maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

द बॉडी शॉपने विशेष फुल फ्लॉवर्स कलेक्‍शन लाँच केले

मुंबई, १५ सप्टेंबर २०२३: द बॉडी शॉप या ब्रिटन-स्थित आंतरराष्‍ट्रीय एथिकल ब्‍युटी ब्रॅण्‍डने ईओक्‍स डी परफ्यूमची मोहक श्रेणी लाँच केली आहे, जी तुम्‍हाला फुलांच्‍या सुगंधाचा अनुभव देते. या श्रेणीचे नाव फुल फ्लॉवर्स कलेक्‍शन असे असून हे प्रिमिअम फ्रॅग्रन्‍सेस फुललेल्या पाकळ्या, हिरवीगार पाने आणि सुवासिक वृक्षाच्छादित देठांचे सार कॅप्चर करतात, ज्‍यामधून दिवसभर सुगंध दरवळत राहण्‍याची खात्री मिळते. या कलेक्शनमध्ये फुल रोज – ईओ डि परफ्यूम, फुल आयरीस – ईओ डि परफ्यूम, फुल इलंग इलंग – ईओ डि परफ्यूम, फुल ऑरंज ब्‍लॉसम – ईओ डि परफ्यूम आदी उत्पादनांचा समावेश आहे.

संपूर्ण फुलामधून प्रेरित फुल फ्लॉवर्समधील फ्रॅग्रन्‍सेसच्‍या अगदी थोड्या थेंबांच्‍या शिडकाव्‍यांमधून देखील फुलांचा सुगंध येतो. फुल फ्लॉवर्स कलेक्‍शनमधील प्रत्‍येक फ्रॅग्रन्‍स नैसर्गिक सौंदर्य व आकर्षकतेला साजरे करते आणि द वेगन सोसायटीद्वारे प्रमाणित आहे. द बॉडी शॉपने या फ्रॅग्रन्‍सेसच्‍या बॉटल्‍ससाठी पुनर्चक्रण केलेल्‍या काचेचा वापर करत आणि नैसर्गिकरित्या नूतनीकरण करण्यायोग्य लाकूड व कॉर्कपासून कॅप्स (झाकण) तयार करत स्थिरतेप्रती आपली कटिबद्धता कायम राखली आहे.

द बॉडी शॉप एशिया साऊथच्‍या मार्केटिंग, प्रॉडक्‍ट अॅण्‍ड डिजिटलच्‍या उपाध्‍यक्ष श्रीमती हरमीत सिंग म्‍हणाल्‍या, “द बॉडी शॉप सौंदर्याच्‍या घटकांमध्‍ये सुधारणा करणारी उद्योगातील पहिली कंपनी आहे. आमच्‍यासाठी सौंदर्य म्‍हणजे स्‍वत:वरील प्रेम व आत्‍मविश्‍वास. आम्‍ही पारंपारिक मानकांच्‍या पुढे जाण्‍याचा प्रयत्‍न केला आहे आणि ग्राहकांना त्‍यांच्‍या अद्वितीय स्‍टाइलला प्रकट करण्‍यास मदत करतो, तसेच त्‍यांचे व्‍यक्तिमत्त्‍व अधिक आकर्षक करणारी उत्‍पादने प्रदान करतो. ग्राहकांचा सेंटचा वापर केल्‍यानंतर येणाऱ्या सुगंधाबाबत अभिप्राय जाणून घेत हे नवीन कलेक्‍शन डिझाइन करण्‍यात आले आहे. या कलेक्‍शनमध्‍ये अद्वितीय वैशिष्‍ट्ये आहेत. प्रत्‍येक फ्रॅग्रन्‍समध्‍ये फुलांच्‍या अर्कामधून मिळवलेल्‍या सुगंधाचा समावेश आहे. यामध्‍ये ग्रास, फ्रान्‍समधील गुलाब, फ्रान्‍सच्‍या दक्षिणेकडील आयरीस कॉंक्रिट या फुलांचा समावेश आहे. इजिप्‍तमधील मादागास्कर येथील इलंग इलंग तेल आहे. तसेच या श्रेणीच्‍या प्रत्‍येक बॉटलमध्‍ये सुगंध, सौंदर्य व जबाबदारीपणाचे परिपूर्ण संयोजन आहे. ९० टक्‍के नैसर्गिक घटकांसह तयार करण्‍यात आलेले हे फ्रॅग्रन्‍स कलेक्‍शन वेगन सोसायटीद्वारे प्रमाणित आहे. यामधील घटक बारकाईने निवडण्‍यात आले आहेत आणि त्‍यामध्‍ये कोणतेही केमिकल्‍स नाहीत.”

 

Related posts

एटंेरोहल्ेथकेयरसोल्यशुन्सलिलिटेडनेसबेीकडेडीआरएचपीफाईिकेिे

Shivani Shetty

शबाना आज़मीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने IMDb वरील तिचे सर्वोच्च रेटींग असलेले टॉप 15 चित्रपट पाहा

Shivani Shetty

आयसीसी मेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कपची ऑफिशियल बेव्‍हरेज सहयोगी थम्‍स अपकडून मोहिम ‘थम्‍स अप उठा, इंडिया इंडिया मचा’ लाँच

Shivani Shetty

Leave a Comment