maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

IMDb द्वारे 2025 च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांची घोषणा

जगभरातील IMDb ग्राहकांच्या कोट्यवधी पेज व्ह्यूजनुसार 2025 मधील सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपट सिकंदर आहे

 

मूव्हीज, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील माहितीचा जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोत असलेल्या IMDb (www.imdb.com) ने 2025 च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीची घोषणा केली. जगभरातून IMDb वर दर महिन्याला येणा-या 25 कोटींहून अधिक विजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार हे निर्धारित झाले आहे.

 

सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये क्र. 1 वर असलेल्या सिकंदर चित्रपटाचे दिग्दर्शक ए. आर. मुरुगदोस, ह्यांनी म्हंटले, “2025 च्या IMDb च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये सिकंदर पहिल्या स्थानी बघून मला अतिशय आनंद वाटत आहे. सलमान खानसोबत काम करणे विलक्षण होते. त्याच्या ऊर्जेमुळे व कामाबद्दलच्या निष्ठेमुळे अनेक अर्थांनी सिकंदर जीवंत झाला आहे व हे शब्दांमध्ये सांगता येऊ शकत नाही. हे घडवून आणल्याबद्दल साजिद नाडियदवालाला खूप धन्यवाद. सिकंदरमधील प्रत्येक दृश्य अविश्वसनीय खूण राहील अशा प्रकारे बनवलेले आहे. प्रत्येक क्षण असा यावा जो प्रेक्षकांना नेहमीसाठी लक्षात राहील, अशा प्रकारे मी त्यामध्ये जीव ओतला आहे.”

 

2025 चे IMDb चे सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपट

1. सिकंदर

2. टॉक्सिक

3. कूली

4. हाऊसफुल 5

5. बाग़ी 4

6. राजा साब

7. वॉर 2

8. L2: एंपुरान

9. देवा

10. छावा

11. कन्नप्पा

12. रेट्रो

13. ठग लाईफ

14. जाट

15. स्काय फोर्स

16. सितारे जमीन पर

17. थामा

18. कंतारा ए लीजंड: चॅपटर 1

19. अल्फा

20. थांडेल

 

उल्लेखनीय आहे की, जगभरातून IMDb वर दर महिन्याला येणा-या 25 कोटींहून अधिक विजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार 2025 मध्ये रिलीजचे नियोजन असलेल्या भारतीय चित्रपटांपैकी ही टायटल्स IMDb ग्राहकांमध्ये सातत्याने सर्वाधिक प्रसिद्ध होती.

 

विशेष म्हणजे ह्या यादीतील 20 टायटल्सपैकी 11 हिंदी आहेत, तीन तमिळ व तेलुगू आहेत, दोन कन्नड आणि एक मल्याळम चित्रपट आहे. ह्या यादीतील तीन चित्रपटांमध्ये अक्षय कुमार प्रमुख भुमिकेत: हाऊसफुल 5 (क्र. 4), कन्नाप्पा (क्र. 11) आणि स्काय फोर्स (क्र. 15) आणि रश्मिका मंदानासुद्धा तितक्याच चित्रपटांमध्ये आहे: सिकंदर (क्र. 1), छावा (क्र. 10) आणि थामा (क्र. 17). मोहनलाल, प्रभास, पूजा हेगडे आणि कियारा अडवानी प्रत्येकी दोन चित्रपटांतील भुमिकांमध्ये आहेत. ह्या यादीतील पाच टायटल्स प्रसिद्ध फ्रँचायजीचे सीक्वेल्स किंवा भाग आहेत: हाऊसफुल 5 (क्र. 4), बाग़ी 4 (क्र. 5), वॉर 2 (क्र. 7), सितारे ज़मीं पर (क्र. 16), आणि कंतारा ए लीजंड: चॅपटर 1 (क्र. 18).

 

हे चित्रपट कधी उपलब्ध होतील, ह्याचे अलर्टस मिळवण्यासाठी IMDb ग्राहक ही व अन्य टायटल्स त्यांच्या IMDb वॉचलिस्टवर जोडू शकतात. 2025 च्या IMDb च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहा व पूर्ण यादी इथे वाचा.

