maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

यंदा जागतिक युवा कौशल्‍य दिनानिमित्त व्हिसाने भारतातील तरूणांसाठी स्‍मार्ट आर्थिक टिप्‍स

संपूर्ण विश्वामध्‍ये झपाट्याने बदल होत आहे आणि भारतातील तरूण आत्‍मविश्वासाने आर्थिक व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी कुशल होण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. यंदा जागतिक युवा कौशल्‍य दिनानिमित्त व्हिसा आर्थिक व्‍यवस्‍थापनासाठी आवश्‍यक असलेल्‍या कौशल्‍यांबाबत सांगत आहे, ज्‍यामुळे भारतातील तरूणांना स्‍मार्टपणे बजेटची आखणी करण्‍यास, हुशारीने खर्च करण्‍यास आणि आर्थिकदृष्‍ट्या सुरक्षित भविष्‍य घडवण्‍यास मदत होईल.

*1.* *डिजिटल खर्च विश्‍लेषणासाठी विश्‍लेषणात्मक विचार* : तुमच्या खर्चाचा मागोवा घेण्यासाठी, विश्‍लेषण करण्यासाठी आणि सुव्यवस्थित करण्यासाठी रिअल-टाइम अलर्टसह स्मार्टपणे मोबाइल वॉलेट वापरा. तुमचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड फक्‍त विश्वसनीय अॅप्सशी कनेक्ट करा.

*2. रोख प्रवाह नियंत्रणासाठी आर्थिक व्यवस्थापन:* दैनंदिन आणि साप्‍ताहिक खर्च व्यवस्थापित करण्यासाठी मर्यादा सेट करून खर्चाचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन करा. जमा-खर्च होणाऱ्या सर्व पैशांवर देखरेख ठेवण्‍यासाठी आणि रोख व्‍यवहारांसंदर्भात काळजी घेण्‍यासाठी एसएमएस आणि अॅप सूचना सक्षम करा.

*3. डिजिटल पेमेंट घोटाळे टाळण्यासाठी टेक्निकल अचूकता:* तंत्रज्ञान पेमेंट करण्‍याच्या पद्धतीला आकार देत आहे, आजच्‍या कनेक्टेड जगात सुरक्षित आणि दक्ष राहण्यासाठी स्मार्ट सवयींची गरज आहे. टॅप टू पे सारख्या सर्वात कॉन्‍टॅक्‍टलेस पेमेंट्सचा अवलंब करा, जे सुरक्षित आणि विनासायास तपासणीसाठी टू-फॅक्‍टर ऑथेन्टिकेशन व एआय-पॉवर्ड फ्रॉड डिटेक्‍शन या तंत्रांचा वापर करतात.

*4. नियोजन व वेळेचे व्यवस्थापन:* पेमेंट ऑटोमेट करण्यासाठी, आगामी खर्च ट्रॅक करण्यासाठी आणि अल्पकालीन व दीर्घकालीन उद्दिष्टांसह खर्चाची आखणी करण्‍यासाठी डिजिटल साधनांचा वापर करा. आज केलेले थोडेसे नियोजन तुम्‍हाला भविष्‍यासाठी सुसज्‍ज करते आणि तुमच्‍या ध्‍येयांची पूर्तता करते.
आज डिजिटल युगासाठी आवश्‍यक असलेली कौशल्ये आत्‍मसात करा, कारण आज योग्‍य आर्थिक व्‍यवस्‍थापन केल्‍यास भविष्‍यात डिजिटल युगामध्‍ये आत्‍मविश्वासाने आर्थिक व्‍यवहार करता येतील.

Related posts

सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट, नोएडा आणि आयआयटी मद्रास यांनी भारतीय भाषा, हेल्‍थ टेक आणि जनरेटिव्‍ह एआयसाठी एआयवरील संशोधनाला गती देण्‍यासाठी सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी केली

Shivani Shetty

झेल एज्‍युकेशनने विशेष गोलमेज परिषदेचे आयोजन केले

Shivani Shetty

विजय सेल्सच्या ख्रिसमस आणि एंड ऑफ न्यू इअर सेलला सुरुवात

Shivani Shetty

Leave a Comment