maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

मिआने मुंबईत सुरु केले फ्लॅगशिप स्टोर

मुंबई, २२ मार्च २०२५ :भारतातील सर्वात मोठ्या फाईन ज्वेलरी ब्रँड्सपैकी एक, तनिष्क परिवारातील एक ब्रँड, मिआने गोरेगावच्या ओबेरॉय मॉलमध्य आपले नवीन फ्लॅगशिप स्टोर सुरु करून मुंबईमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. मिआ बाए तनिष्कचे रिटेल हेड श्री संजय भट्टाचारजी यांनी नवीन स्टोरचे उदघाटन केले. गुढीपाडव्याचा मोठा सण जवळ येत आहे, त्यानिमित्ताने मिआने ‘रनवे स्टार इव्हेन्ट’ चे आयोजन करून ग्राहकांसोबतचे आपले नाते अजून दृढ केले.

गोरेगावच्या ओबेरॉय मॉलमध्ये पहिल्या मजल्यावर ८०० चौरस फुटांच्या या स्टोरमध्ये मिआच्या सिग्नेचर ज्वेलरीचे विशाल कलेक्शन प्रस्तुत करण्यात आले आहे. १४ आणि १८ कॅरेट सोने, हिरे आणि चांदीचे, ट्रेंडी, वजनाला हलके डिझाईन इथे मिळतात. मुंबईमध्ये नवीन स्टोर सुरु होत असल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ ब्रँडने २०% पर्यंतची सूट देऊ केली आहे. २१ ते २३ मार्च २०२५ पर्यंत या आकर्षक ऑफरचा लाभ घेता येईल. (अटी लागू आहेत) आमच्या गोल्डन हार्वेस्ट स्कीममध्ये भाग घेऊन ग्राहक आपली चमक वाढवण्यासाठी गुंतवणूक करू शकतील, याचे हफ्ते फक्त २००० रुपयांपासून सुरु होतात, देशभरात कोणत्याही मिआ स्टोरमध्ये दागिने खरेदीवर तुमच्या मासिक गुंतवणुकीच्या ७५% पर्यंतची खास सूट मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.

श्री संजय भट्टाचारजी, रिटेल हेड, तनिष्क म्हणाले,”मुंबई आमच्यासाठी नेहमीच एक महत्त्वाचे मार्केट आहे. आज ओबेरॉय मॉलमध्ये आमचे नवे फ्लॅगशिप स्टोर सुरु होत असल्याची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. आमच्या ग्राहकांना बहुउपयोगी, शानदार आणि कोणत्याही प्रसंगी सहज परिधान करता येतील असे दागिने आवडतात. नवीन त्यांना आमच्या अजून जवळ घेऊन येईल. रनवे स्टार इव्हेन्टमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना सन्मानित केले, स्वतःची अनोखी शैली आत्मविश्वासाने स्वीकारण्यासाठी त्यांना सक्षम बनवले. महाराष्ट्रात आमची ३० स्टोर्स आहेत त्यापैकी १९ मुंबईमध्ये आहेत, मिआ ब्रँड आपले स्थान उत्तरोत्तर मजबूत करत राहील, शहरातील फॅशन-फॉरवर्ड ग्राहकांची आवडनिवड, गरजा, मागण्या पूर्ण करत राहील. हे नवे स्टोर महाराष्ट्रातील आमचे ३१वे स्टोर आहे, आधुनिक फाईन ज्वेलरी जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची आमची वचनबद्धता यामधून दिसून येते.

श्री समीप पाठक, सीईओ – मॉल्स, ओबेरॉय रिअल्टी यांनी सांगितले,”गोरेगावच्या ओबेरॉय मॉलमध्ये मिआ बाए तनिष्कचे स्वागत करताना आणि टायटनसोबत आमची भागीदारी दृढ करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आघाडीच्या लक्झरी आणि लाइफस्टाइल ब्रँड्ससाठी हमखास ठिकाण ही आमची ओळख त्यामुळे अधिक मजबूत झाली आहे. आमच्या खास निवडून तयार करण्यात आलेल्या रिटेल पोर्टफोलिओमध्ये तनिष्क आणि अर्थ आधीपासूनच आहेत, आमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना प्रीमियम खरेदीचा अनुभव मिळवून देण्यासाठीची आमची बांधिलकी यामधून दिसून येते. ओबेरॉय रिअल्टीमध्ये आम्ही आमच्या ब्रँड पार्टनर्ससोबत सातत्याने समन्वय साधत असतो, वेगळ्या जगात घेऊन जाणारे रिटेल अनुभव प्रदान करून खरेदीदारांसोबतचे नाते अधिकाधिक घनिष्ठ होत राहावे, हा आमचा प्रयत्न असतो.”

मुंबईमध्ये सुरु करण्यात आलेल्या मिआच्या सर्वात नवीन कलेक्शनमध्ये ब्रँडचे सर्वात नवीन फेस्टिव्ह कलेक्शन, नुकतेच लॉन्च करण्यात आलेले ‘क्युपिड एडिट ३.०’ आणि ‘मिआ डिस्को’ कलेक्शन आहेत. १४ आणि १८ कॅरेट सोन्यापासून बनवण्यात आलेल्या, वजनाला हलक्या, आधुनिक डिझाइन्सची विशाल रेन्ज इथे आहे, मिआचे ब्रँड सिद्धांत आणि स्टाईल यांना एकत्र आणून हे दागिने सहज परिधान करण्याजोगे बनवण्यात आले आहेत.

Related posts

झेन डायमंड के आईरिस कलेक्शन शान और कला का अद्भुत संगम है

Shivani Shetty

टाटा टेक्नोलॉजीचे संघटनात्मक परिवर्तन

Shivani Shetty

मॅगी नवीन ‘मॅगी ओट्स नूडल्‍स विथ मिलेट मॅजिक’सह मिलेट्सच्‍या क्षमता दर्शवत आहे

Shivani Shetty

Leave a Comment