maharashtraprimenews
ठळक बातम्या
आरोग्य वार्तादिल्ली

वेंकटेश्‍वर हॉस्पिटल, दिल्‍लीने मेडट्रॉनिक ह्युगो™ रोबोटिक-असिस्‍टेड सर्जरी सिस्टिमचा वापर करून यशस्‍वीरित्‍या पूर्ण केली पहिली युरोलॉजी शस्‍त्रक्रिया

  • २५ वर्षीय रूग्‍णावर पुनर्रचनात्‍मक शस्‍त्रक्रिया (पायलोप्‍लास्‍टी) करण्‍यात आली
  • मेडट्रॉनिक ह्युगो रोबोटिक-असिस्‍टेड सर्जरी (आरएएस) सिस्टिम स्‍थापित करण्‍यात आलेले उत्तर भारतातील पहिले हॉस्पिटल 

नवी दिल्‍ली, १० नोव्‍हेंबर २०२२: वेंकटेश्‍वर हॉस्पिटल, दिल्‍ली हे आघाडीचे मल्‍टी-सुपर स्‍पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडट्रॉनिक पीएलसीच्‍या पूर्णत: मालकीची उपकंपनी मेडट्रॉनिक प्रायव्‍हेट लिमिटेडने आज उत्तर भारतात ह्युगो रोबोटिक-असिस्‍टेड सर्जरी (आरएएस) सिस्टिमचा वापर करून यशस्‍वीरित्‍या करण्‍यात आलेल्‍या पहिल्‍या युरोलॉजिकल शस्‍त्रक्रियेची घोषणा केली. 

वेंकटेश्‍वर हॉस्पिटलच्‍या युरोलॉजी व रेनल ट्रान्‍सप्‍लाण्‍ट विभागाचे संचालक आणि प्रमुख डॉ. (मेजर जनरल) डी. व्ही. सिंग यांच्या नेतृत्वाखालील तज्ञ पथकाने ही ऐतिहासिक शस्‍त्रक्रिया पार पाडली. २५ वर्षीय रुग्णाच्‍या डाव्या बाजूला पीयूजे (पेल्विक यूरेटरिक जंक्शन) अडथळा होता आणि मूत्रपिंडाच्या कार्यामध्ये बिघाड होण्‍यासोबत किडनीचा आकार वाढला होता. रूग्‍णावर स्टेंटसह रोबोटिक-सहाय्यित लेप्रोस्कोपिक पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया (पायलोप्लास्टी) करण्यात आली, ज्यामुळे त्याच्या डाव्या मूत्रपिंडाचे कार्य यशस्वीरित्या पूर्ववत झाले आणि दोन दिवसांनी त्याला हॉस्पिटलमधून डिस्‍चार्ज देण्‍यात आला.

वेंकटेश्वर हॉस्पिटलने आशिया पॅसिफिक प्रदेशात ह्युगोTM आरएएस सिस्टिमसह पहिली सिस्टोप्रोस्टेक्टोमी देखील केली आहे. या शस्‍त्रक्रियेत मूत्राशय व प्रोस्टेट ग्रंथी आणि आसपासच्या लिम्फ नोड्स कमीतकमी इन्‍वेसिव्‍ह प्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आले आणि रुग्णाला चार दिवसांनी हॉस्पिटलमधून डिस्‍चार्ज देण्‍यात आला.

वेंकटेश्‍वर हॉस्पिटल्‍सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. कमल सोलंकी म्‍हणाले, “रोबोटिक सहाय्यक शस्त्रक्रियेचे सादरीकरण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या आणि उच्च दर्जाच्या क्लिनिकल सेवा व तडजोड न करता रूग्णसेवा प्रदान करण्याच्या आमच्या कटिबद्धतेला बळकटी देते. नवीन तंत्रज्ञान आमच्या डॉक्टरांच्या कौशल्याला पूरक आहे आणि आमच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रूग्णांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्हाला उपचार सुविधा वाढवण्यास मदत करते.”

