मुंबई, १० जुलै २०२५:* जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या मुंबईमधील आघाडीच्या मल्टी-स्पेशलिटी चतुर्थक केअर हॉस्पिटलला महत्त्वपूर्ण नेतृत्व परिवर्तनाची घोषणा करताना आनंद होत आहे. अध्यक्ष म्हणून सेवा वाहिलेल्या श्रीमती कांता मसंद आता चेअरपरसन एमेरिटसची मानक भूमिका सांभाळतील. जसलोक समुदायामध्ये दीर्घकाळापासून विश्वस्त आणि प्रमुख व्यक्ती असलेले श्री. विनोद पी. चनराय यांनी अध्यक्षपद स्वीकारले आहे.
श्रीमती मसंद यांच्या नेतृत्वाखाली जसलोक हॉस्पिटलने क्लिनिकल सेवा, पायाभूत सुविधा आणि समुदाय पोहोचण्यामध्ये अपवादात्मक वाढ केली आहे. रुग्णांना प्रथम स्थान देण्याची त्यांची दृढ भावना आणि हॉस्पिटलच्या स्थापनेच्या ध्येयाप्रती त्यांची कटिबद्धता यातून त्यांचा कार्यकाळ निश्चित झाला आहे. कोविड-१९ साथीच्या काळात जसलोक अॅनेक्सची स्थापना आणि त्यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत मुंबईतील खाजगी हॉस्पिटल्समध्ये सर्वाधिक संख्येने कोविड-१९ लसीकरण करणे हे उल्लेखनीय टप्पे आहेत. बाल आशा अनाथाश्रमातील त्यांच्या कटिबद्धतेमधून सामाजिक जबाबदारीप्रती त्यांचा पाठिंबा दिसून येतो.
या प्रबळ पायाला अधिक दृढ करत श्री. विनोद पी. चनराय यांनी हॉस्पिटलच्या भविष्यासाठी स्पष्ट दृष्टिकोनासह अध्यक्षपद स्वीकारले आहे. तंत्रज्ञान, नाविन्यता आणि प्रशासनामध्ये पार्श्वभूमी असलेले श्री. चनराय यांनी हॉस्पिटलच्या आयटी परिवर्तनाला गती देण्यामध्ये, कॉर्पोरेट प्रशासन प्रबळ करण्यामध्ये आणि संशोधन व वैद्यकीय शिक्षण वाढवण्यामध्ये विश्वस्त म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वामधून डिजिटल परिवर्तन, शैक्षणिक सर्वोत्तमता आणि नेक्स्ट-जनरेशन आरोग्यसेवा वितरणावरील नवीन फोकस दिसून येतो. हे परिवर्तन प्रबळ प्रशासन, नैतिक व सर्वसमावेशक आरोग्यसेवा आणि संशोधन व तंत्रज्ञानाचे पाठबळ असलेले वैद्यकीय नेतृत्व याप्रती जसलोक हॉस्पिटलच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करते.
आपल्या प्रवासाबाबत सांगताना *चेअरपरसन एमेरिटस श्रीमती कांता मसंद म्* हणाल्या, “जसलोक फक्त हॉस्पिटल नाही तर आस्था, काळजी, करुणा व कटिबद्धतेची उत्साही संस्था आहे, जेथे परंपरा व प्रगतीचे संयोजन आहे. रुग्ण कल्याण आणि उद्देशावर प्रत्येक निर्णय अवलंबून असलेल्या या हॉस्पिटलमध्ये सेवा करणे हा माझ्या आयुष्यातील सन्मान आहे. या नवीन पदभारामध्ये मी आमच्या संस्थापक मूल्यांचे पालन करेन आणि हॉस्पिटलचे धोरणात्मक भविष्य घडवण्यामध्ये मार्गदर्शन करेन. माझा दृढ विश्वास आहे की, विनोद यांच्या दूरदर्शी दृष्टिकोनासह जसलोक दयाळूपणा व क्षमतेसह उज्ज्वल भविष्य घडवण्यास सज्ज आहे.”
आपल्या नवीन पदाबाबत मत व्यक्त करत *अध्यक्ष श्री. विनोद पी. चनराय* म्हणाले, “जसलोक हॉस्पिटलमध्ये अध्यक्षपदाची भूमिका पार पाडणे हा सन्मान आणि जबाबदारी आहे. श्रीमती मसंद यांनी मांडलेल्या चिरस्थायी मूल्यांच्या मार्गदर्शनाखाली मी जसलोकला स्थिरता, करुणा आणि अत्याधुनिक आरोग्यसेवेने परिभाषित केलेल्या भविष्याकडे घेऊन जाण्यास उत्सुक आहे. यामध्ये नाविन्यतेचा अवलंब, आमचे शैक्षणिक ध्येय वाढवणे आणि रुग्णसेवेमध्ये अर्थपूर्ण सुधारणा करण्यासाठी एआयच्या एकत्रीकरणाचा शोध घेणे, यांचा समावेश आहे.”
उत्क्रांतीसाठी नेतृत्वामध्ये बदल महत्त्वाचे असतात. श्रीमती मसंद यांचे योगदान अमूल्य राहिले आहे आणि प्रत्येक निर्णयात त्यांनी आणलेले कौशल्य व सचोटी मी स्वतः पाहिली आहे. आम्ही श्री. चनराय यांचे अध्यक्ष म्हणून मोठ्या आशेने स्वागत करतो. त्यांचा दृष्टीकोन व दूरदृष्टी जसलोक २.० मध्ये परिवर्तनकारी आयामाची भर करेल, ज्यामध्ये आधुनिक पायाभूत सुविधा, नाविन्यता आणि रुग्ण-केंद्रित्व यांचा समावेश आहे.”

