maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

ल्‍युमिओने भारतातील सर्वात वेगवान स्मार्ट टीव्ही लॉन्च केले

मुंबई, ११ एप्रिल २०२५:* २०२४ मध्ये स्थापन झालेल्या सर्किट हाऊस टेक्नॉलॉजीजने आपला नवीन ब्रँड लुमिओसह भारतातील सर्वात वेगवान स्मार्ट टीव्ही लॉन्च करत स्मार्ट टीव्ही बाजारात खळबळ उडवून दिली आहे. ल्‍युमिओने भारतातील ५ अब्ज डॉलर्सच्या स्मार्ट टीव्ही बाजारपेठेतील स्लो टीव्हीची समस्या दूर करण्यासाठी आज भारतीय बाजारात ल्‍युमिओ व्हिजन ९ आणि ल्‍युमिओ व्हिजन ७ हे दोन प्रीमियम स्‍मार्ट टीव्‍ही लाँच केले आहेत. ल्‍युमिओ व्हिजन ९ हा एक क्यूडी-मिनी एलईडी टीव्ही आहे तर व्हिजन ७ हा क्यूएलईडी पॉवरहाऊस आहे. हे दोन्ही टीव्ही जलद गती, रंगीत आणि अचूक डिस्प्लेसह घरी थिएटरसारखा अनुभव देतात.

*सर्किट हाऊस टेक्‍नॉलॉजीजचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी रघु रेड्डी* म्‍हणाले, ”आम्‍ही सर्वांसाठी स्‍लो टीव्‍हीची समस्या दूर करण्यासाठी भारतात वेगवान स्मार्ट टीव्‍ही डिझाइन केले आहेत. आम्ही ल्‍युमिओ व्हिजन ९ आणि व्हिजन ७ सिरीजसह आम्‍ही गतीशील स्‍पीड, दर्जात्‍मक पिक्‍चर व साऊंड देत आहोत, ज्‍यामधून भारतातील ग्राहकांना आनंदमय मनोरंजनाचा अनुभव मिळेल.”

ल्‍युमिओने लॉन्च केलेले स्मार्ट टीव्ही व्हिजन ९ आणि व्हिजन ७ हे उत्तम तंत्रज्ञान आणि परवडणाऱ्या किमतीचे उत्तम मिश्रण आहेत. दोन्ही टीव्हीमध्ये फ्लॅगशिप बॉस प्रोसेसर, ३ जीबी डीडीआर४ रॅम आणि डीओपीई डिस्प्ले आहे, ज्यामुळे रंग अतिशय अचूक दिसतात. प्रीमियम क्यूएलईडी तंत्रज्ञान आणि १००% पेक्षा जास्त रंगीत कव्हरेजसह, हे टीव्ही तुम्हाला एक अद्भुत आणि वास्तववादी अनुभव देतील.

ल्‍युमिओ व्हिजन ७ आणि व्हिजन ९ दोन्हीमध्ये डॉल्बी व्हिजन®️, डॉल्बी अ‍ॅटमॉस, डीजीएस ऑडिओसह क्वाड स्पीकर सिस्टम आहे, जे १५०% मोठ्या स्पीकर कॅव्हिटीसह इमर्सिव्ह ध्वनी प्रदान करते. दोन्ही सीरीजमध्ये ३ एचडीएमआय पोर्ट (४८जीबीपीएस बँडविड्थ, एक इ-एआरसी), ३ यूएसबी पोर्ट, ऑप्टिकल ऑडिओ आउटपुट आणि हाय-स्पीड वाय-फायसह कनेक्टिव्हिटी उत्तम आहे. तसेच, व्हिजन ७ मध्ये १६ जीबी स्टोरेज आणि व्हिजन ९ मध्ये ३२ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे.

भारतातील स्‍मार्ट टीव्‍ही बाजारपेठेत गेल्‍या आठ वर्षांमध्‍ये जवळपास ६० दशलक्ष युनिट्सचे शिपिंग दिसण्‍यात आले आहे. तरीदेखील, मोठी समस्‍या कायम आहे, ती म्‍हणजे स्‍लो व लॅगी इंटरफेसेस. ल्‍युमिओने केलेल्‍या संशोधनामधून भारतातील स्‍मार्ट टीव्‍ही वापरकर्त्‍यांसाठी मंद गतीने कार्यसंचालन ही प्रमुख समस्‍या असल्‍याचे निदर्शनास येते. लॅगिंग इंटरफेसेसपासून प्रतिसाद न देणाऱ्या रिमोट बटन क्लिक्‍सपर्यंत लाखो कुटुंबं टेलिव्हिजन्‍सच्‍या समस्‍यांमध्‍ये अडकलेले आहेत, जे आधुनिक मागण्‍यांची पूर्तता करण्‍यास असमर्थ ठरतात. ल्‍युमिओ यामध्‍ये बदल करण्‍यासाठी आले आहे.

*ल्‍युमिओ व्हिजन ९ची वैशिष्ट्ये:*

· अद्वितीय कॉन्ट्रास्‍ट व वैविध्‍यतेसाठी १९२० ब्‍ल्‍यू मिनी-एलईडीसह क्‍वॉन्‍टम डॉट एन्‍हासमेंट लेयर

· कोणत्याही प्रकाशात आश्चर्यकारक स्पष्टतेसाठी ९०० निट्स पर्यंतची कमाल ब्राइटनेस

· कलर गम्‍यूट कव्‍हरेज: डीसीआय-पी३ १११ टक्‍के, आरईसी २०२० ८१ टक्‍के

· जवळपास परिपूर्ण कलर अॅक्‍यूरसीसाठी कलर डेल्‍टा ई १.७१

· प्रीमियम क्‍वॉलिटी स्‍मार्ट टीव्‍हींसाठी वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍यासाठी ५५ इंच स्क्रिन आकारामध्‍ये उपलब्‍ध

 

*ल्‍युमिओ व्हिजन ७ ची वैशिष्ट्ये:*

· कोणत्‍याही प्रकारच्‍या प्रकाशासाठी जवळपास ४०० नीट्स ब्राइटनेस.

· कलर गम्‍यूट कव्‍हरेज: डीसीआय-पी३ ११४ टक्‍के, आरईसी २०२० ८३ टक्‍के.

· अपवादात्‍मक कलर अचूकतेसाठी १.०८ इतके कमी कलर डेल्‍टा ई, आकार ४३ इंच, पिक्‍चर क्‍वॉलिटीबाबत कोणतीच तडजोड नाही.

· कॉम्‍पॅक्‍ट अपार्टमेंट्सपासून एैसपैस लिव्हिंग रूम्‍सपर्यंत प्रत्‍येक कुटुंबासाठी डिझाइन करण्‍यात आलेला प्रीमियम अनुभव, आकार ४३ इंच, ५० इंच व ५५ इंच.

Related posts

थम्‍स अपने अल्‍लु अर्जुनसोबत वर्षातील सर्वात एपिक सहयोग केला 

Shivani Shetty

टाटा मोटर्सने प्रगत गतीशीलता सोल्‍यूशन्‍स दाखवण्‍यासाठी लाँच केला अद्वितीय ग्राहक सहभाग उपक्रम – ‘ट्रक उत्‍सव’

Shivani Shetty

जसलोक हॉस्पिटलमध्‍ये नेतृत्‍वात बदल: विनोद पी. चनराय यांची अध्‍यक्षपदी नियुक्‍ती

Shivani Shetty

Leave a Comment