maharashtraprimenews
ठळक बातम्या
चित्रपटबॉलीवूडमनोरंजनमुंबईराष्ट्रीय

विकी कौशलचा सहभाग असलेला व्हायआरएफ’चा द ग्रेट इंडियन फॅमिली 22 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार!

यश राज फिल्म्स’ची आगामी कलाकृती द ग्रेट इंडियन फॅमिली (टीजीआयएफ) मध्ये विकी कौशलची मुख्य भूमिका आहे. विजय कृष्ण आचार्य यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा सिनेमा यावर्षी 22 सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शनासाठी तयार आहे.

 

विकी कौशल याचा अलीकडे प्रदर्शित झालेला जरा हटके जरा बचके तुफान गाजला, त्यामळे तो सध्या आपल्या करियरमध्ये चांगल्या ऊंचीवर आहे. त्यानंतर विकी या कौटुंबिक मनोरंजनपटाकडे वळला. या सिनेमाची कथा भारताच्या हृदयस्थळात घडते आणि विकीच्या वेडपट कुटुंबाभोवती फिरणारी आहे. कथेतील परिस्थितीनुरूप घोटाळा नियंत्रणाबाहेर जातो आणि कथेची रंगत वाढते!

विकी आपल्या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करताना आज व्हीडिओमध्ये त्याच्या धमाल कुटुंबाची ओळख प्रेक्षकांना करून देतो. हा सिनेमा लहान-थोर, सर्वांसाठी मजेची पर्वणी आहे.

 

व्हीडिओ इथे पहा: https://youtu.be/M1vbhsuGLFE

विकी कौशल या अभिनेत्याचा आपल्या देशात मोठा चाहता वर्ग आहे, त्याने उरी, मसान, राझी, संजू, सरदार उधम, मनमर्जीयां, जरा हटके जरा बचके अशा सिनेमांत उत्तम अभिनय साकारला!

आज हिंदी सिनेक्षेत्र सर्वोत्तम कंटेंटवर आधारीत आहे, विकी कौशल याने निवडलेले सिनेमे पाहिल्यास त्याचा कल कायमच उत्तम संहितांकडे असलेला दिसतो. अलीकडे प्रेक्षकांना चांगला सिनेमा पाहायचा असतो, द ग्रेट इंडियन फॅमिली (टीजीआयएफ) ही नक्कीच एक अशी फिल्म ठरेल. विकी कौशलसारख्या हरहुन्नरी अभिनेत्यामुळे चांगला सिनेमा चर्चेत असेल!

Related posts

वेदात मराठे वीर दौडले सात’ या आगामी मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अक्षय कुमार एकत्र

Shivani Shetty

पुनर्निर्मित सामग्री वापरुन लहान मुलांच्या खेळायच्या जागा बनविण्यासाठी FedEx आणि यूनायटेड वे, मुंबई एकत्र ६५०० मुलांना याचा फायदा मिळणार ‘प्लेस्केपस् प्रकल्पा’चे मुंबई, बंगळूर, दिल्ली आणि एनसीआर भागामध्ये पुनर्निर्मित सामग्रीचा वापर करून मुलांच्या बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकासास चालना देण्याचे लक्ष्य

Shivani Shetty

सोमय्या विद्याविहार विद्यापीठाने प्रथमच दीक्षांत समारंभ आयोजित केला आहे

Shivani Shetty

Leave a Comment