maharashtraprimenews
ठळक बातम्या
FinanceNew corporate announcement

युनियन म्युच्युअल फंडतर्फे गुंतवणूकदारांसाठी फेअर व्हॅल्यू स्पेक्ट्रमचे अनावरण

मुंबई, ऑगस्ट 16, 2023: युनियन असेट मॅनेजमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे
(युनियन एएमसी) नवनियुक्त चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर श्री. हर्षद पटवर्धन
ह्यांनी पुढील धोरणाबद्दल चर्चा केली. ते म्हणाले, “आमचा क्वाण्टामेण्टल
(परिमाणात्मक) गुंतवणूक दृष्टिकोन काटेकोर आणि दीर्घकाळावर लक्ष केंद्रित
करणारा आहे आणि तो आमच्यासाठी उपयुक्त ठरला आहे. अर्थात दीर्घकाळ म्हणजे
लघुकाळांची एक मालिकाच असते हे येथे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. व्यापक
अर्थशास्त्रीय घटक, व्यवसायाबद्दलच्या भावना, उद्योगक्षेत्रातील स्पर्धात्मकता
आणि कंपन्यांमधील परिस्थिती ह्या सर्वांमध्येच टप्पे अपरिहार्य असतात आणि
त्याचा प्रभाव अखेरीस वाजवी मूल्य (फेअर व्हॅल्यूज) व समभागांच्या किमती
ह्यांच्या मार्गांवर पडत असतो. भविष्यकाळात घटना कशा उलगडत जातील ह्याबद्दलची
अनिश्चितता ह्यांत अंगभूत असते. बदल व अनिश्चिततांच्या ह्या पदरांमधून
यशस्वीपणे मार्ग काढत गुंतवणुकीची निष्पत्ती सुधारण्यासाठी, धोरण बळकट राखणे
तसेच पोर्टफोलिओ व्यवस्थापन प्रक्रियांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.

 

पुढील काही महिन्यांमध्ये आणि वर्षांमध्ये, गुंतवणुकीच्या कामगिरीतील सातत्य
सुधारण्याचे ध्येय आमच्यापुढे आहे.

 

ह्याशिवाय, गुंतवणूकदारांचा अनुभव अधिक चांगला व्हावा ह्या दृष्टीने
गुंतवणूकदारांसोबतचा संवादही अधिक बळकट करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे आणि
आज निफ्टी-50 निर्देशांकासाठी न्याय्य मूल्य पट (फेअर व्हॅल्यू स्पेक्ट्रम)
सर्वांपुढे आणणे हे ह्याच दिशेने टाकलेले छोटे पाऊल आहे.”

 

युनियन एएमसीमधील इक्विटी विभागाचे को-हेड (सहप्रमुख) श्री. हार्दिक बोरा
ह्यांनी स्पष्ट केले, “फेअर व्हॅल्यू स्पेक्ट्रम हा बाजाराच्या आकर्षकतेचा अर्थ
लावण्याचा आमचा मार्ग आहे आणि तो इक्विटी बाजाराचे एक चित्र उभे करतो.
गुंतवणूकदारांचा गुंतवणुकीची निर्णय पॉइंट एस्टिमेट्सवर (एखाद्या निर्देशांकाचे
अंदाजे मूल्य शोधण्याची प्रक्रिया) आधारित असू शकत नसल्यामुळे, हे साधन
आकर्षकतेच्या अनेक श्रेणी प्रस्तुत करते आणि बाजाराचा वर्तमान स्तर कुठे हे हे
सांगते. त्यामुळे गुंतवणूकदाराला त्याच्या गुंतवणुकीचा वेग ठरवण्यात तसेच
इक्विटी किंवा हायब्रिड फंडांचा योग्य प्रवर्ग निवडण्यात मदत होते.
त्याचप्रमाणे बाजारात प्रचलित जोखीम-मोबदला व्यापाराचे भान राखण्यातही हे साधन
उपयुक्त ठरते.”

 

गुंतवणूकदारांना सुलभ व स्पष्ट दृश्य मार्गदर्शन पुरवण्याच्या उद्देशाने,
गुंतवणुकीच्या अनेक वर्षांच्या संशोधनातून, हे साधन विकसित करण्यात आले आहे.”

 

इंद्रधनुष्यातील रंगांवरून प्रेरणा घेत निफ्टी 50 इंडेक्सचे मूल्यांकन स्तर
पाच रंगांमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहेत. आकर्षकतेची ही पाच वेगवेगळी
क्षेत्रे खाली दाखवण्यात आली आहेत

 

Related posts

इंडियाबुल्स कमर्शियल क्रेडिट लिमिटेडचा अपरिवर्तनीय कर्जरोखे (NCD) ट्रान्चे I इश्यू खुला . कूपनचा दर, दरवर्षाला 10.30% पर्यंत# प्रभावी उत्पन्न दरवर्षाला 10.30% पर्यंत#

Shivani Shetty

टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड तर्फे सेबीकडे डीआरएचपी सादर

Shivani Shetty

पेमेटला पेमेंट एग्रीगेटर म्हणून काम करण्यासाठी आरबीआयकडून तत्वतः मंजूरी

Shivani Shetty

Leave a Comment