maharashtraprimenews
ठळक बातम्या
ठळक बातम्यानवीन बुक लाँच

भारतीय तरुण लेखक, शास्त्रज्ञाने लिहिली एलॉन मस्क यांची प्रेरणादायक चरित्रकथा

मुंबई | 28 जून २०२५: नव्या भारतातील १८ वर्षीय यशस्वी लेखक आणि शास्त्रज्ञ विवान करुळकर यांनी आपले तिसरे पुस्तक “Elon Musk: The Man Who Bends Reality” प्रकाशित केले आहे. हे पुस्तक आधुनिक युगातील सर्वात प्रभावशाली आणि दूरदृष्टी असलेल्या जागतिक उद्योजक एलॉन मस्क यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी चरित्रकथा आहे.

विवान करुळकर हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रसिद्ध तरुण लेखक व शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी लिहिलेली सनातन धर्मावर आधारित दोन पुस्तके , “The Sanatan Dharam: True Source of All Science” आणि “The Sanatan Dharam: True Source of All Technology” , देशभरातील मान्यवर आणि आध्यात्मिक संतांकडून प्रशंसित झाली आहेत. केवळ १५ वर्षांची वय असताना, विवानने Near Earth Objects (NEOs) च्या शोधासंबंधी संशोधनासाठी In-Principle Patent प्राप्त करून विज्ञानाच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठला. हे यश मिळवणारा तो जगातील सर्वात तरुण संशोधकांपैकी एक आहे.

१६ व्या वर्षी विवानने आपले पहिले पुस्तक “The Sanatan Dharam: True Source of All Science” प्रकाशित केले. हे पुस्तक २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील राम मंदिरात श्री चंपत राय (मंदिर न्यासाचे सरचिटणीस) यांच्या हस्ते राम लल्लाच्या गर्भगृहात ठेवून प्रकाशित करण्यात आले , ही एक ऐतिहासिक आणि भावनिक क्षण ठरली.

यानंतर, १७ व्या वर्षी त्यांचे दुसरे पुस्तक “The Sanatan Dharam: True Source of All Technology” १५ नोव्हेंबर २०२४ रोजी प. पू. सरसंघचालक श्री मोहन भागवत जी आणि ISRO चे अध्यक्ष श्री एस. सोमनाथ यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकांनी प्राचीन भारतीय ज्ञान व आधुनिक विज्ञान यामधील संबंध विशद करत विवानचे वेगळेपण अधोरेखित केले.

आता, केवळ १८ व्या वर्षी, विवानने आपल्या नवीन पुस्तकाद्वारे एलॉन मस्क यांच्या जीवनातील प्रेरणादायी गोष्टी व अज्ञात पैलूंवर प्रकाश टाकला आहे. वयाच्या ८ व्या वर्षीपासूनच विवान एलॉन मस्क यांना आदर्श मानत आला आहे. गेल्या १० वर्षांपासून त्याने मस्क यांच्या कार्यपद्धती, नवोन्मेषशील दृष्टिकोन आणि जग बदलणाऱ्या निर्णयांचा सखोल अभ्यास केला आहे

Related posts

२६/११ च्या धर्तीवर मुंबईत तीन ठिकाणी पुन्हा बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क

cradmin

PURE EV ने 201 KM रेंजसह ePluto 7G MAX लाँन्च

Shivani Shetty

विद्यार्थ्यांना शिकवून घरी जाताना शिक्षिकेला रस्त्यातच मृत्यूने गाठलं; डंपरखाली चिरडून गमावले प्राण

cradmin

Leave a Comment