maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

जनरेशन झेड एकट्याने प्रवास करत आहेत, यूपीआयच्‍या माध्‍यमातून पेमेंट करत आहेत आणि लॉयल्‍टी कॉईन्‍स रिडिम करत आहेत: क्‍लीअरट्रिप डेटामधून जनरेशन झेडच्‍या साहसी नवीन प्रवास करण्‍याच्‍या पद्धतीचा उलगडा

बेंगळुरू, जून १२, २०२५: जनरेशन झेड पिढी एकट्याने प्रवास करत आहे, स्‍वत:हून डिजिटली पेमेंट करत आहेत. क्‍लीअरट्रिप या फ्लिपकार्ट कंपनी आणि भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्‍या ऑनलाइन प्रवास तंत्रज्ञान प्‍लॅटफॉर्मने आपल्‍या नवीन अहवालामधील नवीन डेटा जारी केला आहे. या डेटामधून निदर्शनास येते की, जनरेशन झेड पर्यटक भारतातील ट्रॅव्‍हल क्षेत्राला नवीन आकार देत आहेत. प्रबळ डिजिटल व महत्त्वाकांक्षी मानसिकतेसह हा समूह आधुनिक काळातील प्रवास करण्‍याच्‍या पद्धतींचा मोठ्या प्रमाणात अवलंब करत आहे, ज्‍यामधून स्‍वावलंबीत्व, स्थिरता आणि आरामदायी व वैयक्तिक स्‍वातंत्र्यावर खर्च करण्‍याची इच्‍छा दिसून येते.

”जनरेशन झेड पर्यटक प्रवासाच्‍या नियमांना नवीन आकार देत आहेत. त्‍यांच्‍यासाठी प्रवास फक्‍त विरंगुळा नाही तर जीवनशैली निवड असण्यासोबत त्‍यामधून ते स्‍वयं-अभिव्‍यक्‍ती व्‍यक्‍त करण्‍याचा प्रयत्‍न करतात,” असे क्‍लीअरट्रिपचे प्रवक्ता म्‍हणाले. ‘ते स्‍वावलंबी, डिजिटली जाणकार आहेत आणि वैयक्तिकृत, आरामदायी अनुभवांवर खर्च करण्‍यासाठी अधिक उत्‍सुक आहेत. तसेच ते समकालीन ग्रुपने प्रवास करण्‍यापेक्षा एकट्याने किंवा मनाजोगता प्रवास करण्‍याला प्राधान्‍य देत आहेत.”

क्‍लीअरट्रिप जनरेशन झेड ट्रॅव्‍हल रिपोर्टमधील ठळक वैशिष्‍ट्ये:

जनरेशन झेड पिढी एकट्याने प्रवास करण्‍याला प्राधान्‍य देत आहे

क्‍लीअरट्रिप डेटानुसार, जनरेशन झेड पिढी अधिककरून एकट्याने प्रवास करण्‍याला प्राधान्‍य देत आहे, जेथे इतर वयोगटांच्‍या तुलनेत या समूहामध्‍ये एकट्याने प्रवास करण्‍याचे प्रमाण ७ टक्‍के आहे. यामधून समकालीन कौटुंबिक ट्रिप्‍समध्‍ये मोठे बदल होत असल्‍याचे दिसून येते, जेथे बजेट व निवडी ठरवल्‍या जातात आणि ट्रिपमध्‍ये वयोवृद्ध सदस्‍य देखील असतात. आजच्‍या काळातील जनरेशन झेड पर्यटक त्‍यांच्‍या आवडीचे आणि उत्‍साहपूर्ण अनुभव देणाऱ्या गंतव्‍यांना एक्‍स्‍प्‍लोअर करतात, जेथे समकालीन पर्यटन स्‍थळांऐवजी साहस, निसर्ग आणि शांतमय गंतव्‍यांवर लक्ष केंद्रित करत आहेत.

