maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

यंदाच्या पावसाळ्यात स्‍वस्‍थ रहा – प्रौढांनाही वार्षिक लसीची गरज कशासाठी!

यावर्षीच्या उन्हाळ्यात, भर मे महिन्यात अनपेक्षितपणे पाऊस पडला – भारताने 1901 पासूनचा सर्वात मुसळधार पाऊस पाहिला. मोसमी हवामान म्हणजे खरोखरीच एखाद्या रोलसकोस्टरसारखे वागू शकते – घटकेत आकाश ढगांनी भरून जाते, थंड वारे वाहू लागतात आणि घटकेत प्रखर ऊन पडते. तापमानात हे अचानक होणारे बदल, त्याजोडीला वाढता दमटपणा यांचा तुमच्या रोगप्रतिकारशक्तीवर विपरित परिणाम होऊ शकतो आणि त्यातून फ्लूसारखे मोसमी विषाणू अधिक सहजपणे फैलावू शकतात.

भारतासारख्या उष्णकटिंबधात येणा-या देशांत या कालावधीमध्ये फ्लू (किंवा इन्फ्लुएन्झा) वारंवार होण्याचे प्रमाण खूप जास्त असते. A(H1N1), A(H3N2), आणि इन्फ्लुएन्झा B सारखे फ्लूच्या विषाणूंना उसंत नसते – ते वर्षभर संक्रमित होत असतात. म्हणूनच वर्षातून एकदा फ्लूचे इंजेक्शन घेणे हा सुरक्षित राहण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे – मग ऋतू कोणतीही असो.

असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी व व्होरा क्लिनिक, मुंबईचे मेडिकल डायरेक्टर डॉ. अगम व्होरा यांच्यामते, “अनेक लोक फ्लू आणि नेहमीची सर्दी यांच्यामध्ये गोंधळतात – पण फ्लू हा सर्दीपेक्षा बराच गंभीर आजार आहे. दोन्हींमध्ये घसा बसणे किंवा खोकला यांसारखी समान लक्षणे दिसत असली तरीही, फ्लूमध्ये बरेचदा खूप ताप, अंगदुखी, डोकेदुखी आणि मळमळणे यांसारखी लक्षणेही जाणवतात4. ही लक्षणे लवकरात लवकर ओळखल्यास लवकर बरे होण्यास आणि गुंतागूंती टाळण्यास मदत होऊ शकते. आणि फ्लूचा विषाणू दरवर्षी बदलत राहत असल्याने, लसीमध्येही नियमितपणे सुधारणा केली जात असते – तेव्हा वर्षातून एकदा फ्लूचे इंजेक्शन घेणे हा सुरक्षित राहण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.5”
या मान्सूनमध्ये फ्लूपासून संरक्षण मिळविण्यासाठी तुम्ही पुढील 3 उपाययोजनांचा वापर करू शकता:

1. तुम्ही प्रवासात असाल तेव्हा साबण व पाण्याने आपले हात वरचेवर धुवा किंवा हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करा. आपल्या चेह-याला – विशेषत: आपले डोळे, नाक किंवा तोंडांला शक्यतो हात लावू नका – आणि तुमचा फोन किंवा दरवाज्याचा नॉब अशा ज्या-ज्या गोष्टींना तुमचा वारंवार हात लागतो त्यांना स्वच्छ ठेवण्यास विसरू नका.

2. ज्यांची तब्येत बरी नाही अशा व्यक्तींपासून अंतर राखण्याचा प्रयत्न करा. शक्य असेल तेव्हा खिडक्या उघडून ताजी हवा आत येऊ द्या आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क घालून जायला विसरू नका.

3. तुम्ही व तुमचे कुटुंब सुरक्षित राहण्यासाठीच्या खबरदारीच्या सगळ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करत आहे याची खातरजमा करा – आपल्या मुलांचे तसेच तुमचे स्वत:चे व तुमच्या घरात राहणा-या इतर प्रौढ व्यक्तींच्या लसीकरणाचे वेळापत्रक सांभाळा. फ्लूचे विषाणू सतत बदलत राहत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेद्वारे (WHO) शोधलेल्या या विषाणूच्या सर्वात नव्या प्रकारानुसार लसीमध्येही दरवर्षी सुधारणा केली जाते. म्हणूनच दरवर्षी लस घेणे इतके महत्त्वाचे आहे.

