maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इन्स्टामार्ट-कल्याण ‘ ची भागीदारी

मुंबई, ३० एप्रिल २०२५: भारतातील लोकप्रिय क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म, इन्स्टामार्टने भारतातील सर्वात विश्वसनीय आणि शानदार ज्वेलरी ब्रँड्सपैकी एक, कल्याण ज्वेलर्ससोबत भागीदारी केली आहे. कल्याण ज्वेलर्सने क्विक कॉमर्समध्ये येण्याची ही पहिलीच वेळ आहे. अक्षय तृतीया अगदी जवळ आली आहे, अगदी योग्य वेळी करण्यात आलेल्या या भागीदारीमुळे ग्राहकांना मिळणार आहे थेट इन्स्टामार्टवर सोने आणि चांदीची सर्टिफाईड नाणी खरेदी करण्याची सुविधा, इतकेच नाही तर, त्यांची ऑर्डर फक्त काही मिनिटांमध्ये त्यांच्या पत्त्यावर पोहोचवली देखील जाईल. देशभरातील महानगरांसहित एकूण १०० शहरांमधील इन्स्टामार्ट युजर्स या सेवेचा लाभ घेऊ शकतील. २५ एप्रिलपासून सर्व शहरांमधील ग्राहक इन्स्टामार्टवर खरेदी करू शकतील सोने आणि चांदीची सर्टिफाईड नाणी. ही नवी सुविधा आणून, इन्स्टामार्टने फक्त किराणा सामान नव्हे तर, आनंद, उत्सव आणि पारंपरिक प्रसंगी आवश्यक वस्तूंची खरेदी आणि डिलिव्हरी लगेचच करण्यासाठी लोकप्रिय डेस्टिनेशन म्हणून आपली ओळख अधिक मजबूत केली आहे.

भेट म्हणून देण्यासाठी असो, आध्यात्मिक अनुष्ठानांसाठी असो किंवा स्वतःची गुंतवणूक म्हणून असो, ही नाणी समृद्धी आणि शुभारंभ यांची प्रतीके आहेत आणि अक्षय तृतीयेशी निगडित भावनेला अनुरूप आहेत. हे लॉन्च खरोखरीच खास बनवणारी बाब म्हणजे, हे फक्त सणासुदीपुरते मर्यादित नाही. अक्षय तृतीयेनंतर देखील कल्याण ज्वेलर्सची सोने आणि चांदीची नाणी इन्स्टामार्टवर उपलब्ध होतील. ग्राहकांना घर बसल्या, फक्त काही बोटे फिरवून मौल्यवान सोने आणि चांदीच्या नाण्यांची विश्वसनीय, दर्जेदार खरेदी करण्याची संधी वर्षभर मिळत राहील.

श्री अमितेश झा, सीईओ, इन्स्टामार्ट म्हणाले,”अक्षय तृतीयेच्या ठीक आधी आमच्या प्लॅटफॉर्मवर कल्याण ज्वेलर्सचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. सणासुदीसाठी, परंपरांसाठी खरेदीसाठी क्विक कॉमर्स सुविधेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांची संख्या प्रचंड जास्त असल्याने ही भागीदारी अगदी योग्य वेळी करण्यात आली आहे. किराणा सामान किंवा इतर घरगुती खरेदी प्रमाणेच सोने आणि चांदीच्या नाण्यांसारख्या विश्वसनीय आणि सर्टिफाईड उत्पादनांची खरेदी देखील ग्राहकांना खूपच सहजपणे करता यावी हा आमचा उद्देश आहे.”

श्री रमेश कल्याणरमण, मॅनेजिंग डायरेक्टर, कल्याण ज्वेलर्स म्हणाले,”अक्षय तृतीया एक प्राचीन परंपरा आहे, या शुभ मुहूर्तावर सोने किंवा चांदी खरेदी करणे हे विशेष शुभ मानले जाते. स्विगीचा क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म, इन्स्टामार्टसोबत आमच्या भागीदारीच्या माध्यमातून आम्ही कल्याणची सोने व चांदीची नाणी खरेदी करणे पहिल्यापेक्षा खूप जास्त सोपे बनवत आहोत. आमच्या या सेवेमध्ये ०.५ आणि १ ग्रॅम सोन्याची नाणी, ५, १० आणि २० ग्रॅमची चांदीची नाणी आहेत – जी अवघ्या काही मिनिटांत तुमच्या घरी पोहोचवली जातील. ग्राहकांना त्यांच्या गरजा, बजेट आणि सुविधेनुसार निवड करण्याची मुभा यामध्ये देण्यात आली आहे. ही भागीदारी करून आम्ही परंपरा, पावित्र्य आणि आधुनिक जीवनातील सहजता व वेग यांचा मिलाप घडवून आणला आहे, जेणेकरून सणासुदीचा आनंद कायम राखला जाईल.”

सोनेरी भागीदारीचा आनंद साजरा करण्यासाठी इन्स्टामार्टने इन्स्टागोल्ड हे एक शानदार ऑन-ग्राउंड ऍक्टिव्हेशन लॉन्च केले. हे इन्स्टॉलेशन पूर्णपणे एकसारख्या दिसणाऱ्या सोन्याच्या पानांमध्ये लपेटलेल्या चॉकलेटच्या नाण्यांनी झाकलेले आहे. पण यामध्ये एक ट्विस्ट आहे – त्यामध्ये ५ खरी सोन्याची नाणी लपलेली आहेत, जी इतर नाण्यांप्रमाणेच दिसतात. प्रत्येक व्यक्तीला नाणी शोधून काढण्याची आणि स्वतःचे नशीब आजमावण्याची एकच संधी दिली जाते. हा रोमांचक अनुभव अक्षय तृतीयेच्या भावना दर्शवतो, परंपरा, आनंद आणि सोनेरी भाग्य यांना सर्वात आनंददायी पद्धतीने एकत्र आणतो.

Related posts

“माझी आईचं माझ्यासाठी स्त्रीशक्तीचं रूप”- पूजा रायबागी

Shivani Shetty

मुंबई, पुणे गृहविक्रीत आघाडीवर; पहिल्या ३ महिन्यांत ६५,७०० घरांची विक्री

Shivani Shetty

सॅमसंगने भारतात ‘एआय होम: फ्यूचर लिव्हिंग, नाऊ’ आणले

Shivani Shetty

Leave a Comment