maharashtraprimenews
ठळक बातम्या
मुंबईसमाजकार्यसार्वजनिक स्वारस्य

सचिन तेंडुलकर आणि आयुषमान खुराना प्रतिकात्मक फुटसल सामन्यासाठी एकत्र येणार, युनिसेफसाठी बालहक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी खेळणार सामना

युनिसेफ इंडिया 14 नोव्हेंबर (राष्ट्रीय बाल दिन) ते 20 नोव्हेंबर (जागतिक बालदिन) या दरम्यान बाल हक्क सप्ताह साजरा करणार असून त्यादरम्यान कोणतेही लिंग, वंश, धर्म, अपंगत्व, लैंगिक प्राधान्य किंवा इतर कोणत्याही परिस्थितीतील लहान मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करत त्याद्वारे त्यांच्यात विशेषतः वंचित आणि दुर्लक्षित मुलांमध्ये सुरक्षेची, आपल्याला समाविष्ट केले जाण्याची भावना निर्माण केली जाणार आहे.

सर्वसमावेशकता आणि समानतेचं तत्व बिंबवण्यात क्रीडाप्रकार महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यातून मुलांना नेतृत्व, सांघिक भावना, सहनशक्ती, सहकार्य अशी महत्त्वाची जीवनकौशल्ये विकसित करण्यात मदत होते. सर्वसमावेशकता साध्य करण्यात खेळाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी लहान मुले व धोरणकर्ते खेळाच्या माध्यमातून लिंग समानता व सर्वसमावेशकता निर्माण करण्याबद्दल चर्चा करतील. 16 नोव्हेंबर 2022 रोजी या चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. धोरणकर्ते मुलांशी संवाद साधून त्यांचे अनुभव, अडचणी, महत्त्वाकांक्षा व कशाप्रकारे खेळामुळे त्यांना आपल्या आव्हानांवर मात करणे शक्य झाले हे जाणून घेतील.

शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 रोजी सचिन तेंडुलकर, युनिसेफ दक्षिण आशियाचे प्रादेशिक अ‍ॅम्बेसिडर आणि बॉलिवूड स्टार आयुषमान खुराना, युनिसेफ सेलिब्रेटी कायदेतज्ज्ञ, युनिसेफ इंडिया प्रतिकात्मक फुटसल सामन्यासाठी हजेरी लावतील. खेळातून सर्वसमावेशकता साधण्याचा उद्देश अधोरेखित करण्यासाठी 8 राज्यांतील लहान मुलेही या सामन्यात सहभागी होतील.

‘जागतिक बालदिन हा युनिसेफचा मुलांसाठी मुलांनी राबवलेला जागतिक कार्यवाही दिवस आहे. खेळामुळे सहभागाला चालना मिळते, लिंगभेद- सामाजिक अडथळे कमी करण्यास मदत होते. लिंग समानता साध्य करण्यासाठी खेळ हे शक्तीशाली साधन आहे. सामाजिक नियम बदलण्यात खेळ प्रमुख भूमिका बजावू शकतात. खेळामुळे मुलींना त्यांची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मार्ग खुला होईल. यावर्षी प्रत्येक मूल सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देणाऱ्या खेळाच्या ताकदीचा लाभ घेईल आणि त्यातून प्रत्येक मुलाला समानतेनं वागवलं जाईल. प्रत्येक मूल कोणत्याही भेदापासून दूर व सुरक्षित राहील याची खबरदारी आपण घेतलीच पाहिजे,’ असे युनिसेफच्या भारतातील प्रतिनिधी सिंथिया मॅककॅफ्री म्हणाल्या.

देश तसेच जगभरातील प्रसिद्ध इमारती आणि वास्तू जागतिक बालदिनी बालहक्काचे महत्त्व दाखवून देण्यासाठी निळ्या प्रकाशात सजतील. राष्ट्रपती भवन (राष्ट्रपतींचे घर), संसद भवन, राज्य विधानसभेच्या इमारती आणि भारतभरातील प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू #GoBlue अंतर्गत सजणार आहेत. निळा रंग भारत आणि जगभरातील (#EveryChild) प्रत्येक मुलाच्या हक्काकडे लक्ष वेधेल.

अधिकारांमधील कलम 31 नुसार प्रत्येक मुलाला विश्रांती घेण्याचा, खेळण्याचा अधिकार आहे. खेळ मुलांच्या मानसिक व शारीरिक वाढीसाठी, जीवनकौशल्ये विकसित करण्यासाठी, सर्वसमावेशकता व नेतृत्वगुणांना चालना देण्यासाठी आवश्यक आहे.

Related posts

गो फर्स्टचा इझमायट्रिपसह भागीदारी करार

Shivani Shetty

क्विक हीलची पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना आरोग्यसेवेची भेट

Shivani Shetty

सिग्निफायकडून नवीन पोर्टेबल स्‍मार्ट लॅम्‍प्‍ससह फिलिप्‍स स्‍मार्ट वाय-फाय लायटिंग श्रेणीचा विस्‍तार

Shivani Shetty

Leave a Comment