maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

आर्थिक वर्ष २६ ची दमदार सुरूवात: आधार हाऊसिंग फायनान्‍सकडून पहिल्‍या तिमाहीत एयूएममध्‍ये २२ टक्‍के वाढ आणि पीएटीमध्‍ये १९ टक्‍के वाढीची नोंद

मुंबई, जुलै २६, २०२५: आधार हाऊसिंग फायनान्‍स लिमिटेडने ३० जून २०२५ रोजी समाप्‍त झालेली तिमाही आणि वर्षासाठी त्‍यांच्‍या आर्थिक निकालांची घोषणा केली. पहिल्‍या तिमाहीमधील प्रभावी कामगिरीसह कंपनी या वर्षामध्‍ये लक्ष्‍य संपादित करण्‍यासाठी सज्‍ज आहे.

कामगिरीची प्रमुख वैशिष्‍ट्ये:
तपशील (कोटी रूपये)
आर्थिक वर्ष २६ ची पहिली तिमाही
आर्थिक वर्ष २५ ची पहिली तिमाही
वार्षिक वाढ

अॅस्‍सेट्स अंडर मॅनेजमेंट (एयूएम)
२६,५२४
२१,७२६
२२ टक्‍के

वितरण
१,९७९
१,४९७
३२ टक्‍के

करोत्तर नफा (पीएटी)
२३७
२००
१९ टक्‍के

निव्‍वळ मूल्‍य
६,६१६
५,६३३
१७ टक्‍के

आरओए (टक्‍के)
४.० टक्‍के
४.१ टक्‍के
– ६ बीपीएस

आरओई (टक्‍के)*
१४.७ टक्‍के
१५.९ टक्‍के
– १२० बीपीएस

एयूएमवर जीएनपीए (टक्‍के)
१.३४ टक्‍के
१.३१ टक्‍के
+ ३ बीपीएस

*टिप:- (१००० रूपयांच्‍या (एकूण) आयपीओ प्राथमिक प्रमाणानंतर)
कामगिरीची वैशिष्‍ट्ये – आर्थिक वर्ष २०२६ ची पहिली तिमाही
अॅसेट अंडर मॅनेजमेंट (एयूएम) ३० जून २०२५ रोजी २१,७२६ कोटी रूपयांवरून ३० जून २०२५ रोजी २२ टक्‍के वाढीसह २६,५२४ कोटी रूपयांपर्यंत पोहोचले.
३० जून २०२५ रोजी एकूण कर्ज खात्‍यांची संख्‍या ३,०६,,००० हून अधिकपर्यंत पोहोचली.
करोत्तर नफा (पीएटी) आर्थिक वर्ष २५ च्‍या पहिल्‍या तिमाहीमधील २०० कोटी रूपयांवरून आर्थिक वर्ष २६ च्‍या पहिल्‍या तिमाहीमध्‍ये १९ टक्‍के वाढीसह २३७ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला.
निव्‍वळ मूल्‍य ३० जून २०२५ रोजी ६,६१६ कोटी रूपये राहिले, ज्‍यामध्‍ये १,००० कोटी रूपयांच्‍या प्राथमिक गुंतवणूकीमधून मिळालेल्‍या आयपीओ उत्‍पन्‍नांचा समावेश आहे.
मालमत्तांवर परतावा (आरओए) आर्थिक वर्ष २५ च्‍या पहिल्‍या तिमाहीसाठी ४.१ टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत आर्थिक वर्ष २६ च्‍या पहिल्‍या तिमाहीसाठी ४.० टक्‍के होता.
एकूण एनपीए ३० जून २०२४ रोजी १.३१ टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत ३० जून २०२५ रोजी १.३४ टक्‍के होता.
आर्थिक वर्ष २६ च्‍या पहिल्‍या तिमाहीमधील कामगिरीबाबत मत व्‍यक्‍त करत आधार हाऊसिंग फायनान्‍स लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. रिषी आनंद म्‍हणाले:
“आम्‍ही प्रबळ विकासगतीसह आर्थिक वर्ष २६ च्‍या पहिल्‍या तिमाहीची यशस्‍वीरित्‍या सांगता केली आहे, जेथे एयूएम वार्षिक २२ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह २६,५२४ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. परवडणाऱ्या घरांच्या विभागातील सततच्या मागणीमुळे वितरण वार्षिक ३२ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह १,९७९ कोटी रूपयांपर्यंत प्रबळ राहिले. तिमाहीसाठी करोत्तर नफा (पीएटी) २३७ कोटी रूपये राहिला, ज्‍यामध्‍ये वार्षिक १९ टक्‍क्‍यांची वाढ झाली.
या तिमाहीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे आमच्या दीर्घकालीन बँक सुविधा आणि नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्स (एानसीडी)साठी केअर (CARE) वरून केअर एए+ (CARE AA+)मध्‍ये रेटिंग अपग्रेड झाले, तसेच दृष्टिकोन स्थिर राहिला. यामधून आधारची मजबूत आर्थिक व कार्यसंचालन कामगिरी दिसून येते. गुवाहाटी येथे नवीन शाखेसह आम्ही आसाम या नवीन राज्यात प्रवेश केला आहे.
गेल्या वर्षभरात परवडणाऱ्या गृहनिर्माण वित्त क्षेत्राला सक्रिय सरकारी उपाययोजना आणि वाढत्या मागणीमुळे गती मिळाली आहे. या तिमाहीत एक महत्त्वाचा सूक्ष्‍म विकास म्हणजे आरबीआयने सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात केली, जून २०२५ मध्ये ५० बेसिस पॉइंट्सने कमी करून ५.५० टक्‍के केला, ज्यामुळे सणासुदीच्या काळापूर्वी पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या आणि कमी उत्पन्‍न असलेल्या घर खरेदीदारांसाठी परवडणारी क्षमता वाढली. आम्हाला आशा आहे की, या धोरणात्मक कृतींमुळे परवडणाऱ्या गृहनिर्माण क्षेत्रातील वाढीला आणखी गती मिळेल.
परवडणाऱ्या गृहनिर्माण क्षेत्रातील आमच्‍या नेतृत्‍वाने २२ राज्ये, ५९१ शाखा आणि ५४७ जिल्ह्यांमधील कमी उत्पन्‍न असलेल्या कुटुंबांना सेवा देण्यास मदत केली आहे, तसेच ३,०६,००० हून अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचले आहे. प्रबळ कार्यसंचालन पाया आणि ग्राहक-केंद्रित धोरणाच्या पाठिंब्यामुळे आधार हाऊसिंग फायनान्स आपला विकास प्रवास सुरू ठेवण्यासाठी चांगल्या स्थितीत आहे आणि अधिक कुटुंबांना घराच्या मालकीचे स्वप्‍न साकारण्यास सक्षम करत आहे.

Related posts

५ कारणे किया सोनेट एचटीके+ यादीत अव्वल आहे

Shivani Shetty

डेकॅथलॉनसह उत्‍सवी कम्फर्ट व स्‍टाइलचा आनंद घ्‍या

Shivani Shetty

कॉसमॉस विकसक आणि वेस्ट अव्हेन्यू रियल्टी यांनी ग्राउंड ब्रेकिंग समारंभासह ईरीन या प्रीमियम निवासी प्रकल्पासह त्यांची भागीदारी केली लॉन्च

Shivani Shetty

Leave a Comment