स्‍मार्ट व स्थिर पेमेंट्स जनरेशन झेड पिढीच्या प्रवास निवडींना परिभाषित करतात
या स्‍वावलंबी प्रवास करण्याच्या मानसिकतेमधून ट्रिप्‍ससाठी त्‍यांच्‍या पेमेंट करण्‍याच्‍या पद्धती देखील निदर्शनास येतात. जनरेशन झेड क्रेडिट कार्ड्सपेक्षा यूपीआय आणि डेबिट कार्डाचा वापर करत आहेत, जेथे इतर ग्रुप्‍सच्‍या तुलनेत १० टक्‍के अधिक यूपीआय व्‍यवहार केले जातात. ईएमआय-आधारित ट्रॅव्‍हल पेमेंट्सना मोठ्या प्रमाणात प्राधान्‍य दिले जात आहे, जेथे १० टक्‍क्‍यांहून अधिक जनरेशन झेड युजर्स या मोडचा अवलंब करत आहेत. यामधून जनरेशन झेडची बजेटच्‍या अडचणींवर मात करत आरामदायीपणे प्रवास करण्‍याची प्रबळ महत्त्वाकांक्षा दिसून येते.

जनरेशन झेड सोयीसुविधेला प्राधान्य देतात
आणखी एक उदयोन्‍मुख ट्रेण्‍ड म्‍हणजे प्रौढ व्‍यक्‍तींच्‍या तुलनेत जनेरशन झेड पिढी कार्डचा वापर करत बुकिंग्‍ज करण्‍यामध्‍ये वाढ झाली आहे; यामधून सोयीसुविधा आणि संपूर्ण सर्विस मिळण्‍याला प्राधान्‍य दिले जात असल्‍याचे निदर्शनास येते.

स्थिरता आणि मूल्‍य प्रमुख स्रोत आहेत
जनरेशन झेड पर्यटक क्‍लीअरट्रिपच्‍या क्‍लीअरचॉईस सारख्‍या स्थिर प्रवास पर्यायांचा अवलंब करण्‍याची शक्‍यता आहे, यामधून ते सहजतेला आणि त्‍यांच्‍या इच्‍छेप्रमाणे प्रवास करण्‍याला प्राधान्‍य देत असल्‍याचे दिसून येते. तसेच, १० पैकी एक सुपरकॉईन्‍स सारखे रिवॉर्ड पॉइण्‍ट्स रिडिम करण्‍याची आणि इतर वयोगटांच्‍या तुलनेत ट्रॅव्‍हल कूपन्‍स दीडपटीहून अधिक वापरण्‍याची शक्‍यता आहे, यामधून मूल्‍य-केंद्रित प्रवासावरील त्‍यांचा भर दिसून येतो.

