maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

नवी मुंबईत ‘एबीसी चिल्ड्रेन्स कॉन्क्लेव्ह २०२५’ चे आयोजन

नवी मुंबई, २ मे २०२५ : अपोलो चिल्ड्रेन्स नवी मुंबई (एएचएनएम) एबीसी चिल्ड्रेन्स कॉन्क्लेव्ह २०२५ च्या निमित्ताने, लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित मुद्द्यांवर जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने अनेक समुदाय-केंद्रित उपक्रम सुरु करत आहे. हॉस्पिटलचे हे प्रयत्न, वैद्यकीय देखभाल आणि सामुदायिक आउटरिच दोन्हींच्या माध्यमातून बाल आरोग्य आणि कल्याण यामध्ये सुधारणेप्रती हॉस्पिटलची वचनबद्धता मजबूत करत आहेत. या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या आयोजनाचा एक भाग म्हणून, अपोलो चिल्ड्रेन्सने नवी मुंबईमध्ये अनेक महत्त्वाच्या पैलूंची सुरुवात केली आहे. मोबाईल फोनचे व्यसन, जंक फूड आणि सामान्य आरोग्य इत्यादी गंभीर आरोग्य चिंता दूर करणे हा या उपक्रमांचा उद्देश आहे. अपोलो चिल्ड्रेन्स नवी मुंबईद्वारे बॉस्टन चिल्ड्रेन्स हॉस्पिटल (यूएसए), इंडियन अकॅडेमी ऑफ पीडियाट्रिक्स (आयएपी) आणि नवी मुंबई असोसिएशन ऑफ पीडियाट्रिक्स (एनएमएपी) च्या सहयोगाने एबीसी चिल्ड्रेन्स कॉन्क्लेव्ह २०२५ चे आयोजन ३-४ मे २०२५ रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ऑरिका हॉटेलमध्ये करण्यात येईल. या दोन दिवसांच्या संमेलनात पीडियाट्रिशियन, रिसर्चर आणि हेल्थकेयर इनोव्हेटर सहभागी होतील आणि वैद्यकीय प्रगती, आजच्या काळातील आरोग्य सेवा गरजा आणि मुले व कुटुंबांना लाभ प्रदान करणाऱ्या शाश्वत आरोग्य सेवा प्रणाली तयार करणाऱ्या धोरणांबाबत चर्चा करतील.

संमेलनपूर्व उपक्रमांची प्रमुख वैशिष्ट्ये:

एबीसीसी सोशल कनेक्ट : नवी मुंबई असोसिएशन ऑफ पीडियाट्रिक्सचे पीडियाट्रिशियन नवी मुंबईमध्ये स्टडी सेंटर्सना भेटी देतील आणि मुले व पालकांसोबत मोबाईलचा खूप जास्त वापर व जंक फूडच्या सेवनाच्या हानिकारक प्रभावांबाबत चर्चा करतील. या भेटींमध्ये डॉक्टर आवश्यक आरोग्य सल्ले देऊ शकतील आणि मुले व कुटुंबांमध्ये निरोगी जीवनशैली पर्यायांना प्रोत्साहन देऊ शकतील. या उपक्रमाचा एक भाग म्हणून तक्षशिला प्रबोधिनी सामाजिक संस्था स्टडी सेंटर्सना दप्तरे, वह्या, रिचार्जेबल लाईट्स आणि फळा इत्यादी शैक्षणिक मदत पुरवेल.

‘बचपन’ – पालक आणि मुलांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींसाठी सामुदायिक कार्यक्रम: हा संवादात्मक कार्यक्रम आईवडील आणि मुलांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींना बाल विकास, भावनात्मक कल्याण आणि प्रभावी पालन पोषण धोरणांबाबत व्यावहारिक ज्ञान देण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे. ‘बचपन’चे नेतृत्व पीडियाट्रिशियन करत आहेत आणि प्रसिद्ध संस्थांच्या आंतरराष्ट्रीय फॅकल्टीचा सहयोग यामध्ये मिळत आहे. यामध्ये मुलांच्या वैद्यकीय देखभालीविषयी जागतिक दृष्टिकोन प्रस्तुत केला जाईल आणि आजच्या घाईगडबडीच्या, डिजिटल जगात मुलांच्या निरोगी, सुव्यवस्थित, स्थिर पालनपोषणाबाबत माहिती दिली जाईल.

