maharashtraprimenews
ठळक बातम्या
generalPublic Interest

सॅमसंग ‘द बिग बीस्‍पोक एआय फेस्‍ट’सह साजरा करत आहे स्‍वातंत्र्य दिन भारतातील कुटुंबांना मिळणार स्‍मार्टर व कनेक्‍टेड राहणीमानाचा अनुभव

३१ जुलै २०२५: सॅमसंग हा भारतातील सर्वात मोठा ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँड द बिम बीस्‍पोक एआय फेस्‍टसह स्‍वातंत्र्य दिन साजरा करत आहे, जेथे ग्राहकांना आधुनिक एआय-पॉवर्ड डिजिटल अप्‍लायन्‍सेससह त्‍यांचे घर अपग्रेड करण्‍याचे आवाहन करण्‍यात येत आहे. १ ऑगस्‍ट ते १७ ऑगस्‍ट २०२५ पर्यंत राबवण्‍यात येणारी ही मर्यादित कालावधीची मोहिम सॅमसंगच्‍या बीस्‍पोक एआय श्रेणीवर विशेष फायदे देते, ज्‍यामध्‍ये रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्‍स, एअर कंडिशनर्स आणि मायक्रोवेव्‍ह्जचा समावेश आहे. जीवन सुलभ करण्‍यासाठी आणि दीर्घकाळापर्यंत टिकाऊपणासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या या नाविन्‍यपूर्ण उत्‍पादनांमध्‍ये कनेक्‍टेड इंटेलिजन्‍ससह कालातीत डिझाइनचा समावेश आहे, जे किफायतशीरपणा व फायद्याच्‍या माध्‍यमातून अधिक उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहेत.

‘द बिग बीस्‍पोक एआय फेस्‍ट’दरम्‍यान ग्राहक नवीन लाँच करण्‍यात आलेल्‍या २५ किग्रॅ बीस्‍पोक एआय लॉण्‍ड्री कॉम्‍बोवर जवळपास ५०,००० रूपये कॅशबॅकचा आनंद घेऊ शकतात. हे पूर्णत: ऑटोमॅटिक वॉशर-ड्रायर भारतातील मोठ्या कुटुंबांसाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. सॅमसंग फॅमिली हब असलेल्‍या त्‍यांच्‍या प्रमुख फ्रेंच डोअर रेफ्रिजरेटरवर देखील २०,००० रूपयांची कॅशबॅक देत आहे, जे किचनमध्‍ये वैयक्तिकरित्‍या अन्‍न व्‍यवस्‍थापन, मनोरंजन व कनेक्‍टीव्‍हीटी देते. बीस्‍पोक एआय अप्‍लायन्‍सेसची व्‍यापक श्रेणी देखील आकर्षक बचतींसह येते, ज्‍यामध्‍ये साइड-बाय-साइड रेफ्रिजरेटर्सवर जवळपास २०,००० रूपये, फ्रण्‍ट लोड वॉशिंग मशिन्‍सवर जवळपास १०,००० रूपये, टॉप लोड मॉडेल्‍सवर जवळपास ४५०० रूपये आणि फ्रॉस्‍ट फ्री रेफ्रिजरेटर्सवर जवळपास ७००० रूपये बचत करता येईल.

अपग्रेड अधिक सोपे करण्‍यासाठी ग्राहक झीरो डाऊन पेमेंटसह सोप्‍या फायनान्‍स पर्यायांचा आनंद घेऊ शकतात, तसेच ग्राहक सॅमसंगची २०/५ फायनान्‍स स्किमअंतर्गत निवडक रेफ्रिजरेटर्स व वॉशिंग मशिन्‍सवर स्‍पेशल ‘१ ईएमआय ऑफ’ ऑफरचा देखील आनंद घेऊ शकतात. ही स्किम ग्राहकांना नो-कॉस्‍ट ईएमआयसह २० महिन्‍यांमध्‍ये देय भरण्‍याची सुविधा देते, तर सॅमसंग पहिल्‍या ईएमआयला कव्‍हर करते, ज्‍यामुळे अपग्रेड अधिक सोपे व अधिक किफायतशीर बनले आहे.