अबॉट इंडियाच्या मेडिकल अफेअर्स विभागाचे डायरेक्टर डॉ. जेजो करणकुमार म्हणाले, “लस ही काही फक्त मुलांसाठी नसते – प्रौढांनाही – विशेषत: फ्लूसारख्या संसर्गांपासून संरक्षणाची गरज असते. दरवर्षी फ्लू इंजेक्शन घेतल्याने आजारी पडण्याची शक्यता कमी होते व तुम्हाला तो झालाच तर लक्षणांची तीव्रता कमी होण्यासही या लसीची मदत होते. प्रतिबंधात्मक देखभालीतील ही एक साधी उपाययोजना आहे, ज्यामुळे विशेषत: वयोवृद्ध किंवा सहआजार असलेल्या लोकांच्या बाबतीत मोठा फरक पडू शकतो.”

तुम्ही निरोगी असलात, तरीही फ्लूमुळे तुमच्या जीवनाची गती मंदावू शकते – कामावर गैरहजरी लागते, डॉक्टरांकडे जावे लागते आणि अचानक आजारपणावरचा खर्च अंगावर पडतो. म्हणूनच जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी फ्लूचे इंजेक्शन घेण्याची शिफारस करते. ही लस गर्भवती स्त्रिया आणि तब्येतीच्या इतर तक्रारी असलेल्या लोकांसह सर्व वयोगटांना लागू पडते – व ती गंभीर आजारापासून तुमचे संरक्षण होण्यास मदत करते.6 आपण हवामानावर तर नियंत्रण आणू शकत नाही, पण आपण आपल्या आरोग्याची सूत्रे आपल्या हातात घेऊ शकतो. वार्षिक फ्लूचे इंजेक्शन ही एक साधीसोपी, विज्ञानाचे पाठबळ लाभलेली उपाययोजना आहे, जी केवळ तुमचेच नव्हे, तर तुमच्या भोवतालच्या लोकांचेही – विशेषत: वयोवृद्ध, लहान मुले आणि जुने आजार असलेल्या व्यक्तींचेही संरक्षण करते. तेव्हा यावर्षीच्या पावसाळ्यात, लक्षणे दिसेपर्यंत थांबू नका. आपल्या डॉक्टरांशी फ्लूची लस घेण्याविषयी चर्चा करा. कारण निरोगी राहणे म्हणजे केवळ आजारांना प्रतिसाद देणे नव्हे – तर त्याचा संबंध आजाराचा प्रतिबंध करण्याशीही आहे.