डॉ अनुपम सिबल, डायरेक्टर, सिनियर पीडियाट्रिक गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट-हेपेटोलॉजिस्ट, अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप यांनी सांगितले,”एबीसी चिल्ड्रेन्स कॉन्क्लेव्ह २०२५ पीडियाट्रिक देखभाल आणि नावीन्य यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे, जिथे नवनवीन संशोधन, वैद्यकीय प्रगती आणि क्लिनिकल विशेषज्ञता मुलांसाठी निरोगी भविष्याला आकार देतात. संशोधन आणि करुणा यांची सांगड घालून आम्ही हे सुनिश्चित करत आहोत की, प्रत्येक मुलाला सर्वोत्तम संभव देखभाल मिळावी. अपोलो हॉस्पिटल्सला अभिमान आहे की, ते या प्रयत्नांमध्ये सर्वात पुढे आहेत.”

डॉ विजय येवले, पीडियाट्रिक्सचे सिनियर कन्सल्टन्ट-एचओडी, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी सांगितले,”अपोलो हॉस्पिटल्समध्ये आमचा दृष्टिकोन स्पष्ट आहे, आम्ही प्रत्येक मुलासाठी सुपरस्पेशालिटी पीडियाट्रिक देखभाल सहज, सुलभ बनवू इच्छितो. गेल्या काही वर्षांमध्ये कुटुंबांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे, त्यामुळे आम्ही मुलांच्या देखभालीमध्ये महत्त्वपूर्ण यश संपादन करू शकलो आहोत – २५ बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन, १७ किडनी ट्रान्सप्लान्टेशन, ६० लिव्हर ट्रान्सप्लान्टेशन, १०० पेक्षा जास्त मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी आणि २००० पेक्षा जास्त कार्डियाक प्रक्रिया आम्ही केल्या आहेत. अनेक अनोख्या केसेसमध्ये यशस्वी परिणाम संपादन केले आहेत – ३० पेक्षा जास्त निओनेटल कार्डियाक प्रक्रिया, एक्स्ट्रीम प्री-टर्म बाळांची देखभाल आमच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे करू शकलो आहोत. आमच्या काटेकोर इन्फेक्शन डिसीज प्रोटोकॉलने आम्हाला इन्फेक्शन बेंचमार्कपेक्षा खूप कमी ठेवण्यात सक्षम बनवले आहे.”

डॉ मंगई सिन्हा, अध्यक्ष, नवी मुंबई असोसिएशन ऑफ पीडियाट्रिक्स (एनएमएपी) म्हणाल्या,”वास्तविक जागरूकता आणि शाश्वत परिवर्तन यांची सुरुवात तळागाळापासून होते. अपोलो हॉस्पिटल्ससोबत आमच्या सहयोगाच्या माध्यमातून आम्ही मुले आणि पालकांच्या जीवनात एक भरीव परिवर्तन आणत आहोत. या समुदायांमध्ये आम्ही जो संवाद करत आहोत, त्यामुळे निरोगी सवयी आणि मजबूत कौटुंबिक बंध विकसित होत आहेत. त्यावरून हे दिसते की, भविष्याला आकार देण्यात सामुदायिक भागीदारी खूप जास्त प्रभावी ठरू शकते.”

Related posts

क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे पहिल्या तिमाहीत दमदार प्रदर्शन

Shivani Shetty

कोकणात कणकवली तालुक्यात सावंत कुटुंबियांनी साकारला ‘ऑपरेशन सिंदूर’चा देखावा

Shivani Shetty

भारतातील महिलांच्‍या हृदयाचे आरोग्‍य उत्तम राहण्‍यासाठी अँजाइनाबाबत जाणून घ्‍या

Shivani Shetty

Leave a Comment