अधिक मूल्‍याची भर करत सॅमसंग त्‍यांच्‍या डिजिटल अप्‍लायन्‍सेसवर उद्योग-अग्रणी वॉरंटी देत आहे. यामध्‍ये रेफ्रिजरेटर्समधील डिजिटल इन्‍व्‍हर्टर कम्‍प्रेसर व वॉशिंग मशिन्‍समधील डिजिटल इन्‍व्‍हर्टर मोटरवर २०-वर्ष वॉरंटी, मायक्रोवेव्‍ह्जमधील सिरॅमिक एनामेल कॅव्हिटीवर १०-वर्ष वॉरंटी आणि निवडक एअर कंडिशनर्सवर ५-वर्ष कॉम्‍प्रेहेन्सिव्‍ह वॉरंटीचा समावेश आहे. याव्‍यतिरिक्‍त, सॅमसंग ५ स्‍टार-रेटेड बीस्‍पोक एआय विंडफ्री™️ एसींवर मोफत प्रोफेशनल इन्‍स्‍टॉलेशन देत आहे, ज्‍यामुळे कुटुंबं आरामदायीपणाचा आनंद घेण्‍यासोबत ऊर्जा बचत करू शकतात.

या इंडीपेण्‍डन्‍स डे ऑफर्स Samsung.com, आघाडीच्‍या ऑनलाइन प्‍लॅटफॉर्म्‍सवर आणि भारतभरातील सॅमसंग रिटेल आऊटलेट्समध्‍ये उपलब्‍ध असतील. या मोहिमेमधून भारतीयांच्‍या जीवनशैलीशी जुळून जाणारे कनेक्‍टेड, सर्वोत्तम व टिकाऊ तंत्रज्ञान देण्‍याप्रती सॅमसंगची कटिबद्धता दिसून येते, ज्‍यामुळे यंदा स्‍वातंत्र्य दिन स्‍मार्टर होममध्‍ये अपग्रेड होण्‍यासाठी परिपूर्ण वेळ आहे.

