maharashtraprimenews
ठळक बातम्या
इलेक्ट्रॉनिकदिल्ली

सणासुदीच्या काळाची झळाळी आणखी वाढली; सिग्निफाय देऊ करत आहे घराच्या प्रत्येक कोपऱ्यासाठी लायटिंग सोल्युशन

नवी दिल्ली, भारत – सिग्निफाय (Signify) (युरोनेक्स्ट: LIGHT) ही लायटिंगच्या क्षेत्रातील जागतिक स्तरावरील आघाडीची कंपनी, घराच्या प्रत्येक कोपऱ्यासाठी ऊर्जा कार्यक्षम व सौंदर्यपूर्ण प्रसन्न लायटिंग सोल्युशन्स पुरवण्याच्या उद्दिष्टाने डिझाइन केलेल्या प्रकाशमान उपकरणांच्या मालिकेच्या माध्यमातून, सणासुदीचा काळ साजरा करत आहे. या प्रभावी फिक्स्चर्सच्या तसेच मोबाइल अॅप्लिकेशन्स व प्लॅटफॉर्म्सद्वारे केल्या जाणाऱ्या स्वयंचलित नियंत्रणांच्या माध्यमातून एलईडी डाउनलायटर्सपासून ते एलईडी स्ट्रिप्स व स्पॉटलाइट्सपर्यंत सर्व स्मार्ट लायटिंग सोल्युशन्स यात आहेत. ही प्रकाशयोजना घरातील चित्तवृत्तींचा क्षणात कायापालट घडवून आणते आणि सकारात्मकता निर्माण करते.
तुमच्या मनात सणासुदीचा उत्साह खात्रीने निर्माण करतील असे, फिलिप्स स्मार्ट शोभिवंत श्रेणीतील, काही लाइट्स पुढे दिले आहेत:
१. फिलिप्स ले क्रिस्ट्ल शॅण्डेलियर: फिलिप्सचे क्रिस्ट्ल शॅण्डेलियर म्हणजे साहित्य व रचनेचा सुंदर मिलाफ आहे. फिलिप्सची प्रत्येक उत्पादनातील डिझाइनबाबतची संवेदनशीलता आणि अस्सल क्रिस्ट्ल साहित्याची ग्वाही यामुळे उत्पादन दीर्घकाळ नवीन दिसत राहते, त्याची चकाकी वर्षानुवर्षे टिकते आणि तुमचे घरही चमकत राहते. ले क्रिस्ट्लच्या माध्यमातून, फिलिप्सने प्रकाशयोजना एका वेगळ्या स्तरावर नेली आहे. या स्तरावर कला, रचना व तंत्रज्ञान एकत्र येतात आणि लोकांच्या अभिरुचीला साजेसा अनुभव निर्माण करतात.
२. फिलिप्स डाउनलायटर्सची श्रेणी: सिग्निफायकडे फिलिप्स ग्रीन परफॉर्म परफेक्ट फिट डाउनलायटर्स नावाची थ्रीडी प्रिंटेड लाइट्सची टेलर-मेड व शाश्वत श्रेणी आहे. नवीनतम एलईडी तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि कामगिरी व दर्जाच्या उत्कृष्टतेच्या दृष्टीने डिझाइन केलेले फिलिप्स डाउनलायटर्स नवोन्मेष व आधुनिक रचना यांचा परिपूर्ण मिलाफ आहे. या डाउनलायटर्समध्ये एलईडीचा ऊर्जा बचतीचा लाभ आहे, प्रकाशाचा चांगला दर्जा आहे आणि यांची कोणतीही देखभाल (मेण्टेनन्स) करावी लागत नाही. हे कस्टम थ्रीडी प्रिंटेड, १०० टक्के रिसायकल करण्याजोग्या पोलीकार्बोनेट साहित्यापासून तयार केलेले लाइट्स आहेत. या उत्पादनामुळे होणारे कार्बन उत्सर्जन पारंपरिक धातूच्या दिव्यांमुळे होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाच्या तुलनेत ४७ टक्के कमी आहे.
३. फिलिप्स हेक्झास्टाइल एलईडी डाउनलाइट: फिलिप्स हेक्झास्टाइल एलईडी डाउनलायटर्स हे अनन्यसाधारण, अशा प्रकारचे एकमेव षटकोनी आकाराचे डाउनलाइट्स आहेत. हे छतामध्ये अनोख्या प्रकाशरचना तयार करण्यासाठी वेगवेगळ्या नमुन्यांमध्ये लावले जाऊ शकतात. याशिवाय, हे लाइट्स वर्तुळाकृती फिटमेंटमध्ये तयार केले जातात, त्यामुळे ते सीलिंगमधील (छत) नियमित वर्तुळाकृती खोबणींमध्ये सहज लावले जाऊ शकतात. हे दिवे प्रति वॅट १०० ल्युमन्स एवढी उच्च ऊर्जा कार्यक्षमता देतात आणि वॉर्म व्हाइट व कूल व्हाइट अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये कंपनीचे आय कम्फर्ट तंत्रज्ञानही वापरण्यात आले आहे, जेणेकरून डोळ्यांवर या प्रकाशाचा ताण येत नाही.
४. विझ ल्युमिनेअर स्क्वायर टेबल लॅम्प आणि विझ ल्युमिनेअर हिरो टेबल लॅम्प: विझ स्क्वायर ड्युअल झोन टेबल लॅम्प आणि विझ ल्युमिनेअर हिरो टेबल लॅम्प ही दोन्ही उत्पादने भिंतीवर रंगीत प्रकाश टाकतात. ग्राहक विझ अॅप किंवा व्हॉइस वापरून सहजपणे हा प्रकाश सौम्य किंवा प्रखर करू शकतात किंवा वाय-फाय सेटअप्सद्वारे प्री-सेट लाइट मोड्सही वापरू शकतात. या लॅम्पचे अनन्यसाधारण ड्युअल-लाइट-झोन डिझाइन तुम्हाला भिंतीवर प्रकाशाचा झोत दाखवण्याची मुभा देते, तसेच ज्या टेबलावर किंवा काउंटवर हा लॅम्प ठेवला जातो, तेथे सौम्य प्रभा निर्माण होते. विझ झिरो टेबल लॅम्पच्या सूक्ष्म वर्तुळाकार डिझाइनमुळे तुमच्या लिव्हिंग एरियातील कोणत्याही कोपऱ्यात रंगीत स्मार्ट लायटिंग शक्य होते. विझ तुमच्या आधीपासून वापरात असलेल्या वाय-फाय रूटरमार्फत वापरले जाऊ शकते आणि स्मार्टफोनद्वारेही नियंत्रित केले जाऊ शकते.
तेव्हा, यंदाच्या सणासुदीच्या काळात, योग्य प्रकारचे लाइट्स निवडून कार्यात्मकता व शैलीच्या अखंड संगतीने तुमच्या खोल्यांचा चेहरा पालटून टाका.

Related posts

वेंकटेश्‍वर हॉस्पिटल, दिल्‍लीने मेडट्रॉनिक ह्युगो™ रोबोटिक-असिस्‍टेड सर्जरी सिस्टिमचा वापर करून यशस्‍वीरित्‍या पूर्ण केली पहिली युरोलॉजी शस्‍त्रक्रिया

Shivani Shetty

उद्धव ठाकरेंना मोठा झटका, शिवसेना जिल्हाप्रमुखाचे झेडपी सदस्यत्व रद्द

cradmin

२६/११ च्या धर्तीवर मुंबईत तीन ठिकाणी पुन्हा बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क

cradmin

Leave a Comment