Related posts

*एनओव्‍हीएसी ३.०: क्‍लीअरट्रिपच्‍या फ्लॅगशिप ट्रॅव्‍हल सेलचे आकर्षक डिल्‍ससह पुनरागमन* सर्वात मोठा समर ट्रॅव्‍हल महोत्‍सव फ्लाइट्स, हॉटेल्‍स, बसेस् व हॉलिडे पॅकेजेसवरील अद्वितीय डिल्‍ससह परतला आहे! राष्‍ट्रीय, २० मार्च २०२५: समर ट्रॅव्‍हल सीझन जवळ आला असताना क्‍लीअरट्रिप ही फ्लिपकार्ट कंपनी आपल्‍या बहुप्रतिक्षित #NationOnVacation (एनओव्‍हीएसी) सेलच्‍या तिसऱ्या एडिशनसह परतली आहे. २० मार्चपासून सुरू होत असलेला हा ९-दिवसीय ट्रॅव्‍हल महोत्‍सव फ्लाइट्स, हॉटेल्‍स आणि इतर पॅकेजेसवर सर्वात मोठ्या सूट देतो, ज्‍यामुळे ग्राहक अद्वितीय दरांमध्‍ये त्‍यांचे स्‍वप्‍नवत व्‍हेकेशन्‍स बुक करू शकतात. वर्दळीच्‍या प्रवास महिन्‍यांदरम्‍यान विमानभाडे दर किमान १५ टक्‍क्‍यांनी वाढण्‍याची अपेक्षा असताना क्‍लीअरट्रिप ग्राहक बुकिंग वर्तणूकीमधील परिवर्तनाचे नेतृत्‍व करत आहे, तसेच प्रवाशांना आधीच प्रवास योजना आखण्‍यास आणि दरांमध्‍ये वाढ होण्‍यापूर्वी सर्वोत्तम भाडेदरांचा आनंद घेण्‍यास प्रेरित करत आहे. एनओव्‍हीएसी ३.० सह क्‍लीअरट्रिप उद्योग नवप्रवर्तक म्‍हणून आपले स्‍थान अधिक दृढ करत आहे, तसेच किंमतीमधील पारदर्शकता, किफायतशीरपणा आणि स्थिर प्रवास पर्यायांवर लक्ष केंद्रित करत आहे. ग्राहक-केंद्रित नाविन्‍यतेप्रती कटिबद्ध क्‍लीअरट्रिपने ‘क्‍लीअरचॉईस’ उपक्रमांतर्गत आपल्‍या ऑफरिंग्‍ज वाढवत आहे, ज्‍यामुळे प्रवाशांना उत्तम बुकिंग स्थिरतेचा लाभ घेता येईल. क्‍लीअरचॉईस प्‍लस व क्‍लीअरचॉईस मॅक्‍ससह ग्राहक त्‍यांच्‍या बुकिंग्‍जमध्‍ये बदल करू शकतात किंवा संपूर्ण रिफंडसह रद्द करू शकतात, ज्‍यामुळे एअरलाइन बुकिंग रद्दीकरणासाठी कोणतेही शुल्‍क आकारले जाणार नाहीत. मिंत्रा आणि फ्लिपकार्ट लॉयल्‍टी सदस्‍यांना देखील क्‍लीअरिट्रिप व फ्लिपकार्ट ट्रॅव्‍हल प्‍लॅटफॉर्म्‍सवर विशेष सूट व ऑफर्सचा आनंद घेता येईल. या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत क्‍लीअरट्रिपचे चीफ ग्रोथ अँड बिझनेस ऑफिसर अनुज राठी म्‍हणाले, “क्‍ली‍अरट्रिप ट्रॅव्‍हल किंमत मॉडेल्‍समध्‍ये नाविन्‍यतेला चालना देण्‍याप्रती कटिबद्ध आहे. आगामी महिन्‍यांमध्‍ये विमानभाडे दर मोठ्या प्रमाणात वाढण्‍याची अपेक्षा असताना एनओव्‍हीएसीचे हे एडिशन प्रवाशांना सर्व स्‍तरावर पुढे राहण्‍यास मदत करण्‍याची आमची पद्धत आहे. आधीच नियोजन करत ग्राहक किंमत वाढीच्‍या अनिश्चिततेला टाळू शकतात आणि विनासायासपणे, किफायतशीर व उत्‍साहाने प्रवासाचा आनंद घेऊ शकतात.” प्रमुख ऑफर्स: ● ९९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या देशांतर्गत फ्लाइट्स ● ५९९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट्स ● २४९९ रूपयांपासून सुरू होणारे लक्‍झरी हॉटेल्‍स (४- व ५-स्‍टार) ● बस बुकिंग्‍जवर जवळपास ४० टक्‍के सूट ● हॉटेल बुकिंग्‍जवर ३० टक्‍के ते ८० टक्‍के सूट ● मिंत्रा इनसाइडर आयकॉनसाठी १ रूपयामध्‍ये क्‍लीअरचॉईस प्‍लस ● फ्लिपकार्ट व्‍हीआयपीसाठी १ रूपयामध्‍ये क्‍लीअरचॉईस मॅक्‍स सर्व ऑफर्स उपलब्धतेच्या अधीन आहेत आणि मर्यादित कालावधीसाठी वैध आहेत. मूल्य पारदर्शकतेला प्राधान्‍य देत एनओव्‍हीएसी ३.० चा भारतातील प्रवाशांच्‍या ट्रिप प्‍लॅनिंग करण्‍याच्‍या पद्धतीला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याचा मनसुबा आहे. लवकर बुकिंग करून प्रवासी किंमत वाढ टाळू शकतात, अधिक स्थिरता मिळवू शकतात आणि त्यांच्या पैशाचे अधिक मूल्य मिळवू शकतात. गेल्‍या वर्षी बुकिंग्‍जमध्‍ये ८० टक्‍के वाढीसह मिळालेल्‍या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादानंतर क्‍लीअरट्रिप ग्राहक-केंद्रित ट्रॅव्‍हल सोल्‍यूशन्‍स डिझाइन करण्‍याप्रती समर्पित आहे. एनओव्‍हीएसीचे तिसरे एडिशन विविध प्रवाशांसाठी उपलब्‍धता आणि किफायतशीरपणामध्‍ये अधिक वाढ करण्‍यास सज्‍ज आहे.

Shivani Shetty

टाटा मोटर्स आणि बीव्‍हीजी फाऊंडेशनने गूड समरिटन रोड सेफ्टी अॅप विकसित करण्‍यासाठी केली हातमिळवणी

Shivani Shetty

हंगामी हवामान बदलादरम्‍यान रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांचे व्‍यवस्‍थापन

Shivani Shetty

Leave a Comment