maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsPublic Interestचित्रपटठळक बातम्याबॉलीवूडमनोरंजन

सितारे जमीन पर” ने बॉक्स ऑफिसवर केली धडाकेदार सुरुवात – आमिर खानचा जादू पुन्हा एकदा यशस्वी*

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आमिर खानची नवी चित्रपट “सितारे जमीन पर” अखेर २० जून २०२५ रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित झाली असून, याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या क्लासिक “तारे जमीन पर”चा स्पिरिचुअल सिक्वेल मानला जात असून, त्याची कथा प्रेरणादायक आणि हृदयस्पर्शी आहे.

चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी देशभरातून प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला असून, ₹ ११.७ कोटींचा जबरदस्त ओपनिंग डे कलेक्शन नोंदवण्यात आला आहे. सकारात्मक प्रतिक्रिया, तोंडी प्रसार (माउथ-ऑफ-वर्ड) आणि सोशल मीडियावरील चर्चेमुळे चित्रपटाविषयी उत्सुकता अधिकच वाढली आहे. वीकेंड जवळ येत असताना, या कमाईत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

या चित्रपटात आमिर खानसोबत अभिनेत्री जेनेलिया देशमुख प्रमुख भूमिकेत दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाद्वारे १० नवोदित कलाकारांचे भव्य पदार्पण होत आहे. हे कलाकार म्हणजे – अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषि शाहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर. या नव्या चेहऱ्यांनी चित्रपटाच्या उत्सवाला अधिकच रंगत आणली आहे.

Related posts

अपोलो नवी मुंबईने सुरु केले संडे क्लिनिक

Shivani Shetty

किया सेल्टोस, सॉनेट आणि कॅरेन्सचा देखभालीचा खर्च सर्वात कमी: फ्रॉस्ट अँड सुलिव्हॅन

Shivani Shetty

राहण्यासाठी घराचा शोध घेणे होणार सोपे

Shivani Shetty

Leave a Comment