maharashtraprimenews
ठळक बातम्या
बॉलीवूडमनोरंजनमुंबई

पठाण’मध्ये दीपिकाच्या अभूतपूर्व हॉट आणि कूल अंदाजाची सरमिसळ !’ : सिद्धार्थ आनंद

दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हे यशराज फिल्म्सच्या पठाण’चं दिग्दर्शन करत असून, आदित्य चोप्राच्या नजरेतून भारतीय सिने-इतिहासातील सर्वात भव्य हेर विश्व उभं करत आहेत. शाहरूख खानसारखा सुपरस्टार तब्बल चार वर्षांनंतर चंदेरी पडद्यावर पदार्पण करतो आहे. त्याच्यासोबत अलौकिक लावण्य लाभलेली दीपिका आणि जॉन अब्राहम झळकणार आहेत. यावेळी जॉन हा शाहरूखच्या विरुद्ध खलनायक रंगवतोय. सिद्धार्थ सांगतो, पठाण’मध्ये दीपिका तिच्या आजवरच्या सर्वाधिक आकर्षक अंदाजात दिसणार आहे. यापूर्वी प्रेक्षकांना कधीही न घडलेलं तिचं दिलखेच दर्शन घडणार आहे, जे त्यांच्या कायम स्मरणात राहील.

सिद्धार्थ सांगतो, “हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात बड्या सुपरस्टार समवेत दीपिका पदुकोण झळकणार आहे. आणि तिची पठाणमधली भूमिका निव्वळ हृदयाचा ठोका चुकविणारी नसून त्याहून बरंच काही आम्ही शब्दबद्ध केलंय हे आम्हाला ठाऊक आहे, तिच्या सुपरस्टारडमलाही न्याय मिळवून दिलाय हे कोणीही मान्य करेल. ती पठाणमध्ये पहिल्यांदाच हॉट आणि कूल अंदाजात दिसणार आहे.”

एसआरके आणि दीपिका ही भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासातील दिग्गज ऑन-स्क्रीन जोडी आहे, ज्यांनी ओम शांती ओमसारखा महान ब्लॉकबस्टर दिला. एसआरके आणि डीपी यांची स्पेनमधील छायाचित्र अलीकडे ‘लीक’ झाली आणि इंटरनेटवर गहजब झाला. या ग्लॅमरस जोडीने मेल्लोर्कात वेगळीच उंची असलेलं गाणं चित्रित केलं. त्यात एसआरके त्याच्या एट-पॅकमध्ये दिसला तर डीपी म्हणजेच दीपिका तिच्या परफेक्ट बिकिनी अंदाजात दिसली. त्यानंतर ही दोघं स्पेनच्या कॅडीझ आणि जेरेझ येथील चित्रीकरण पूर्ण करण्यासाठी रवाना झाले.

एसआरके आणि दीपिका यांच्या सुपर-हॉट जोडीविषयी सांगताना सिद्धार्थ म्हणाला, “दीपिका आणि शाहरूख यांची ऑन-स्क्रीन जोडी म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील एक भन्नाट जोडी आहे. त्यांनी पूर्वी अफाट यश कमाविले. पठाण’मध्ये एसआरके आणि डीपी अभूतपूर्व अवतारात दिसणार आहेत.”

तो पुढे म्हणतो, “त्यांची एकमेकांसोबतची केमिस्ट्री बेफाम आहे आणि ते एकत्र खूपच हॉट दिसतात. अशी जोडी क्वचितच जमून येते आणि ही जोडीच पठाण’करिता मोठा यूएसपी ठरेल.”

पठाण 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमीळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शनाकरिता सज्ज आहे.

Related posts

I‘द ग्रेट इंडियन फॅमिली हा आपल्या भारतीय संयुक्त कुटुंबांचा उत्सव आहे!’ : विकी कौशल

Shivani Shetty

ड्रीम गर्ल २ सोबत माझ्या करिअरची सर्वोत्तम ओपनिंग देताना आनंद , उत्साह वाटतोय!’ : आयुष्मान खुराना*

Shivani Shetty

सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती करण्यासाठी आयुष्मान खुरानाचे बिहार पोलिसांनी केले कौतुक!*

Shivani Shetty

Leave a Comment