पहिल्‍या शस्‍त्रक्रियेबाबत सांगताना वेंकटेश्‍वर हॉस्पिटल्‍सच्‍या सल्‍लागार समितीचे अध्‍यक्ष डॉ. वाय. पी. भाटिया म्‍हणाले, “या शस्‍त्रक्रिया रोबोटिक सहाय्यक शस्त्रक्रियेचे फायदे आणखी अनेक रुग्णांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पुढाकाराला सादर करतात, ज्यांच्या आरोग्याच्या स्थितीसाठी विशेषत: युरोलॉजी,ग्‍यानेकोलॉजी आणि सामान्य शस्त्रक्रिया अशा शस्त्रक्रिया उपचार आवश्यक आहेत. मला विश्वास आहे की आम्ही आता आमच्या रूग्णांना अधिकाधिक उपलब्‍धता, स्थिरता आणि केअर प्रदान करण्याच्या नवीन टप्प्यात प्रवेश करत आहोत.”

वेंकटेश्‍वर हॉस्पिटलच्‍या युरोलॉजी व रेनल ट्रान्‍सप्‍लाण्‍ट विभागाचे संचालक आणि प्रमुख डॉ. (मेजर जनरल) डी. व्ही. सिंग म्‍हणाले, ‘’मेडट्रॉनिकमधील ह्युगो आरएएस सिस्टिम शस्‍त्रक्रियेमधील एक अत्याधुनिक व्‍यासपीठ आहे, जे अधिक स्थिरता आणि उच्च सुस्पष्टतेसह कमीतकमी अॅक्‍सेसद्वारे जटिल शस्‍त्रक्रिया पार पाडण्यासाठी स्‍पेशालिट्सना सक्षम करेल. वेंकटेश्वर हॉस्पिटलमध्ये आमच्या रूग्णांना, विशेषत: आव्हानात्मक सर्जिकल परिस्थितींमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांना उच्च दर्जाचे सर्जिकल सोल्यूशन्स ऑफर करण्याचा आम्हाला सन्‍मान वाटतो.”

“भारतातील प्रत्येक रुग्ण दर्जेदार केअर आणि कमीतकमी इन्‍वेसिव्‍ह शस्त्रक्रियेचे फायदे मिळण्यास पात्र आहे. ते शक्य करण्यासाठी रोबोटिक सहाय्यक शस्त्रक्रिया महत्वाची आहे. ह्युगो आरएएस सिस्टिमसारखे मेडट्रॉनिक तंत्रज्ञान हेल्थकेअरला नवीन रूप देत आहे. रुग्णांना गरजेच्‍या काळात मदत करण्यासाठी वेंकटेश्वर हॉस्पिटल्ससोबत भागिदारी करण्याचा आम्हाला आनंद होत आहे,”असे मेडट्रॉनिक इंडियाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मदन कृष्णन म्हणाले.

ह्युगो आरएएस सिस्टिम एक मॉड्यूलर, मल्टी-क्वाड्रंट व्‍यासपीठ आहे, जे सॉफ्ट-टिश्यू प्रक्रियेच्या विस्तृत श्रेणीसाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. यात रिस्‍टेड इन्‍स्‍ट्रूमेंट्स, ३डी व्हिज्युअलायझेशन व टच सर्जरी एंटरप्राइझ, क्लाउड-आधारित सर्जिकल व्हिडिओ कॅप्चर व व्यवस्थापन सोल्यूशन, रोबोटिक्स प्रोग्राम ऑप्टिमायझेशन, सेवा व प्रशिक्षणात विशेष असलेल्या समर्पित सपोर्ट टीम्‍सचा समावेश आहे. कमीतकमी इन्‍वेसिव्‍ह शस्त्रक्रियेचे फायदे – कमी गुंतागूंत, लहान चट्टे,हॉस्पिटलमध्‍ये कमीतकमी स्‍टे आणि सामान्य नित्‍यक्रमांकडे जलद परत येणे1–3,† आणि जगभरातील अधिक रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी ह्युगो आरएएस सिस्टिम आणि टच सर्जरी एंटरप्राइझ डिझाइन केले आहे. आणि, असे केल्याने, केअर उपलब्‍धतेसंदर्भात जागतिक असमानता दूर करण्यास मदत होते.

