maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

नेस्ले प्रोफेशनल्सने भारतात गाठला 1,000वे रिटेल वन किऑस्क लक्षणीय टप्पा

देशभरात आपला विस्तार साधण्याचे प्रयत्न यापुढेही सुरू राहणार

नेस्ले प्रोफेशनल या नेस्ले इंडियाच्या आऊट-ऑफ-होम बिझनेस युनिटने आपल्या 1000 रिटेल वन किऑस्कच्या निमित्ताने आपल्या वाटचालीतला एक लक्षणीय टप्पा गाठला आहे, जी आज देशभरात सुरू आहेत.

या महत्वाच्या टप्प्याविषयी बोलताना नेस्ले प्रोफेशनलचे प्रमुख सौरभ मखिजा म्हणाले, “1000 रिटेल वन किऑस्क्सचा आम्ही गाठलेला टप्पा म्हणजे भविष्यासाठी नवे उपभोक्ता स्तंभ उभारण्यावर आणि एकीकृत ब्रॅण्ड अनुभवाच्या माध्यमातून आमची उत्पादने आऊट-ऑफ-होम स्वरूपात विकत घेण्याच्या प्रसंगांच्या शक्यता खुल्या करण्यावर दिलेला भर यांचे मूर्त उदाहरण आहे. या वाढीमुळे भारताच्या संपूर्ण फूड सर्व्हिस परिसंस्थेमध्ये उपजीविकेचे अर्थपूर्ण मार्ग आणि विविधता यांना प्रेरणा मिळत आहे, या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे.”

नेसकॅफे कॉर्नर्स, मॅगी हॉटस्पॉट्स आणि किटकॅट ब्रेक झोन्ससारख्या विक्रीकेंद्रांच्या लोकप्रिय प्रकारांचा समावेश असलेल्या रिटेल वन नेटवर्कने शैक्षणिक संस्था, आरोग्य संस्था आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांसारख्या ठिकाणी धोरणीपणे आपल्या पाऊलखुणा पोहोचवल्या आहेत. 398 ऑपरेटर्स, 1,586 फूड हॅण्डलर्स, 255 महिला व 6 दिव्यांग व्यक्ती यांचा समावेश असलेल्या प्रबळ आणि विविधतापूर्ण कर्मचारीवर्गाचे बळ या नेटवर्कला लाभले आहे – ज्यातून समावेशक वाढ व अन्न सेवा उद्योगामध्ये रोजगारनिर्मितीप्रती नेस्ले प्रोफेशनल्सची बांधिलकी अधोरेखित होते.

नेस्ले इंडियाच्या काही सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या उद्योगांपैकी एक असलेले नेस्ले प्रोफेशनल्स ग्राहकांना, अगदी त्यांच्या घरांच्या आरामदायी वातावरणाबाहेरही आपली सेवा पुरविण्याप्रती सदैव कटिबद्ध आहे.

Related posts

डिस्ट्रिक्‍ट बाय झोमॅटोकडून सर्वोत्तम पाककला अनुभव सादर, कोटक सॉलिटेअर क्रेडिट कार्ड ग्राहकांना विशेष प्रथम उपलब्‍धता

Shivani Shetty

टोयोटा किर्लोस्कर मोटर ने बीएलडीईए के वाइस प्रेसिडेंट डॉ. पीजी हलकट्टी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी, विजयपुरा के साथ करार किया

Shivani Shetty

हिंदुस्‍तान कोका-कोला बेव्‍हरेजेस् (एचसीसीबी)ने महाराष्‍ट्रसह १०० शाळांमध्‍ये डिजिटल स्‍मार्टबोर्डस् स्‍थापित केले

Shivani Shetty

Leave a Comment