Related posts

लवकर झालेले निदान आणि योग्य पोषणामुळे मुलांच्या आरोग्याला मिळू शकते बळ

Shivani Shetty

*एनओव्‍हीएसी ३.०: क्‍लीअरट्रिपच्‍या फ्लॅगशिप ट्रॅव्‍हल सेलचे आकर्षक डिल्‍ससह पुनरागमन* सर्वात मोठा समर ट्रॅव्‍हल महोत्‍सव फ्लाइट्स, हॉटेल्‍स, बसेस् व हॉलिडे पॅकेजेसवरील अद्वितीय डिल्‍ससह परतला आहे! राष्‍ट्रीय, २० मार्च २०२५: समर ट्रॅव्‍हल सीझन जवळ आला असताना क्‍लीअरट्रिप ही फ्लिपकार्ट कंपनी आपल्‍या बहुप्रतिक्षित #NationOnVacation (एनओव्‍हीएसी) सेलच्‍या तिसऱ्या एडिशनसह परतली आहे. २० मार्चपासून सुरू होत असलेला हा ९-दिवसीय ट्रॅव्‍हल महोत्‍सव फ्लाइट्स, हॉटेल्‍स आणि इतर पॅकेजेसवर सर्वात मोठ्या सूट देतो, ज्‍यामुळे ग्राहक अद्वितीय दरांमध्‍ये त्‍यांचे स्‍वप्‍नवत व्‍हेकेशन्‍स बुक करू शकतात. वर्दळीच्‍या प्रवास महिन्‍यांदरम्‍यान विमानभाडे दर किमान १५ टक्‍क्‍यांनी वाढण्‍याची अपेक्षा असताना क्‍लीअरट्रिप ग्राहक बुकिंग वर्तणूकीमधील परिवर्तनाचे नेतृत्‍व करत आहे, तसेच प्रवाशांना आधीच प्रवास योजना आखण्‍यास आणि दरांमध्‍ये वाढ होण्‍यापूर्वी सर्वोत्तम भाडेदरांचा आनंद घेण्‍यास प्रेरित करत आहे. एनओव्‍हीएसी ३.० सह क्‍लीअरट्रिप उद्योग नवप्रवर्तक म्‍हणून आपले स्‍थान अधिक दृढ करत आहे, तसेच किंमतीमधील पारदर्शकता, किफायतशीरपणा आणि स्थिर प्रवास पर्यायांवर लक्ष केंद्रित करत आहे. ग्राहक-केंद्रित नाविन्‍यतेप्रती कटिबद्ध क्‍लीअरट्रिपने ‘क्‍लीअरचॉईस’ उपक्रमांतर्गत आपल्‍या ऑफरिंग्‍ज वाढवत आहे, ज्‍यामुळे प्रवाशांना उत्तम बुकिंग स्थिरतेचा लाभ घेता येईल. क्‍लीअरचॉईस प्‍लस व क्‍लीअरचॉईस मॅक्‍ससह ग्राहक त्‍यांच्‍या बुकिंग्‍जमध्‍ये बदल करू शकतात किंवा संपूर्ण रिफंडसह रद्द करू शकतात, ज्‍यामुळे एअरलाइन बुकिंग रद्दीकरणासाठी कोणतेही शुल्‍क आकारले जाणार नाहीत. मिंत्रा आणि फ्लिपकार्ट लॉयल्‍टी सदस्‍यांना देखील क्‍लीअरिट्रिप व फ्लिपकार्ट ट्रॅव्‍हल प्‍लॅटफॉर्म्‍सवर विशेष सूट व ऑफर्सचा आनंद घेता येईल. या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत क्‍लीअरट्रिपचे चीफ ग्रोथ अँड बिझनेस ऑफिसर अनुज राठी म्‍हणाले, “क्‍ली‍अरट्रिप ट्रॅव्‍हल किंमत मॉडेल्‍समध्‍ये नाविन्‍यतेला चालना देण्‍याप्रती कटिबद्ध आहे. आगामी महिन्‍यांमध्‍ये विमानभाडे दर मोठ्या प्रमाणात वाढण्‍याची अपेक्षा असताना एनओव्‍हीएसीचे हे एडिशन प्रवाशांना सर्व स्‍तरावर पुढे राहण्‍यास मदत करण्‍याची आमची पद्धत आहे. आधीच नियोजन करत ग्राहक किंमत वाढीच्‍या अनिश्चिततेला टाळू शकतात आणि विनासायासपणे, किफायतशीर व उत्‍साहाने प्रवासाचा आनंद घेऊ शकतात.” प्रमुख ऑफर्स: ● ९९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या देशांतर्गत फ्लाइट्स ● ५९९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट्स ● २४९९ रूपयांपासून सुरू होणारे लक्‍झरी हॉटेल्‍स (४- व ५-स्‍टार) ● बस बुकिंग्‍जवर जवळपास ४० टक्‍के सूट ● हॉटेल बुकिंग्‍जवर ३० टक्‍के ते ८० टक्‍के सूट ● मिंत्रा इनसाइडर आयकॉनसाठी १ रूपयामध्‍ये क्‍लीअरचॉईस प्‍लस ● फ्लिपकार्ट व्‍हीआयपीसाठी १ रूपयामध्‍ये क्‍लीअरचॉईस मॅक्‍स सर्व ऑफर्स उपलब्धतेच्या अधीन आहेत आणि मर्यादित कालावधीसाठी वैध आहेत. मूल्य पारदर्शकतेला प्राधान्‍य देत एनओव्‍हीएसी ३.० चा भारतातील प्रवाशांच्‍या ट्रिप प्‍लॅनिंग करण्‍याच्‍या पद्धतीला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याचा मनसुबा आहे. लवकर बुकिंग करून प्रवासी किंमत वाढ टाळू शकतात, अधिक स्थिरता मिळवू शकतात आणि त्यांच्या पैशाचे अधिक मूल्य मिळवू शकतात. गेल्‍या वर्षी बुकिंग्‍जमध्‍ये ८० टक्‍के वाढीसह मिळालेल्‍या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादानंतर क्‍लीअरट्रिप ग्राहक-केंद्रित ट्रॅव्‍हल सोल्‍यूशन्‍स डिझाइन करण्‍याप्रती समर्पित आहे. एनओव्‍हीएसीचे तिसरे एडिशन विविध प्रवाशांसाठी उपलब्‍धता आणि किफायतशीरपणामध्‍ये अधिक वाढ करण्‍यास सज्‍ज आहे.

Shivani Shetty

इझमायट्रिपने कॉर्पोरेट ट्रॅव्‍हल बिझनेस विभाग लाँच केला

Shivani Shetty

Leave a Comment