वेंकटेश्‍वर हॉस्पिटल्‍स बाबत:

वेंकटेश्‍वर हॉस्पिटल्‍स हा आरोग्यसेवा संस्थांचा एक समूह आहे, जो संशोधन आणि शिक्षणासह हॉस्पिटल केअर सेवा देतो. शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ अग्रेसर असलेला हा आणखी एक उपक्रम आहे, जो उत्कृष्ट वैद्यकीय सुविधांसह उत्तम वैद्यकीय सुविधांची संकल्पना मांडतो. वेंकटेश्वर हॉस्पिटल ही दिल्लीतील द्वारका उपशहराच्या मध्यभागी स्थित वेंकटेश्वर ग्रुपची शाखा आहे. वेंकटेश्वर हॉस्पिटलमध्‍ये सर्वात पात्र डॉक्टर्स आणि सर्वोत्तम-श्रेणी तंत्रज्ञानाचे अनोखे संयोजन आहे. आजपर्यंत हॉस्पिटलने लाखो रूग्‍णांना यशस्वीरित्या सुविधा देण्‍यासोबत बरे केले आहे, ३०,००० हून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत, १०,००० हून अधिक हृदय शस्‍त्रक्रिया, ,००० हून अधिक ऑर्थोपेडिक शस्‍त्रक्रिया आणि ७,००० हून अधिक प्रसूती केल्या आहेत. हे ऑन्कोलॉजी, किडनी, यकृत आणि बोन मॅरो प्रत्यारोपणासाठी सर्वोत्तम केंद्र आहे. या वर्षाच्या अखेरीस समर्पित कॅन्सर हॉस्पिटल सुरू करून हे नैऋत्य दिल्लीतील सर्वात मोठे कॉर्पोरेट हॉस्पिटल बनण्यासाठी सुसज्‍ज आहे.

मेडट्रॉनिक बाबत:

धाडसी विचार. धाडसी कृती. आम्ही आहोत मेडट्रॉनिक, मेडट्रॉनिक पीएलसीचे मुख्यालय डब्लिन, आयर्लंड येथे असून ही एक अग्रगण्य ग्लोबल हेल्थकेअर टेक्नोलॉजी कंपनी आहे, जी उपाययोजनांचा शोध घेत मानवजातीला भेडसावणाऱ्या कठिणात कठीण वैद्यकीय आव्हानांना धाडसाने सामोरी जाते. वेदना दूर करत, आरोग्य पुनर्प्रस्थापित करत जीवनमान लांबविण्याचे आमचे ध्येय – १५० देशांमध्ये कार्यरत असलेल्या आमच्या ९०,००० हून अधिक ध्येयवेड्या लोकांच्या ग्लोबल टीमला एकत्र बांधून ठेवते. आमच्या टेक्नोलॉजीज आणि उपचारपद्धती ७० आरोग्यसमस्यांवर उपचार करतात व त्यात कार्डिअॅक उपकरणे, सर्जिकल रोबोटिक्स, इन्सुलिन पम्प्स, सर्जिकल टूल्स, पेशन्ट मॉनिटरिंग सिस्टिम व इतर अनेक तंत्रज्ञानांचा समावेश आहे. विविध क्षेत्रातील ज्ञान, अखंड जिज्ञासा आणि गरजवंतांना मदत करण्याची उर्मी यांच्या बळावर आम्ही नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान प्रदान करतो, ज्यामुळे दर दिवशी, दर तासाला, दर सेकंदाला दोन व्यक्तींच्या आयुष्यात परिवर्तन घडून येते. अंतर्ज्ञानावर आधारित आरोग्यसेवांनी आपली सक्षमता वाढविणाऱ्या आमच्या कंपनीकडून याहून चांगल्या कामगिरीची, लोकांना प्राधान्य देणाऱ्या अनुभवांची आणि अधिक चांगल्या परिणामांची अपेक्षा आपण ठेवू शकता. आपल्या प्रत्येक कामामध्ये आम्ही असाधारण असे काहीतरी घडवित आहोत.

मेडट्रॉनिक (NYSE:MDT) विषयी अधिक माहिती मिळविण्यासाठीwww.Medtronic.com येथे भेट द्या आणि ट्विटर @Medtronic LinkedInवर आम्हाला फॉलो करा. अधिक माहितीसाठी भेट द्या:medtronic.com/hugo.

Related posts

अंगणवाडी सेविका प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक, मुख्यंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना इशारा

cradmin

विद्यार्थ्यांना शिकवून घरी जाताना शिक्षिकेला रस्त्यातच मृत्यूने गाठलं; डंपरखाली चिरडून गमावले प्राण

cradmin

डीबीएस शस्त्रक्रियेनंतर येमेनच्या तरुणीला पुनर्जन्म झाल्यासारखे वाटू लागले*

Shivani Shetty

Leave a Comment