maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

घराची खरेदी-विक्री करणे झाले सोपे

मुंबई, २३ एप्रिल २०२५:* ‘हाऊसिंग चॅट’ नामक आपल्या प्रगत संवादात्मक टेक्नॉलॉजी सोल्यूशनच्या माध्यमातून हाऊसिंग डॉटकॉम या भारतातील नंबर १ रियल इस्टेट अॅपने उपभोक्त्यांचा अनुभव सुधारण्याच्या आणि घर खरेदी करण्याचा प्रवास सुलभ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी केली आहे. हाऊसिंग डॉटकॉम हा भारतीय प्रॉपटेक क्षेत्रातील हा असा एकमेव प्लॅटफॉर्म आहे, जो चॅटच्या माध्यमातून खरेदीदार आणि विक्रेता यांना एकमेकांशी थेट संवाद साधण्याची संधी देतो. रियल इस्टेट क्षत्रातील उपभोक्त्यांच्या सहभागात यामुळे लक्षणीय परिवर्तन झाले आहे. या चॅट फंक्शनच्या सुलभ समावेशामुळे ग्राहकांनी त्याचा अवलंब करण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. अवघ्या एका वर्षात दर महा २०,००० पेक्षा जास्त यूझर्स आणि २५,००० सहभाग सत्रांपासून ४००,००० यूझर्स आणि १ मिलियनपेक्षा जास्त सहभाग सत्रे अशी प्रचंड वाढ झाली आहे.

आजच्या गतीशील डिजिटल जगात उपभोक्ते त्यांना मिळत असलेल्या प्रत्येक सेवेत झटपट, सुलभ आणि निर्बाध सहभाग पसंत करतात. सध्या हाऊसिंग डॉटकॉम चे मोठ्या संख्येतील यूझर्स झटपट संपर्क साधण्यासाठी सक्रिय रित्या ‘हाऊसिंग चॅट’ मार्फत संवाद साधत आहेत. अशा प्रकारे घर खरेदी करण्याच्या, विकण्याच्या किंवा भाड्याने देण्या-घेण्याच्या प्रक्रियेतील हा महत्त्वाचा बिंदू ठरला आहे. यामध्ये रियल-टाइम संभाषण होते, ज्यामुळे पारदर्शकता आणि विश्वास वाढतो.

हाऊसिंग डॉटकॉमचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर श्री. सायमन होप यांनी टिप्पणी केली, “घर विकत घेणे किंवा भाड्याने घेणे हा खूप व्यक्तिगत प्रवास आहे. हाऊसिंग डॉटकॉम मध्ये आम्ही हे जाणतो की, आमच्या प्लॅटफॉर्मला भेट देणारा प्रत्येक यूझर आगळा-वेगळा असतो आणि म्हणूनच, पर्सनलाईझेशन आम्ही देत असलेल्या अनुभवाचा आत्मा आहे. व्यक्तिगत चॅट हा ते वचन पूर्ण करण्यातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे.”

हाऊसिंग डॉटकॉम चे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर श्री. अभिषेक मक्कार यांनी या तांत्रिक प्रगतीच्या लक्षणीयतेवर भर देत म्हटले, “घराची खरेदी, विक्री आणि ते भाड्याने देणे-घेणे निर्बाध करून उपभोक्त्याचा प्रवास सुरळीत करणे हेच आमचे पहिल्यापासूनचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. परस्पर संवाद संभव करणाऱ्या चॅट सुविधेसह, आम्ही एक सहज आणि प्रतिसाद देणारा प्लॅटफॉर्म तयार केला आहे, जो आधुनिक घर खरेदीदारांच्या अपेक्षा पूर्ण करतो.”

चॅट फीचरचे यश आणि कन्झ्युमर स्पेसमध्ये जेनएआयची वाढती गती यांच्या बळावर हाऊसिंग डॉटकॉम बदलत्या यूझर अपेक्षांच्या पुढे राहण्यासाठी सतत आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये सुधारणा करत आहे. बहुभाषिक क्षमता वाढवण्याच्या आणि यूझर संवाद आणखी पर्सनलाईझ करण्याच्या योजनेसह हाऊसिंग डॉटकॉम डिजिटल रियल इस्टेट सोल्यूशन्समध्ये क्रांती घडवण्याबाबत वचनबद्ध आहे आणि त्या योगे देशभरात घर खरेदी करणाऱ्याला, विकणाऱ्याला आणि भाड्याने देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला अधिक पारदर्शक आणि यूझर फ्रेंडली अनुभव सुनिश्चित करत आहे.

Related posts

रेनबो नेशन’मधील पर्यटकांपैकी ६३.६ टक्के मुंबईकर; अॅन्युअल इंडिया रोडशोदरम्यान साउथ आफ्रिकन टूरिझमतर्फे देण्यात आली माहिती

Shivani Shetty

विजय सेल्सच्या ख्रिसमस आणि एंड ऑफ न्यू इअर सेलला सुरुवात

Shivani Shetty

गोपाल स्नॅक्सने ग्राहकांना अधिक स्पष्टता आणि आधुनिक ब्रँड ओळख देण्याच्या उद्देशाने आपल्या उत्पादनांच्या नावांमध्ये बदल केले आहेत. विविध उत्पादनांच्या नावांतील या बदलांचा मुख्य उद्देश स्पष्टता वाढवणे आणि ब्रँडच्या ओळखीला आधुनिक स्वरूप देणे हा आहे.

Shivani Shetty

Leave a Comment