maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

एडब्ल्यूएल व्हर्च्युअल रिऍलिटी द्वारे भाविकांसाठी अभियान राबवणार

मुंबई, ३ जुलै २०२५ – भारतातील सर्वात मोठ्या फूड एफएमसीजीकंपन्यांपैकी एक, एडब्ल्यूएल अ‍ॅग्री बिझनेस लिमिटेडने भाविकांनारथयात्रा २०२५ चा अनोखा अनुभव देण्याची तयारी केली आहे. यातपारंपरिक पाककृती आणि बहुविध तंत्रज्ञानाचे मिश्रण करून बदलकेला जाणार आहे. या वर्षी डिजिटल आणि भौतिक, असे दोन्हीअनुभव देणारी सात–घटकांची व्यापक रणनीती असलेली एक मोहीमकंपनी मोठ्या प्रमाणात राबवणार आहे. संपूर्ण पुरीमध्ये इमर्सिव्हटेक्नॉलॉजीचा वापर, स्वयंपाकाचे थेट प्रात्यक्षिक, वैयक्तिक काळजीआणि आकर्षक अ‍ॅनामॉर्फिक आउटडोअर आणि ट्रान्झिट ब्रँडिंगद्वारेम्हणजेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून जाहिरात करतलाखो भाविकांना गुंतवून ठेवणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

श्री.मुकेश मिश्रा, संयुक्त अध्यक्ष, विक्री आणि विपणन, एडब्ल्यूएलअ‍ॅग्री बिझनेस लिमिटेड म्हणाले,“आम्ही नेहमीच स्थानिक गोष्टींनाप्राधान्य देतो, जे आम्हाला आमच्या प्रेक्षकांशी अधिक चांगल्या प्रकारेजोडण्यास मदत करतात. आमचा हा स्थानिक दृष्टिकोन प्रादेशिक, सांस्कृतिक आणि पसंतीच्या पाककृतींच्या सखोल आकलनावरआधारित आहे, ज्यामुळे आम्ही ब्रँडच्या माध्यमातून अधिक प्रामाणिकआणि अर्थपूर्ण मार्गांनी ग्राहकांशी जोडले जाऊ शकतो. जगन्नाथरथयात्रेसारख्या अध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये हेतत्वज्ञान आमच्या उपस्थितीचे दर्शक आहे. रथयात्रा 2025 मधीलआमचे ध्येय परंपरेचे नावीन्यपूर्ण मिश्रण करून या अनोख्या सांस्कृतिककार्यक्रमाचा सन्मान करणे हे आहे. म्हणूनच आम्ही एका व्हीआरअनुभवाचा भक्तांसाठी संपूर्ण बहु–संवेदी प्रवासापर्यंत विस्तार केलाआहे, तसेच प्रसादाची व्हर्च्युअल स्वयंपाक सत्रे, मंदिरांचे डिझाइनअसलेला रेसिपी झोन आणि लाइव्ह किचन यासारख्या अनुभवांसह, आम्ही भक्तांना फॉर्च्यून आणि अलाइफ सारख्या आमच्या ब्रँडशीसंवाद साधण्याची संधी देतो. आणि पारंपरिक पद्धतीने उत्सव साजराकरत भक्तांचा विश्वास मनापासून साजरा करतो.”

या वर्षी उत्सवाच्या केंद्रस्थानी 40 फूट उंच पोस्टरद्वारे कंपनीचा प्रमुखब्रँड फॉर्च्युन आपली उपस्थिती दर्शवेल. फॉर्च्युन झोनमध्ये तीन वेगळेअनुभव येतील एक मिक्स्ड रिऍलिटी (MR) आणि व्हर्च्युअल रिऍलिटी(VR) झोन, नमुन्यांसह स्वयंपाकाचे लाइव्ह प्रात्यक्षिक आणि ब्रँडकंटेंटसह ग्राहकांना गुंतवून ठेवण्यासाठी एक मोठी LED स्क्रीन. याझोनमधील एक विशेष आकर्षण म्हणजे यात सहभागी होणाऱ्यांनाव्हीआर हेडसेट–ऑक्युलस घालून प्रत्यक्ष फॉर्च्यून उत्पादनांचा वापरकरून खिचडीसारखे पारंपरिक महाप्रसाद करण्याची संधी मिळेल. त्यानंतर हे भक्त जगन्नाथ मंदिरात प्रसाद अर्पण करण्यासाठीव्हर्च्युअल रिऍलिटी वातावरणात जातील.

याव्यतिरिक्त, स्वतःची काळजी घेण्यासाठी मदत करणारा कंपनीचाब्रँड ‘अलाइफ’ हा उपयुक्ततेवर आधारित उत्तम अनुभव देईल. स्नानानंतर भाविकांना ताजेतवाने होण्यासाठी समुद्रकिनाऱ्याजवळ एकचेंजिंग स्टेशन उभारले जाईल.यासोबतच फॉर्च्युन–ब्रँडेड ई–रिक्षांचाताफा पर्यटकांना शहरातून फिरवून आणेल, ज्यामुळे आराम तरमिळेलच पण पर्यटकांची सोयही होईल. पुरी समुद्रकिनाऱ्यावर एकमोठी एलईडी स्क्रीन लावली जाणार असून त्यात आकर्षक अनॅमॉर्फिककंटेंट दाखवला जाईल, ज्यामुळे एकूणच उत्सवाच्या वातावरणाला चारचांद लागतील.

Related posts

व्हिसा: बिगर-महानगरीय क्षेत्रांमध्ये कार्डद्वारे केल्या जाणाऱ्या खर्चातील १७५ टक्‍के डिजिटल पेमेंट्समध्ये वाढ

Shivani Shetty

टाटा मोटर्सकडून लखनौ आणि रायपूरमध्‍ये अडवान्‍स्‍ड वेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटी – Re.Wi.Re चे उद्घाटन

Shivani Shetty

भारतातील वर्किंग प्रोफेशनल्स करिअर प्रगतीबाबत अधिक सजग

Shivani Shetty

Leave a Comment