maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

‘बॉर्न ऑफ हर’ मदर्स डे साठी हृदयस्पर्शी कॅम्पेन

मुंबई, ९ मे २०२५ :- भारतातील आघाडीचा ओम्नीचॅनेल ज्वेलरी ब्रँड, कॅरेटलेनने लॉन्च केले आहे ‘बॉर्न ऑफ हर’ – मदर्स डे साठी एक हृदयस्पर्शी कॅम्पेन आणि एक स्पेशल एडिशन पेंडेंट कलेक्शन, जे आईचे प्रेम, त्यांची ताकद आणि फार काही न बोलता साहसी कामे करण्याची क्षमता या सगळ्याचा सन्मान करते. मदर्स डेच्या निमित्ताने करण्यात आलेले हे लॉन्च गिफ्टिंगची नवी व्याख्या प्रस्तुत करेल – जिने आपल्या जीवनातील प्रत्येक प्रारंभाला आकार दिला त्या आपल्या आईचा सखोल, अर्थपूर्ण आणि तरीही वैयक्तिक सन्मान!

सोने आणि हिऱ्यापासून बनवण्यात आलेल्या या तीन लिमिटेड-एडिशन पेंडेंट्समध्ये बाळ आणि आई दाखवण्यात आले आहेत – हृदयस्पर्शी डिझाईन असलेला प्रत्येक दागिना केवळ एक भेट नाही तर निस्पृह प्रेमाची आठवण करून देतो, हा एक शाश्वत दागिना आहे जो प्रत्येक पिढीकडून पुढच्या पिढीकडे सोपवला जाईल.

‘बॉर्न ऑफ हर’ हे केवळ एक कॅम्पेन नाही तर एक भावनिक आमंत्रण आहे अशा व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी जिने आपल्याला सर्व काही दिले आहे. कॅम्पेनअंतर्गत, कॅरेटलेन मदर्स डेसाठी एक विशेष गीत देखील प्रस्तुत करणार आहे, हे गीत बीबीएच इंडियाने तयार केले आहे. या गीतामध्ये सर्वांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी आपल्या आईसोबत फोटो आणि त्यांच्या आठवणी पोस्ट कराव्यात आणि आईसोबतच्या नात्याचा आनंद साजरा करावा, हे गीत सोशल मीडियावर प्रसारित केले जाईल.

शेफाली गौतम, चीफ मार्केटिंग ऑफिसर, कॅरेटलेनच्या म्हणाल्या,”आईचे आपल्या मुलांवर प्रेम असते पण ते ती क्वचितच कधीतरी बोलून दाखवते, पण दर दिवशीच्या, अनेक मूक कृतींमधून, त्यांच्या त्यागामधून त्यांचे प्रेम जाणवत राहते. ‘बॉर्न ऑफ हर’ मध्ये आम्ही सर्वांना आमंत्रित करत आहोत – खुल के करो एक्स्प्रेस – आईसाठीचे प्रेम अजून जास्त खुलेपणाने आणि अर्थपूर्ण पद्धतीने एक्स्प्रेस करा. या कलेक्शनमध्ये तीन खास तयार करण्यात आलेली पेंडेंट आहेत, प्रत्येक पेंडेंट आई आणि मुलांमधील नाजूक नात्याचे प्रतीक आहे. ही आमची पद्धत आहे, हे चिरस्थायी नाते मूर्त वस्तूमध्ये परिवर्तित करण्याची, एक असा दागिना जो आई कायमस्वरूपी स्वतःच्या हृदयाच्या जवळ ठेवू शकेल.”

‘बॉर्न ऑफ हर’ कॅम्पेनला सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया आणि देशभरातील रिटेल स्टोर्समध्ये चालवले जाईल. हे कॅम्पेन दागिन्यांना जीवनातील सर्वात महत्त्वाच्या नात्यांच्या अर्थपूर्ण अभिव्यक्तीमध्ये परिवर्तित करण्याचे कॅरेटलेनचे मिशन मजबूत आहे – ही केवळ एक भेट नाही तर एक मूर्त आठवण तयार करणे हे कॅरेटलेनचे मिशन आहे.

Related posts

सॅमसंगकडून भारतात गॅलेक्‍सी एस२५ एफई आणि गॅलेक्‍सी बड्स३ एफई लाँच

Shivani Shetty

टाटा मोटर्स ने सर्वात प्रगत इंटरसिटी प्‍लॅटफॉर्म नवीन टाटा LPO 1822 बस चेसिस लाँच केले*

Shivani Shetty

डोझीचे एआय सुसज्ज रिमोट पेरेंट हेल्थ मॉनिटरिंग सेवा दाखल

Shivani Shetty

Leave a Comment