maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

मेलोराकडून नवीन लाइटवेट ज्‍वेलरीचे अनावरण

मुंबई, २७ ऑक्टोबर २०२३: सणासुदीचा काळ जवळ आला असताना मेलोरा या भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्‍या डी२सी लाइटवेट गोल्‍ड व डायमंड ज्‍वेलरी ब्रॅण्‍डला त्‍यांच्‍या १८,००० ट्रेण्‍डी डिझाइन्‍सच्‍या विद्यमान पोर्टफोलिओमध्‍ये नवीन लाइटवेट ज्‍वेलरी कलेक्‍शनची भर करण्‍याची घोषणा करताना आनंद होत आहे. हे कलेक्‍शन आहेत बोल्‍ड ब्‍लूम्‍स, निओ बकेट, सिल्‍व्‍हर लायनिंग, अल्टिमेट लेसवर्क अॅण्‍ड बीडिंग. ग्राहक मेलोरा स्‍टोअर्सना भेट देऊ शकतात आणि या अद्भुत दागिन्‍यांचा अनुभव घेऊ शकतात. ब्रॅण्‍डने सणासुदीच्‍या काळात होणाऱ्या विक्रीमध्‍ये ५० टक्‍के वाढ संपादित करण्‍याचे मोठे लक्ष्‍य स्‍थापित केले आहे.

मेलोरा आकर्षक दरांमध्‍ये जागतिक फॅशन ट्रेण्‍ड-प्रेरित ज्‍वेलरी प्रदान करण्‍याप्रती समर्पित आहे. त्‍यांच्‍या ७० टक्‍के गोल्‍ड व डायमंड ज्‍वेलरी डिझाइन्‍सच्‍या किमती ५०,००० रूपयांपेक्षा कमी आहेत, ज्‍यामुळे अधिकाधिक ग्राहक या ज्‍वेलरी खरेदी करू शकतात.

“आमचा आंतरराष्‍ट्रीय फॅशन ट्रेण्‍ड-प्रेरित ज्‍वेलरी उपलब्‍ध करून देण्‍यासह आधुनिक जीवनशैलीशी संबंधित करण्‍याचा मनसुबा आहे,” असे मेलोराच्‍या संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती सरोजा येरामिल्‍ली म्‍हणाल्‍या. “विशेषत: सणासुदीच्‍या काळासाठी ५०० हून अधिक नवीन डिझाइन्‍सची भर करत आमची ग्राहकांना अधिकाधिक पर्याय उपलब्‍ध असण्‍याची खात्री घेण्‍याची इच्‍छा आहे. आम्‍ही ग्राहकांना यंदा सणासुदीच्‍या काळात आकर्षकता व स्‍टाइलसह सण साजरा करण्‍यासह मदत करण्‍यास उत्‍सुक आहोत. आम्‍हाला विश्‍वास आहे की, आमच्‍या नवीन गोल्‍ड व डायमंड ज्‍वेलरी डिझाइन्‍स त्‍यांच्‍या विविध गरजांची पूर्तता करतील.”

गेल्‍या वर्षभरात ब्रॅण्‍डने उल्‍लेखनीय वाढ केली आहे आणि ब्रॅण्‍डच्‍या महत्त्वाकांक्षी विस्‍तारीकरण योजनांमुळे ही गती कायम राहण्‍याची अपेक्षा आहे. मेलोरा पुढील पाच वर्षांमध्‍ये ४०० हून अधिक स्‍टोअर्स सुरू करण्‍यास सज्‍ज आहे. व्‍यापक पोहोचसह मेलोराने देशभरात आपली व्‍यापक फूटप्रिंट निर्माण केले आहे, जेथे १०,०००हून कमी लोकसंख्‍या असलेली ३००० हून अधिक शहरे, नगर व गावांपासून लाखोहून अधिक निवासी असलेल्‍या महानगरांपर्यंत त्‍यांच्‍या उत्‍पादनांची डिलिव्‍हरी केली जात आहे. मेलोराने १०० दशलक्ष डॉलर्सचा अॅन्‍युअल रिकरिंग रेव्‍हेन्‍यू (एआरआर) संपादित केला आहे आणि पुढील पाच वर्षांत विक्रीमध्‍ये १ बिलियन डॉलर्सचा उल्‍लेखनीय टप्‍पा गाठण्‍याचा संकल्‍प आहे.

Related posts

स्प्राइटच्या ‘जोक इन ए बॉटल’चे पुनरागमन: विनोदाच्या क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वे आणि डिजिटल स्टास एकत्र येऊन घडविणार एक अफलातून हास्यानुभव

Shivani Shetty

फ्लिपकार्टचा वार्षिक इव्‍हेण्‍ट ‘द बिग बिलियन डेज’ आता क्‍लीअरट्रिपवर देखील उपलब्‍ध असणार

Shivani Shetty

एडब्लूएल की विश्व पर्यावरण दिवस पर रिसाइकिल पहल

Shivani Shetty

Leave a Comment