maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

एफएनपीने मुंबईसह ३६ शहरांत झटपट डिलिव्हरी सेवा सुरू केली

मुंबई, १६ ऑक्टोबर २०२४: एफएनपी (फर्न्स एन पेटल्स) या भारताच्या सर्वात मोठ्या आणि अत्यंत विश्वसनीय गिफ्टिंग प्लॅटफॉर्मने आज देशभरातील ३६ शहरांमध्ये आपली नवीन ३०-मिनिट डिलिव्हरी सेवा सुरू केल्याची घोषणा केली. भारतात त्याच दिवशी डिलिव्हरी देण्यातील अग्रणी म्हणून असलेली परंपरा पुढे नेणाऱ्या या नवीन ऑफरमधून विचारपूर्वक गिफ्ट देण्यासाठी आणखी सुलभ पर्याय प्रदान करण्याची आणि सतत नाविन्यपूर्णतेचा ध्यास धरण्याची एफएनपीची वचनबद्धता दिसून येते.

 

त्याच दिवशी भेटवस्तूंची डिलिव्हरी देण्याच्या बाबतीत एफएनपी ने नेहमी या उद्योगाचे नेतृत्व केले आहे. देशभरात ही सेवा देण्याची सुरुवात करणाऱ्यांपैकी ते एक आहेत. आता मुंबई (ठाणे, वसई, विरार, डोंबिवली), दिल्ली एनसीआर (गुडगाव, नोयडा, गाझियाबाद), बंगळूर, चंदीगड (झिरकपूर, मोहाली) आणि चेन्नई सारख्या मोठ्या शहरी केंद्रातून तसेच पुणे, अहमदाबाद, लुधियाना, कानपूर, जयपूर आणि हैदराबाद या महत्त्वाच्या शहरांत ३०-मिनिट डिलिव्हरीची सुविधा देऊन या कंपनीने आपला मापदंड अधिक उंचावला आहे.

 

एफएनपीचे ग्लोबल सीईओ आणि डायरेक्टर पवन गडिया म्हणाले, “एफएनपी मध्ये आम्हाला वाटते की भेटवस्तू देणे ही विचारपूर्वकतेची आणि आस्थेची अभिव्यक्ती आहे. ३०-मिनिट डिलिव्हरीद्वारे, आपण विचारपूर्वक केलेली कृती, आपल्या सदिच्छा सुखरूपपणे अवघ्या ३० मिनिटांत प्रियजनांपर्यंत पोहोचवण्याची खात्री करून ग्राहकांना अधिक सुखद अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. एखादा खास प्रसंग असो किंवा नात्यातील उत्स्फूर्त क्षण, आमचा उद्देश ग्राहकांना त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लोकांसाठी संस्मरणीय अनुभव निर्माण करण्यात मदत करणे इतककाच आहे.”

 

एफएनपीच्या जलद डिलिव्हरी सर्व्हिसच्या मागे एआय आणि रियल-टाइम लॉजिस्टिक्स ऑप्टीमायझेशन टेक्नॉलॉजीची ताकद आहे. ही सिस्टम मार्गाची कार्यक्षमता वाढवते, भविष्यसूचक ऑर्डर व्यवस्थापन सुधारते आणि अंतिम टप्प्यातील अंमलबजावणी निर्वेध करण्याचे सुनिश्चित करते. या आधुनिक दृष्टीकोनासह एफएनपी केवळ भेटवस्तूच नाही, तर आनंदाच्या क्षणांची डिलिव्हरी थेट ग्राहकांच्या दाराशी करत आहे.

 

हा नवीन उपक्रम कल्पकता आणि ग्राहक संतुष्टीबाबत एफएनपी ची वचनबद्धता अधोरेखित करतो आणि प्रत्येक डिलिव्हरीत गती, विश्वासार्हता आणि आस्था यांचीही जोड देतो. आयत्या वेळी ठरलेले सेलिब्रेशन असो किंवा नियोजित कार्यक्रम, प्रत्येक भेटवस्तू वेळच्या वेळी पोहोचेल याची काळजी घेऊन एफएनपी गिफ्टिंग क्षेत्रात भारतातील सर्वात विश्वसनीय नाव म्हणून आपले स्थान बळकट करत आहे.

Related posts

भारतातील ९८ टक्‍के व्‍यवसाय प्रमुख जलदपणे एआयचा अवलंब करत आहेत, पण कुशल टॅलेंट सापडणे आव्‍हानात्‍मक ठरत आहे: लिंक्‍डइन

Shivani Shetty

रजोनिवृत्तीमधील संतुलन राखताना: काम व स्वास्थ्य सांभाळण्यासाठी ५ अत्यावश्यक टीप्स

Shivani Shetty

फॅशन ब्रँड ‘न्यूमी’चे मुंबईत पदार्पण

Shivani Shetty

Leave a Comment