maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

डिजिटल पेमेंट करणाऱ्या वडिलांसाठी खास व्हिसा टिप्‍स

आजच्या पिढीचे ‘योलो’ (“YOLO”) वडिलांना कधीच समजले नसेल, पण आजच्‍या युगात त्‍यांना डिजिटल पेमेंट्सबाबत माहिती असणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. यंदा फादर्स डे निमित्त व्हिसा सर्व वडिलांना स्‍मार्टपणे व सुरक्षितपणे पेमेंट निर्णय घेण्‍यास मदत करण्‍यासाठी लक्षात ठेवण्‍यास सोप्या टिप्‍स सांगत आहेत.

1. टीएपी (टॅप) (ट्रस्‍ट, अव्‍हॉइड, प्रोटेक्‍ट): फक्‍त सत्‍यापित व सुरक्षित टर्मिनल्‍सवर विश्‍वास ठेवा, असुरिक्षत सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क्‍स टाळा आणि टू-फॅक्‍टर ऑथेन्टिकेशन (२एफए) सह पैशांचे संरक्षण करा.

2. एलओसीके (लॉक) (लर्न, ऑब्‍जर्व्‍ह, चेक, कीप): उदयोन्‍मुख घोटाळ्यांबाबत माहिती जाणून घेत फसवणूक होण्‍याला टाळा. घोटाळ्यांपासून दूर राहण्‍याासठी चुकीचे यूआरएल किंवा संशयास्‍पद विनंत्‍या असलेल्‍या पेमेंट पेजेसचे निरीक्षण करा. तुमच्‍या व्‍यवहार अलर्ट्सना काळजीपूर्वक तपासा. अॅप पासवर्ड्स, कार्ड कंट्रोल वैशिष्‍ट्ये आणि ट्रॅव्‍हल-मोड सेटिंग्‍जच्‍या माध्‍यमातून पेमेंट्सवर नियंत्रण ठेवा.

3. सीएआरई (केअर) (चेक, ऑथेन्प्टिकेट, रिव्‍ह्यू, एन्‍शुअर प्रायव्‍हसी): ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी, व्यापारी अधिकृत आहे की नाही हे पडताळण्यासाठी पॅडलॉक आयकॉन आणि यूआरएलमध्ये “https://” आहे का ते तपासा. फिंगरप्रिंट किंवा फेस स्कॅनने पेमेंट सत्‍यापित करा. दर महिन्याला बँक स्टेटमेंट्सची तपासणी करा आणि गोपनीयता सुनिश्चित करा – कधीही अविश्‍वसनीय साइट्सवर कार्ड माहिती सेव्‍ह करू नका.

4. अॅक्‍ट फास्‍ट (अलर्ट, कॉन्‍टॅक्‍ट, टर्मिनेट फास्‍ट): फसवणूक झाल्‍यास त्‍वरित तुमच्‍या बॅकेला कळवा आणि सायबरक्राइम हेल्‍पलाइन (१९३० डायल करा) सारख्‍या संबंधित स्‍थानिक प्राधिकरणांशी संपर्क साधा. तुमचे कार्ड फ्रीज करण्‍यासह अधिक नुकसान टाळण्‍यासाठी पैशांचे व्‍यवहार थांबवा.
यंदा फादर्स डेला तुमच्‍या वडिलांना स्‍मार्ट, सुरक्षित डिजिटल पेमेंट्स करण्‍यास सक्षम करा. पेमेंट करण्‍यासाठी टॅप करणाऱ्या वडिलांसाठी बोनस पॉइण्‍ट्सही मिळणार आहेत

Related posts

व्‍हर्टिगो किंवा ‘चक्‍कर येणे’बाबत विचार करत आहात? या सोशल मीडिया संशोधनामधून महत्त्वपूर्ण माहिती मिळते!

Shivani Shetty

एजीएस ट्रान्‍सॅक्‍ट टेक्‍नॉलॉजीज लिमिटेड

Shivani Shetty

भारतातील महिलांच्‍या हृदयाचे आरोग्‍य उत्तम राहण्‍यासाठी अँजाइनाबाबत जाणून घ्‍या

Shivani Shetty

Leave a Comment