Related posts

*एनओव्‍हीएसी ३.०: क्‍लीअरट्रिपच्‍या फ्लॅगशिप ट्रॅव्‍हल सेलचे आकर्षक डिल्‍ससह पुनरागमन* सर्वात मोठा समर ट्रॅव्‍हल महोत्‍सव फ्लाइट्स, हॉटेल्‍स, बसेस् व हॉलिडे पॅकेजेसवरील अद्वितीय डिल्‍ससह परतला आहे! राष्‍ट्रीय, २० मार्च २०२५: समर ट्रॅव्‍हल सीझन जवळ आला असताना क्‍लीअरट्रिप ही फ्लिपकार्ट कंपनी आपल्‍या बहुप्रतिक्षित #NationOnVacation (एनओव्‍हीएसी) सेलच्‍या तिसऱ्या एडिशनसह परतली आहे. २० मार्चपासून सुरू होत असलेला हा ९-दिवसीय ट्रॅव्‍हल महोत्‍सव फ्लाइट्स, हॉटेल्‍स आणि इतर पॅकेजेसवर सर्वात मोठ्या सूट देतो, ज्‍यामुळे ग्राहक अद्वितीय दरांमध्‍ये त्‍यांचे स्‍वप्‍नवत व्‍हेकेशन्‍स बुक करू शकतात. वर्दळीच्‍या प्रवास महिन्‍यांदरम्‍यान विमानभाडे दर किमान १५ टक्‍क्‍यांनी वाढण्‍याची अपेक्षा असताना क्‍लीअरट्रिप ग्राहक बुकिंग वर्तणूकीमधील परिवर्तनाचे नेतृत्‍व करत आहे, तसेच प्रवाशांना आधीच प्रवास योजना आखण्‍यास आणि दरांमध्‍ये वाढ होण्‍यापूर्वी सर्वोत्तम भाडेदरांचा आनंद घेण्‍यास प्रेरित करत आहे. एनओव्‍हीएसी ३.० सह क्‍लीअरट्रिप उद्योग नवप्रवर्तक म्‍हणून आपले स्‍थान अधिक दृढ करत आहे, तसेच किंमतीमधील पारदर्शकता, किफायतशीरपणा आणि स्थिर प्रवास पर्यायांवर लक्ष केंद्रित करत आहे. ग्राहक-केंद्रित नाविन्‍यतेप्रती कटिबद्ध क्‍लीअरट्रिपने ‘क्‍लीअरचॉईस’ उपक्रमांतर्गत आपल्‍या ऑफरिंग्‍ज वाढवत आहे, ज्‍यामुळे प्रवाशांना उत्तम बुकिंग स्थिरतेचा लाभ घेता येईल. क्‍लीअरचॉईस प्‍लस व क्‍लीअरचॉईस मॅक्‍ससह ग्राहक त्‍यांच्‍या बुकिंग्‍जमध्‍ये बदल करू शकतात किंवा संपूर्ण रिफंडसह रद्द करू शकतात, ज्‍यामुळे एअरलाइन बुकिंग रद्दीकरणासाठी कोणतेही शुल्‍क आकारले जाणार नाहीत. मिंत्रा आणि फ्लिपकार्ट लॉयल्‍टी सदस्‍यांना देखील क्‍लीअरिट्रिप व फ्लिपकार्ट ट्रॅव्‍हल प्‍लॅटफॉर्म्‍सवर विशेष सूट व ऑफर्सचा आनंद घेता येईल. या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत क्‍लीअरट्रिपचे चीफ ग्रोथ अँड बिझनेस ऑफिसर अनुज राठी म्‍हणाले, “क्‍ली‍अरट्रिप ट्रॅव्‍हल किंमत मॉडेल्‍समध्‍ये नाविन्‍यतेला चालना देण्‍याप्रती कटिबद्ध आहे. आगामी महिन्‍यांमध्‍ये विमानभाडे दर मोठ्या प्रमाणात वाढण्‍याची अपेक्षा असताना एनओव्‍हीएसीचे हे एडिशन प्रवाशांना सर्व स्‍तरावर पुढे राहण्‍यास मदत करण्‍याची आमची पद्धत आहे. आधीच नियोजन करत ग्राहक किंमत वाढीच्‍या अनिश्चिततेला टाळू शकतात आणि विनासायासपणे, किफायतशीर व उत्‍साहाने प्रवासाचा आनंद घेऊ शकतात.” प्रमुख ऑफर्स: ● ९९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या देशांतर्गत फ्लाइट्स ● ५९९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट्स ● २४९९ रूपयांपासून सुरू होणारे लक्‍झरी हॉटेल्‍स (४- व ५-स्‍टार) ● बस बुकिंग्‍जवर जवळपास ४० टक्‍के सूट ● हॉटेल बुकिंग्‍जवर ३० टक्‍के ते ८० टक्‍के सूट ● मिंत्रा इनसाइडर आयकॉनसाठी १ रूपयामध्‍ये क्‍लीअरचॉईस प्‍लस ● फ्लिपकार्ट व्‍हीआयपीसाठी १ रूपयामध्‍ये क्‍लीअरचॉईस मॅक्‍स सर्व ऑफर्स उपलब्धतेच्या अधीन आहेत आणि मर्यादित कालावधीसाठी वैध आहेत. मूल्य पारदर्शकतेला प्राधान्‍य देत एनओव्‍हीएसी ३.० चा भारतातील प्रवाशांच्‍या ट्रिप प्‍लॅनिंग करण्‍याच्‍या पद्धतीला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याचा मनसुबा आहे. लवकर बुकिंग करून प्रवासी किंमत वाढ टाळू शकतात, अधिक स्थिरता मिळवू शकतात आणि त्यांच्या पैशाचे अधिक मूल्य मिळवू शकतात. गेल्‍या वर्षी बुकिंग्‍जमध्‍ये ८० टक्‍के वाढीसह मिळालेल्‍या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादानंतर क्‍लीअरट्रिप ग्राहक-केंद्रित ट्रॅव्‍हल सोल्‍यूशन्‍स डिझाइन करण्‍याप्रती समर्पित आहे. एनओव्‍हीएसीचे तिसरे एडिशन विविध प्रवाशांसाठी उपलब्‍धता आणि किफायतशीरपणामध्‍ये अधिक वाढ करण्‍यास सज्‍ज आहे.

Shivani Shetty

स्‍टडी ग्रुपने उत्तर अमेरिकन शिक्षण संधींसह भारतीय विद्यार्थ्‍यांना सक्षम केले

Shivani Shetty

सॅमसंगने भारतात गॅलॅक्‍सी वॉचेसमध्‍ये आणली इररेग्‍युलर हार्ट रिदम नोटिफिकेशनची सुविधा

Shivani Shetty

Leave a Comment