maharashtraprimenews
ठळक बातम्या
आरोग्य वार्तापुणेमहाराष्ट्रमुंबई

सुप्रीम फार्माकडून मुंबई व पुण्‍यामध्‍ये सुप्रीम सुपर फूड्स लाँच

(L-R) श्री YV विजय कुमार, मुख्य व्यवसाय अधिकारी श्री. S.N राव, व्यवस्थापकीय संचालक, Supreem 
Superfoods, श्री. हारून बदुशा, हेड ब्रँड मार्केटिंग यांच्या हस्ते Supreem Superfoods लाँच करण्यात आले.


मुंबई व पुणे, ९ नोव्‍हेंबर २०२२: संपूर्ण भारतातील महत्त्वाकांक्षी विस्तार योजनेचा एक भाग म्हणून सुप्रीम फार्मास्युटिकल्स म्हैसूर प्रा. लि.ने आज मुंबई आणि पुणे येथे सुप्रीम सुपरफूड्स, हेल्दी सुपरफूड ब्रॅण्‍डच्‍या लाँचची घोषणा केली. ब्रॅण्‍डने पार्ले इंटरनॅशनल हॉटेल, मुंबई येथे सुप्रीम सुपरफूड्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. एस. एन. राव यांच्या उपस्थितीत नॉर्मलाइफ आणि नॉर्महेल्थ या दोन कार्यक्षेत्रांतर्गत ३० हून अधिक उत्पादनांचे अनावरण केले. 
मुंबई व पुण्यात हा ब्रॅण्‍ड सर्व आघाडीचे रिटेल आउटलेट्स, एक्सक्लुझिव्ह ब्रॅण्‍ड आउटलेट्स आणि सुप्रीम सुपर फूड नेबरहुड स्टोअर्समध्ये उपलब्ध असेल, जे एफएमसीजी, फार्मा, होरेका, संस्था व ई-कॉमर्सला नॉर्मलाइफ आणि नॉर्महेल्थ या दोन उत्पादन कार्यक्षेत्रांसह सेवा देतात. सुप्रीम सुपर फूड्सचे उद्दिष्ट चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत आपल्‍या उत्‍पादनांची श्रेणी १०० पेक्षा अधिक उत्पादनांपर्यंत वाढवण्याचे आहे.
नोव्हेंबर २०२१ मध्ये बंगळुरू येथे लाँच झाल्यापासून या ब्रॅण्‍डने प्रचंड वाढ साधली आहे, जी निवडक जीटी स्टोअर्स, नॅशनल मॉडर्न ट्रेड आउटलेट्स, रीजनल मॉडर्न ट्रेड आउटलेट्स, फार्मा मॉडर्न ट्रेड आउटलेट्स आणि ई-कॉमर्समधील त्याच्या प्रमुख उपस्थितीवरून दिसून येते. 
लाँचप्रसंगी बोलताना सुप्रीम सुपरफूड्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. एस. एन. राव म्हणाले की, न्यूट्रास्युटिकल्स बी२बी उद्योगात ३५ वर्षांहून अधिक काळ सेवा दिल्यानंतर आता आम्ही तीच उत्‍कटता आणि सचोटीने अंतिम ग्राहकांना सेवा देत आहोत. '‘सुप्रीम फार्मा पोषण आहारातील पोकळी भरून काढण्यासाठी आणि आहाराच्या सेवनातील अंतर दूर करून निरोगी जीवनमान वाढवण्यासाठी सुपरफूड्सच्या बाजारात प्रवेश करत आहे. कंपनीने फूड सायन्समध्ये व्‍यापक संशोधन केले आहे आणि पोकळी भरून काढण्‍यास मदत करण्यासाठी उपाय सादर केले आहेत. या प्रक्रियेत आरोग्य आणि आनंदाशी संबंधित समुदाय तयार करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्‍यामध्‍ये परिवर्तन होण्यास मदत होईल.” 
ते पुढे म्‍हणाले, ‘’पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस मुंबई आणि पुणे विभागातील २००० हून अधिक स्टोअर्समध्ये निवडक जनरल ट्रेड, सर्व एफएमसीजी मॉडर्न ट्रेड आणि सर्व फार्मा मॉडर्न ट्रेड आउटलेट्समध्ये उपस्थित राहण्याची आम्हाला आशा आहे. आम्ही जयपूर, अहमदाबाद, कोलकाता आणि हैदराबादमध्ये प्रवेश करू इच्छितो, जेथे स्‍टोअर्स लाँच करण्‍याची तयारी जोरात सुरू आहे. मार्च २०२३ पूर्वी मुंबई आणि पुण्यातील १५ लाख घरांचे नमुने घेण्याची आमची भव्य योजना आहे. डिसेंबर २०२२ पूर्वी आम्ही आमचा ब्रॅण्‍ड चारही मेट्रो शहरे आणि ४ मिनी मेट्रो शहरांमध्ये लाँच करणार आहोत.’’   
ब्रॅण्‍डने नुकतेच दिल्ली एनसीआर, तामिळनाडू आणि गोवा येथे आपल्या उपस्थितीची घोषणा केली आहे, जेथे मार्च २०२३ पर्यंत २०,००० हून अधिक आउटलेट्समध्ये उपस्थित राहण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
सुप्रीम फार्मास्युटिकल्स म्हैसूर प्रा. लि.ने बी२बी व्यवसायामध्‍ये गेल्या आर्थिक वर्षात ७७ कोटी रुपयांचा महसूल संपादित केला. गेल्या ५ वर्षांत सीएजीआर २० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. ग्राहक उत्पादने विभाग सुप्रीम सुपर फूड्स लाँच केल्यामुळे कंपनीला या आर्थिक वर्षात जवळपास ९० ते १०० कोटी रूपयांचा एकत्रित महसूल गाठण्याची आशा आहे. सुप्रीम फार्मास्युटिकल्स २५० कोटी रूपयांहून अधिक एकत्रित महसूलापर्यंत पोहोचण्‍यासाठी याच कालावधीत सीएजीआर ३० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक संपादित करण्‍याच्‍या उद्देशाने ग्राहक व्‍यवसाय निर्माण करण्‍याकरिता पुढील ५ वर्षांत २५ कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक करत आहे, जेथे दोन्‍ही विभाग व्‍यवसायाला समान दर्जा देतात.  
सुप्रीम सुपर फूड्स नवोन्‍मेष्‍कार, अनुभव व दृष्टिकोनाला एकत्र करत आरोग्यदायी राहणीमानासाठी दर्जा उंचावण्‍याच्‍या मिशनवर आहे. त्‍यांनी स्‍मार्ट, शाश्‍वतपूर्ण सुपरफूड्स विकसित केले आहेत आणि त्‍याबाबत अधिक संशोधन करत आहेत.

 

Related posts

आयएलटी 20 तिसऱ्या आवृत्तीसाठी जागतिक क्रिकेट स्टार्सच्या साहाय्याने सज्ज

Shivani Shetty

परवडण्याजोगी आरोग्यसेवा उपलब्ध करण्यासाठी ‘ईझेरेक्स’चा पुढाकार

Shivani Shetty

डीबीएस शस्त्रक्रियेनंतर येमेनच्या तरुणीला पुनर्जन्म झाल्यासारखे वाटू लागले*

Shivani Shetty

Leave a Comment