Related posts

मेडट्रॉनिकने भारतात आणली प्रगत NeuroSmartTM पोर्टेबल MER नेव्हिगेशन यंत्रणा

Shivani Shetty

*खेतान अँड कं., मेकमायट्रिप आणि शार्दुल अमरचंद मंगलदास लिंक्‍डइनच्‍या २०२५ टॉप मिडसाइज कंपनीज इंडिया लिस्‍टमध्‍ये अनुक्रमे टॉप ३ स्‍थानावर* ● कायदा, तंत्रज्ञान, आरोग्‍यसेवा क्षेत्रांमधील कंपन्‍यांनी टॉप १५ स्‍थानांपैकी १० स्‍थान मिळवले आहेत. ● १५ पैकी १४ मिडसाइज कंपन्‍या मुंबई (४), दिल्‍ली-एनसीआर (४), हैदराबाद (३) आणि बेंगळुरू (३) येथील आहेत भारत, १५ एप्रिल २०२५: लिंक्‍डइन (LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल नेटवर्कने आज भारतासाठी २०२५ टॉप मिडसाइज कंपनीज लिस्‍टचे अनावरण केले, ज्‍यामध्‍ये जगभरातील ५,०००० पेक्षा कमी कर्मचारी आणि भारतातील किमान २५० कर्मचारी असलेल्‍या, तसेच प्रोफेशनल्‍स त्‍यांचे करिअर घडवू शकतील अशा १५ कंपन्‍यांचा समावेश आहे. प्‍लॅटफॉर्मवरील लाखो प्रोफेशनल्‍सच्‍या एक्टीव्हिटीजच्‍या आधारावर ही लिस्‍ट या कंपन्‍यांमधील मागणीत असलेली कौशल्‍ये, टॉप लोकेशन्‍स आणि सर्वात मोठ्या जॉब फंक्‍शन्‍सबाबत माहिती देते, ज्‍यामुळे नोकरीसाधकांना त्‍यांच्‍या भावी संधीचा शोध घेण्‍यास मदत होते. प्रगती करण्‍याची क्षमता, कौशल्‍ये वाढ, बाह्य संधी आणि कंपनीशी जवळीक यांसह लिंक्‍डइनच्‍या आठ आधारस्‍तंभांमधील डेटामधून मिळवलेली ही लिस्‍ट स्‍पर्धात्‍मक रोजगार बाजारपेठेत टॅलेंटमध्‍ये गुंतवणूक करणाऱ्या आणि सक्रियपणे हायरिंग करणाऱ्या कंपन्‍यांना दाखवते. खेतान अँड कं. (Khaitan & Co) (#1) या वर्षीच्‍या लिस्‍टमध्‍ये अव्‍वलस्‍थानी आहे, ज्‍यानंतर मेकमायट्रिप (MakeMyTrip) (#2) आणि शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कं. (Shardul Amarchand Mangaldas & Co) (#3) यांचा क्रमांक आहे, ज्‍यामधून भारतभरात करिअर संधी निर्माण करण्‍यामध्‍ये कायदा व पर्यटन क्षेत्रांची क्षमता दिसून येते. ते वकील, कायदेशीर सहयोगी, खाते व्यवस्थापक आणि व्यवसाय विकास व्यवस्थापक यांसारख्या पदांसाठी हायर करत आहेत, ज्यामध्ये संवैधानिक कायदा, प्रवास व्यवस्थापन आणि महसूल विश्‍लेषण यांसारख्या कौशल्यांना मोठी मागणी आहे. मुंबई, गुरुग्राम आणि दिल्ली-एनसीआर येथे या हायरिंगचे प्रमाण सर्वाधिक आहे. लिंक्‍डइन करिअर एक्‍स्‍पर्ट आणि भारतातील वरिष्‍ठ व्‍यवस्‍था‍पकीय संस्‍थापिका (Nirajita Banerjee, LinkedIn Career Expert and India Senior Managing Editor) निरजिता बॅनर्जी म्‍हणाल्‍या, ”या वर्षीची लिस्‍ट कंपन्‍यांमधील विकास संधींना प्रकाशझोतात आणते, जेथे टीम्‍स कमी आहेत, भूमिका व्‍यावहारिक आहेत आणि प्रत्‍यक्ष व्‍यवसाय प्रभाव घडवण्‍याची शक्‍यता भरपूर आहे. १५ कंपन्यांपैकी चौदा कंपन्यांचे मुख्यालय मुंबई, दिल्ली-एनसीआर, बेंगळुरू आणि हैदराबाद येथे आहे. मुंबई व दिल्ली-एनसीआरमधील कायदा संस्था सक्रियपणे कायदेशीर टॅलेंटना नियुक्त करत आहेत, बेंगळुरूमध्‍ये सॉफ्टवेअर चाचणी व एआय अॅप्‍लीकेशन्‍स भूमिकांसाठी हायर केले जात आहे आणि हैदराबादमध्‍ये फार्मा, सेमीकंडक्टर आणि मीडिया ऑपरेशन्ससाठी मागणी वाढत आहे. डोमेन ज्ञान, टेक्निकल कौशल्य आणि प्रबळ संवाद व समस्या सोडवण्याची कौशल्ये असलेले प्रोफेशनल्‍स या क्षेत्रांमध्ये काम