कौशल्‍याची आवश्‍यकता असलेल्‍या पदांवर लक्ष केंद्रित करते आहे. नायका (Nykaa) (#5) ब्‍युटी अॅडवायजर, ब्रँड मॅनेजर व शॉप मॅनेजर अशा पदांसह रिटेल, कॉस्‍मेटोलॉजी आणि कॉन्‍सेप्‍चुअर आर्टमध्‍ये संधी निर्माण करत आहे. लिंक्‍डइन लिस्‍टनुसार सास्‍केन टेक्‍नॉलॉजीज (Sasken Technologies) (#9) आणि मॉसचिप (MosChip) (#13) यांसारख्‍या कंपन्‍या इंजीनिअरिंग व डिझाइनमध्‍ये करिअर घडवण्‍यास मदत करत आहेत. ते डिझाइन इंजीनिअर्स, एम्‍बेडेड सॉफ्टवेअर इंजीनिअर्स आणि सिस्‍टम इंजीनिर्सना हायर करत आहेत, जेथे सिग्‍नल प्रोसेसिंग, इलेक्‍ट्रॉनिक कंट्रोल सिस्टम्‍स आणि मोबाइल अॅप्‍लीकेशन डेव्‍हलपमेंटमधील कौशल्‍यांसाठी मागणी वाढत आहे. लिस्‍टमधील इतर कंपन्‍यांमध्‍ये जनसंपर्क, शिक्षण तंत्रज्ञान, ना-नफा तत्त्‍वावर आधारित सेवा आणि होम सर्विसेसमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. अॅडफॅक्टर्स पीआर (Adfactors PR) (#8), प्रदान (PRADAN) (#10), एक्सेलसॉफ्ट टेक्‍नॉलॉजीज (Excelsoft Technologies) (#11) आणि अर्बन कंपनी (Urban Company) (#12) अकाउंट एक्झिक्युटिव्ह, सॉफ्टवेअर इंजीनिअर, डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट व बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट यांसारख्या भूमिकांसाठी हायर करत आहेत. या कंपन्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स, अॅक्टिव्ह लर्निंग, पब्लिक पॉलिसी आणि कॉस्मेटोलॉजी कौशल्ये असलेल्या टॅलेंटला हायर करत आहेत. २०२५ टॉप मिडसाइज कंपनीज इंडिया लिस्‍टमध्‍ये प्रवेश मिळवलेल्‍या १५ कंपन्‍या पुढीलप्रमाणे: 1. खेतान अँड कं. (Khaitan & Co) 2. मेकमायट्रिप (MakeMyTrip) 3. शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कं. (Shardul Amarchand Mangaldas & Co) 4. अॅराजेन लाइफ सायन्‍सेस (Aragen Life Sciences) 5. नायका (Nykaa) 6. सिरील अमरचंद मंगलदास (Cyril Amarchand Mangaldas) 7. ट्रायकॉग हेल्‍थ (Tricog Health) 8. अॅडफॅक्‍टर्स पीआर (Adfactors PR) 9. सास्‍केन टेक्‍नॉलॉजीज लिमिटेड (Sasken Technologies Limited) 10. प्रोफेशनल असिस्‍टण्‍स फॉर डेव्‍हलपमेंट अॅक्‍शन (प्रदान) (Professional Assistance For Development Action (PRADAN)) 11. एक्‍सेलसॉफ्ट टेक्‍नॉलॉजीज (Excelsoft Technologies) 12. अर्बन कंपनी (Urban Company) 13. मॉसचिप (MosChip®️) 14. मीडिया मिंट (MediaMint) 15. ट्रायकॉन इन्‍फोटेक (Tricon Infotech) लिंक्‍डइन न्‍यूज इंडियाद्वारे २०२५ टॉप मिड-साइज कंपनीज इंडियावरील संपूर्ण लेख येथे पहा.

Shivani Shetty

टाटा मोटर्सने भारतातील एलएनजी ट्रकिंग परिसंस्‍थेला प्रगत करण्‍यासाठी थिंक गॅससोबत सहयोग केला

Shivani Shetty

५ कारणे किया सोनेट एचटीके+ यादीत अव्वल आहे

Shivani Shetty

Leave a Comment