maharashtraprimenews
ठळक बातम्या
मनोरंजनसार्वजनिक स्वारस्य

आम्ही सिनेमाचा थिएट्रिकल ट्रेलर प्रदर्शित होण्याआधी गाणी प्रदर्शित करणार!” – सिद्धार्थ आनंद यांनी सांगितलं कशाप्रकारे ट्रेलरआधी गाणी प्रदर्शित करून पठाणच्या कथेची उत्सुकता वाढवत नेणार असल्याचं रहस्य

आदित्य चोप्रा आणि प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद पठाण सिनेमा देशातील सर्वात मोठा अ‍ॅक्शनपट ठरावा म्हणून पूर्ण प्रयत्न करत आहे. यश राज फिल्म्सचा हा नेत्रसुखद अ‍ॅक्शनपट पठाण आदित्य चोप्रा यांच्या महत्त्वाकांक्षी स्पाय युनिव्हर्सचा भाग असून त्यात शाहरूख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम असे देशातील सर्वात मोठे सुपरस्टार्स काम करत आहेत. इंटरनेटवर पठाणचं टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी अक्षरशः धुमाकूळ केला, कारण या सिनेमातून शाहरूख खान तब्बल चार वर्षांच्या गॅपनंतर परत येत आहेत. थक्क करायला लावणाऱ्या अ‍ॅक्शनने परिपूर्ण या सिनेमात दीपिका पदुकोण आतापर्यंत कधीही न दिसलेल्या रूपात दिसणार आहे, तर एसआरके जॉन अब्राहमच्या विरोधात उभं राहात चांगल्या आणि वाईटाचा थरारक संघर्ष दाखवून देतील.

 

पठाणची उत्सुकता वाढवण्यासाठी एकीकडे त्याबद्दलची प्रत्येक गोष्ट जास्तीत जास्त गुप्त ठेवत चाहत्यांना झलक दाखवली जाईल. म्हणूनच सिनेमातली दोन प्रेक्षणीय गाणी जानेवारीमध्ये ट्रेलर येण्यापूर्वीच प्रदर्शित केली जाणार आहेत.

 

सिद्धार्थ आनंद म्हणाले, ‘पठाणमध्ये दोन जबरदस्त गाणी आहेत. ही दोन्ही गाणी इतकी जबरदस्त आहेत, की पुढच्या वर्षाच्या चार्टबस्टरमध्ये आघाडीवर राहतील. म्हणूनच सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच आम्ही प्रेक्षकांना त्यांचा आनंद द्यायचं ठरवलं आहे.’

 

ते पुढे म्हणाले, ‘जगभरातील लोकांसाठी डिसेंबर हा पार्टी आणि सुट्टीचा काळ आहे. त्यामुळे आम्ही थिएट्रिकल ट्रेलर प्रदर्शित करण्याआधीच गाणी प्रदर्शित करत आहोत. हा पठाणची कथा सिनेमाच्या प्रदर्शनापर्यंत शक्य तितकी गुप्त राखण्याच्या आमच्या धोरणाचा एक भाग आहे. तेव्हा पठाणच्या संगीतावर ताल धरायला सज्ज व्हा!’

 

पठाण सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमिळ व तेलुगुमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Related posts

मिलिंद सोमणनच्या लाइफलोंग ग्रीन राइड ३.० ला सुरुवात; निरोगी आणि हरित भारतासाठी मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरु !

Shivani Shetty

भारतीय रेसिंग लीगसाठी नवा राजमार्ग तयार करण्यासाठी एक्झॉनमोबिलची रेसिंग प्रमोशन्सबरोबर भागीदारी

Shivani Shetty

अभिषेक पाठक दिग्दर्शित अजय देवगणच्या दृश्यम 2 ने रिलीजच्या दिवशी 15.38 कोटी कमाईचा टप्पा गाठला!

Shivani Shetty

Leave a Comment