करतील आणि त्यांना या मिडसाइज कंपन्यांमध्‍ये नोकरी मिळण्याची शक्यता आहे.” या लिस्‍टमधून निदर्शनास येते की, मिडसाइज कंपन्‍या औषध शोध, आरोग्‍यसेवा तंत्रज्ञान व ग्राहक रिटेल अशा विभाग-संबंधित क्षेत्रांमध्‍ये करिअर संधी देत आहेत. अॅराजेन लाइफ सायन्‍सेस (Aragen Life Sciences) (#4) जेनेटिक इंजीनिअरिंग व फार्मास्‍युटिकल मॅन्‍युफॅक्‍चुरिंग कौशल्‍ये असलेल्या प्रोफेशनल्‍सना हायर करत आहे, तर ट्रायकॉग हेल्‍थ (Tricog Health) (#7) बायोमेडिकल इंजीनिअरिंग व सार्वजनिक आरोग्‍यामधील कौशल्‍याची आवश्‍यकता असलेल्‍या पदांवर लक्ष केंद्रित करते आहे. नायका (Nykaa) (#5) ब्‍युटी अॅडवायजर, ब्रँड मॅनेजर व शॉप मॅनेजर अशा पदांसह रिटेल, कॉस्‍मेटोलॉजी आणि कॉन्‍सेप्‍चुअर आर्टमध्‍ये संधी निर्माण करत आहे. लिंक्‍डइन लिस्‍टनुसार सास्‍केन टेक्‍नॉलॉजीज (Sasken Technologies) (#9) आणि मॉसचिप (MosChip) (#13) यांसारख्‍या कंपन्‍या इंजीनिअरिंग व डिझाइनमध्‍ये करिअर घडवण्‍यास मदत करत आहेत. ते डिझाइन इंजीनिअर्स, एम्‍बेडेड सॉफ्टवेअर इंजीनिअर्स आणि सिस्‍टम इंजीनिर्सना हायर करत आहेत, जेथे सिग्‍नल प्रोसेसिंग, इलेक्‍ट्रॉनिक कंट्रोल सिस्टम्‍स आणि मोबाइल अॅप्‍लीकेशन डेव्‍हलपमेंटमधील कौशल्‍यांसाठी मागणी वाढत आहे. लिस्‍टमधील इतर कंपन्‍यांमध्‍ये जनसंपर्क, शिक्षण तंत्रज्ञान, ना-नफा तत्त्‍वावर आधारित सेवा आणि होम सर्विसेसमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. अॅडफॅक्टर्स पीआर (Adfactors PR) (#8), प्रदान (PRADAN) (#10), एक्सेलसॉफ्ट टेक्‍नॉलॉजीज (Excelsoft Technologies) (#11) आणि अर्बन कंपनी (Urban Company) (#12) अकाउंट एक्झिक्युटिव्ह, सॉफ्टवेअर इंजीनिअर, डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट व बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट यांसारख्या भूमिकांसाठी हायर करत आहेत. या कंपन्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स, अॅक्टिव्ह लर्निंग, पब्लिक पॉलिसी आणि कॉस्मेटोलॉजी कौशल्ये असलेल्या टॅलेंटला हायर करत आहेत. २०२५ टॉप मिडसाइज कंपनीज इंडिया लिस्‍टमध्‍ये प्रवेश मिळवलेल्‍या १५ कंपन्‍या पुढीलप्रमाणे: 1. खेतान अँड कं. (Khaitan & Co) 2. मेकमायट्रिप (MakeMyTrip) 3. शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कं. (Shardul Amarchand Mangaldas & Co) 4. अॅराजेन लाइफ सायन्‍सेस (Aragen Life Sciences) 5. नायका (Nykaa) 6. सिरील अमरचंद मंगलदास (Cyril Amarchand Mangaldas) 7. ट्रायकॉग हेल्‍थ (Tricog Health) 8. अॅडफॅक्‍टर्स पीआर (Adfactors PR) 9. सास्‍केन टेक्‍नॉलॉजीज लिमिटेड (Sasken Technologies Limited) 10. प्रोफेशनल असिस्‍टण्‍स फॉर डेव्‍हलपमेंट अॅक्‍शन (प्रदान) (Professional Assistance For Development Action (PRADAN)) 11. एक्‍सेलसॉफ्ट टेक्‍नॉलॉजीज (Excelsoft Technologies) 12. अर्बन कंपनी (Urban Company) 13. मॉसचिप (MosChip®️) 14. मीडिया मिंट (MediaMint) 15. ट्रायकॉन इन्‍फोटेक (Tricon Infotech) लिंक्‍डइन न्‍यूज इंडियाद्वारे २०२५ टॉप मिड-साइज कंपनीज इंडियावरील संपूर्ण लेख येथे पहा.

Shivani Shetty

हाऊसिंगडॉटकॉम इझीलोनमध्‍ये गुंतवणूक करणार

Shivani Shetty

Leave a Comment