maharashtraprimenews
ठळक बातम्या
सार्वजनिक स्वारस्य

ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने तिस-या तिमाही परिणामांची घोषणा केली

मुंबई, ७ फेब्रुवारी २०२३: भारतातील आघाडीची एकीकृत पुरवठा साखळी व लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स प्रदाता ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.ने आज ३१ डिसेंबर २०२२ रोजी समाप्त झालेल्या तिसऱ्या तिमाहीसाठी त्यांच्या आर्थिक निकालांची घोषणा केली.

 

आर्थिक वर्ष २०२२ ची नऊमाही वि. आर्थिक वर्ष २०२३ ची नऊमाहीमध्ये कंपनीने कार्यसंचालनांमधून २८०२ कोटी रूपये महसूल गोळा केला आहे यात वार्षिक १८.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. ईबीआयटीडीए आर्थिक वर्ष २०२२ च्या नऊमाहीमधील ३२० कोटी रूपयांच्या तुलनेत ३६८ कोटी रूपये राहिला. पीएटी (करोत्तर नफा) आर्थिक वर्ष २०२२ च्या नऊमाहीमधील २०६ कोटी रूपयांच्या तुलनेत २३८ कोटी रूपये राहिला आणि १५.४ टक्क्यांनी वाढला.

टीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विनीत अग्रवाल म्हणाले, ‘‘आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्‍ये कंपनीने स्थिर मॅक्रो वातावरणात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. आमच्या सर्व व्यवसाय विभागांनी अपेक्षेनुसार समाधानकारक परिणाम दिले आहेत. आम्ही महागाई आणि पत प्रबळ करण्याच्या उद्योगव्यापी आव्हानांवर संतुलित दृष्टिकोन ठेवत असताना एकात्मिक मल्टी मॉडेल लॉजिस्टिक सोल्यूशन्स संस्था तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट साध्य करण्याचा आम्हाला विश्वास आहे. टीसीआयमध्ये आमची मूल्य प्रणाली आणि आमचे कर्मचारी हे आमच्या ग्राहकांच्या यशासाठी कारणीभूत आहेत.”

Related posts

टर्टलमिंटने फिटनेस आयकॉन मिलिंद सोमणसोबत केला ‘ग्रीन राईड २.०’ चा शुभारंभ

Shivani Shetty

यकृत दाता सचिन गोसावी – हेड कॉन्स्टेबल, नवी मुंबई पोलिस यांच्या तर्फे ध्वजारोहण

Shivani Shetty

इझमायट्रिप नुताना एव्हिएशनचे संपादन करणार

Shivani Shetty

Leave a Comment