maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरकडून ब्रँड अॅम्‍बेसेडर म्‍हणून ‘ड्रम टाओ’ची घोषणा

मुंबई, २५ सप्टेंबर २०२५: टोयोटा किर्लोस्‍कर मोटर (टीकेएम)ने जपानमधील आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील प्रतिष्ठित परफॉर्मन्‍स ग्रुप ड्रम टाओसोबत सहयोगाची घोषण केली आहे, जेथे त्‍यांची ब्रँड अॅम्‍बेसेडर म्‍हणून नियुक्‍ती केली आहे. उत्‍साहवर्धक परफॉर्मन्‍स, सर्वोत्तम नृत्‍यदिग्‍दर्शन आणि रंगमंचावरील नाविन्‍यपूर्ण कलेसाठी जगभरात प्रसिद्ध असलेले ड्रम टाओ या सहयोगाच्‍या माध्‍यमातून भारतात अद्वितीय संगीतमय प्रवासाचा आनंद देईल.

जपानी वारसा आणि भारताप्रती सखोल कटिबद्धतेमधून क्षमता व्‍यापून घेणाऱ्या कंपनीसाठी हा नवीन सहयोग आर्ट ऑफ परफॉर्मन्‍सला प्रशंसित करतो, तसेच सुसंगता, नाविन्‍यता व सर्वसमावेशकतेच्‍या समान मूल्‍यांवर देखील भर देतो, जे सीमांपलीकडे जातात आणि पिढ्यांना एकत्र आणतात.

सेल्‍स-सर्विस-युज्‍ड कार बिझनेस अँड प्रॉफिट एन्‍हान्‍ससमेंटचे उपाध्‍यक्ष श्री. वरिंदर वाधवा म्‍हणाले, “टोयोटा किर्लोस्‍कर मोटरमध्‍ये आमचा गतीशीलतेपलीकडे जाणारे अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्‍यावर विश्वास आहे. ड्रम टाओसोबत आमच्‍या सहयोगामधून हा उत्‍साह दिसून येतो, जेथे परंपरा व आधुनिक नाविन्‍यतेचे संयोजन होते. संगीत व तालचे जगभरात, विशेषत: आजच्‍या तरूणांमध्‍ये आकर्षण आहे, जे वैविध्‍यपूर्ण, उत्‍साही व प्रेरणादायी अनुभवांचा आणि टोयोटाचा दृष्टिकोन ‘सर्वांसाठी आनंद’शी संलग्‍न मूल्‍यांचा शोध घेतात.”

ड्रम टाओची विशिष्‍टता शक्तिशाली वा-डायको ड्रम्‍समध्‍ये सामावलेली आहे, जे लोककथा व आध्‍यात्मिकतेमध्‍ये खोलवर सामावलेले पारंपारिक बॅरल-आकाराचे जपानी वाद्य आहे. नाविन्यपूर्ण नृत्यदिग्दर्शन आणि शिनोब्यू (बासरी), कोटो (वीणा) आणि स्यामिसेन (गिटार) सारख्या जपानी वाद्यांच्या आधुनिक सादरीकरणासह त्यांचे सादरीकरण संवेदनशील अनुभव निर्माण करते, जे भाषेच्या पलीकडे जाते, प्राचीन विधी आणि आधुनिक काळातील देखाव्याची सांगड घालते. त्यांचे उत्‍साही, स्‍मार्टपणे पोशाख परिधान केलेले कलाकार प्रेक्षकांचे अधिक लक्ष वेधून घेतात.

ग्रुपला जपानी सरकारने ‘६वा जपान टूरिझम एजन्‍सी कमिशनरा अवॉर्ड’ आणि ‘मिनिस्‍टर फॉर इंटर्नल अफेअर्स अँड कम्‍युनिकेशन्‍स अवॉर्ड’सह देखील सन्‍मानित करण्‍यात आले.

नोव्‍हेंबर व डिसेंबर २०२५ मध्‍ये नियोजित करण्‍यात आलेल्‍या भारतातील १४ शहरांमधील समर्पित दौऱ्याचा भाग म्‍हणून प्रेक्षक संस्‍मरणीय सांस्‍कृतिक कार्यक्रमासाठी सुसज्‍ज राहू शकतात. आगामी दौऱ्याचे वेळापत्रक, स्‍थळ आणि विशेष पडद्यामागील क्षणांसाठी टीकेएमची वेबसाइट व सोशल मीडिया चॅनेल्‍सशी संलग्‍न राहा.

Related posts

‘इब्‍लू फिओ एक्‍स’ इलेक्ट्रिक स्‍कूटर लवकरच होणार लॉन्च

Shivani Shetty

झिप इलेक्ट्रिक डिलिव्‍हरी सहयोगींना देणार दिवाळी भेट

Shivani Shetty

महाराष्ट्राला १ ट्रिलियन अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात रत्न आणि दागिने उद्योग महत्त्वाची भूमिका बजावेल: आयआयजेएस सिग्नेचरचे उद्घाटन करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री डॉ. देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Shivani Shetty

Leave a Comment