maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

विद्यार्थ्यांना क्लिक झालेली पेन्सिल – युवाची प्रोमेक मेकॅनिकल पेन्सिल

महाराष्ट्र / गुजरात, 23rd सप्टेंबर 2025 : नवनीत एज्युकेशन लिमिटेडच्या युवा या ब्रँडतर्फे प्रोमेक ही 0.7 म पेन्सिल लाँच करण्यात आली असून ही या पेन्सिलची किंमत फक्त रु.१० इतकी आहे. लिखाणाची प्रक्रिया सहज व्हावी, कम्फर्टेबल असावी आणि विद्यार्थ्यांसाठी व स्टेशनरीच्या चाहत्यांसाठी स्टालयिश असावी, हे या पेन्सिलीचे उद्दिष्ट आहे.

प्रोमेक पेन्सिलमध्ये विचारपूर्वक समाविष्ट करण्यात आलेल्या फीचर्समुळे ही पेन्सिल रोजच्या लिखाणासाठी एक परिपूर्ण साथी ठरते. या पेन्सिलीच्या ईझी-क्लिक मेकॅनिझममुळे ही पेन्सिल वापरायला अगदी सहज होते, त्याचप्रमाणे ड्युअल पेस्टल टोनमुळे या पेन्सिलला फ्रेश व ट्रेंडी लुकही मिळाला आहे. या पेन्सिलची ग्रिप कम्फर्टेबल असल्याने सहजपणे लिहिता येते. त्याचप्रमाणे या पेन्सिलला पारदर्शक टोपण असलेला खोडरबरही लावलेला आहे. त्यामुळे या पेन्सिलच्या उपयुक्ततेत व स्टाइलमध्ये भर पडते.

मेकॅनिकल पेन्सिलच्या लाँचबद्दल बोलताना, युवा स्टेशनरीचे चीफ स्ट्रॅटजी ऑफिसर श्री. अभिजीत सान्याल म्हणाले, चांगली स्टेशनरी परवडणारी आणि आनंददायी असावी, अशी युवामध्ये आमची धारणा आहे. उपयुक्तता व डिझाइन यांची सांगड घालण्याची आमची बांधिलकी प्रोमेक मेकॅनिकल पेन्सिलमधून दिसून येते. या पेन्सिलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि तरुण क्रिएटर्सना त्यांचा लिखाणाचा दैनंदिन अनुभव अधिक सुलभ व मजेशीर करण्याचे साधन मिळणार आहे.

ही कूल मेकॅनिकल पेन्सिल आता महाराष्ट्र व गुजरातमधील आघाडीच्या सर्व स्टेशनरी आउटलेट्समध्ये उपलब्ध आहे. तुमची पेन्सिल लगेच खरेदी करा!

Related posts

रक्षाबंधनाकरिता पेटीएमचे गिफ्टिंग पर्याय

Shivani Shetty

टाटा मोटर्स आणि व्‍हर्टेलो यांनी इलेक्ट्रिक व्‍यावसायिक वाहनांसाठी आकर्षक लीजिंग सोल्‍यूशन्‍स देण्‍याकरिता सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षऱ्या केल्‍या

Shivani Shetty

द बॉडी शॉपने ‘स्‍पार्क ए चेंज २.०’ मोहीम लाँच केली

Shivani Shetty

Leave a Comment