maharashtraprimenews
ठळक बातम्या
generalPublic Interest

कोकणात कणकवली तालुक्यात सावंत कुटुंबियांनी साकारला ‘ऑपरेशन सिंदूर’चा देखावा

कणकवली तालुक्यातील तरंदळे गावातील पटेलवाडी (टेंबवाडी) येथील सावंत कुटुंबियांनी या वर्षीच्या गणेशोत्सवात ‘ऑपरेशन सिंदूर’ चा मूर्तिमंत देखावा सादर केला आहे. सर्वश्री प्रसाद, महेश, प्रफुल्ल, केतन, अमोल व विनय सावंत या कुटुंबातील सदस्यांनी दरवर्षी वैविध्यपूर्ण देखावे सादर करण्याची आपली परंपरा याही वर्षी कायम राखली आहे. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या आतापर्यंतच्या इतिहासातील थेट व धडक कारवाईची घोषणा करून आपल्या शूर भारतीय सेनेच्या अतुलनीय पराक्रमाच्या बळावर ही योजना प्रत्यक्ष अंमलांत आणत व नंतर पाकिस्तानने त्याला युद्धाचे स्वरूप देत केलेल्या आगळीकीला चोख उत्तर देत पाकिस्तानला नमविले व विजय संपादन केला. या घटनेचे यथोचित स्मरण व भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम म्हणून सावंत कुटुंबियांनी अतिशय कलात्मकरित्या हा देखावा जिवंत केला आहे. ‘सिंदूर’चर्चित श्री गणेश व ‘ऑपरेशन सिंदूर’ मधील पंतप्रधानांनी केलेली कुंकवाच्या म्हणजेच ‘सिंदूर’च्या रक्षणाप्रती व त्यागाप्रती आखलेली मोहिम हे यातील साधर्म्यही या देखाव्यातून अभिप्रेत आहे. यांत आकर्षकपणे भारतीय वायुदल, पायदळ व नौदल या तिन्ही दलांनी केलेली संयुक्त कारवाई दाखविली आहे. वायुदलाच्या मिग विमानांनी पाकिस्तानात सीमापार जाऊन दहशतवाद्यांचे नेस्तनाबूत केलेले तळ व पाकिस्तानी लष्कराचे हवाईतळ यावरील आक्रमण ठळकपणे दाखविले आहे. देखाव्यात गणपतीच्या मनमोहक मूर्तीच्या सभोवती भारत – पाकिस्तानमधील सीमारेषा, त्यावर तैनात सैनिक, जमीन – ते – आकाश हल्ला करणारे ‘आकाश’ क्षेपणास्त्र, हवाई हल्ला भेदणारी ड्रोन – रक्षक प्रणाली इत्यादी गोष्टी जिवंत पद्धतीने दाखविल्या आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींजींच्या धीरगंभीर आवाजातील ‘ऑपरेशन सिंदूर’ची घोषणा व त्यावर केलेले राष्ट्राप्रती संबोधन यांनी हा देखावा अधिकच ठाव घेणारा झाला आहे. “ऑपरेशन सिंदूरमुळे हे वर्ष भारतीय सार्वभौमत्वाच्या दृष्टीने मोदीजींच्या नेतृत्वांत व सैन्याच्या अतुलनीय पराक्रमाने महत्वाचे ठरले. भारतीय सैन्य दलांना मानवंदना म्हणून यावर्षी गणरायाच्या चरणी आम्ही या जाज्वल्य प्रसंगाचे चित्रण अर्पण करण्याचे ठरविले”, असे श्री प्रसाद सावंत यांनी सांगितले. श्री केतन सावंत, श्री प्रफुल्ल सावंत, श्री विनय सावंत, श्री अमोल सावंत, श्री महेश सावंत व श्री गुलाब विश्वकर्मा यांनी हा देखावा सादर करण्यासाठी मेहनत घेतली. हा देखावा पाहण्यासाठी तरंदळे तसेच कणकवली परिसरांतून गणेशभक्त मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत‌.

Related posts

Honasa Consumer Limited चा आयपीए 31 ऑक्टोबर 2023 पासनू होणार खलु ा, वित्त िर्ष 2024 च्या पहहल्या ततमाहीत कं पनी आली फायद्यात

Shivani Shetty

केरल आपदा के लिए 5 करोड़ रुपए देगा कल्याण ज्वेलर्स

Shivani Shetty

आयटेलने एआय-पॉवर्ड ‘ए९५ ५जी’ स्‍मार्टफोन लाँच केला

Shivani Shetty

Leave a Comment