maharashtraprimenews
ठळक बातम्या
प्रदर्शनमुंबईसार्वजनिक स्वारस्य

मल्‍टीव्‍हर्स ऑफ मुंबई: मुंबईच्‍या शहरी झोपडपट्टीमधील वंचित विद्यार्थ्‍यांनी त्‍यांच्‍या दृष्‍टीकोनातून मांडले शहराचे चित्र


यंदा बालदिनानिमित्त सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनकडून विशेष फोटोग्राफी प्रदर्शन

मुंबई, १५ ऑक्टोबर २०२२:फोटोग्राफ्सच्‍या माध्‍यमातून सांगितलेल्या दृश्य कथा अनेकदा शहराबाबत रोचक माहिती देतात. पण जेव्हा हे फोटोग्राफ्स समाजातील वंचित वर्गातील किशोरवयीन मुले काढतात तेव्‍हा त्‍या दृश्यांमध्ये काही अतिशय मार्मिक कथा असतात. सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या मीडिया अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे आयो‍जित केलेल्‍या फोटोग्राफी प्रदर्शनात द कोरम, मुंबई येथील प्रेक्षकांना हेच अनुभवायला मिळाले . हे प्रदर्शन १४ नोव्हेंबर २०२२ रोजी म्हणजेच बालदिनी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत आयोजित करण्‍यात आले होते

या प्रदर्शनाची थीम होती ‘मल्टीव्हर्स ऑफ मुंबई’- मुंबईच्या शहरी झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या दृष्टीकोनातून मॅक्झिमम सिटीची परिभाषा करणारे विरोधाभास आणि संधींच्या सूक्ष्म जगाचे प्रायोगिक प्रदर्शन. मीडिया अकॅडमी वार्षिक फोटोग्राफी प्रदर्शनाचे आयोजन करते आणि हे प्रदर्शन आमच्या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट प्रतिभेचे प्रतीक आहे. द शारी अकॅडमीचे दिग्गज गिरीश आणि हृदगंधा मिस्त्री यांचे मार्गदर्शन लाभलेल्या यावर्षीच्या प्रदर्शनाची थीम आमच्या विद्यार्थ्यांच्‍या शोधात्मक प्रवासाला सादर करते, जेथे ते त्यांच्या सभोवतालच्या आर्थिक, सामाजिक आणि अगदी भावनिक विरोधाभासांचे बारकावे टिपण्याचा प्रयत्न करतात.

सलाम बॉम्बे फाऊंडेशनमध्ये आम्ही मुंबईच्या शहरी झोपडपट्ट्यांमधील किशोरवयीन मुलांसोबत काम करतो आणि शहरातील अरुंद गल्लीत असलेले सर्वोत्तम टॅलेण्‍ट पाहून अचंबित होऊन जातो. प्रशिक्षणादरम्यान आमचे विद्यार्थी उत्कट व चिकाटीने मर्यादांना दूर करण्‍याचा आणि समृद्ध होण्‍याकरिता आपली इच्‍छा व्‍यक्‍त करण्‍याचा प्रयत्‍न करतात. मीडिया अकॅडमीच्या माध्यमातून सलाम बॉम्बे फाऊंडेशनमध्ये आम्ही फोटोग्राफीला त्यांचा निवडलेला व्यवसाय म्हणून स्वीकारू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची सुविधा देतो, ज्याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल. अकॅडमी सैद्धांतिक तसेच अनुभवात्मक शिक्षणावर लक्ष केंद्रित करते आणि हे स्वरूप त्यांच्या स्वप्नांना सत्यात बदलण्यास मदत करू शकते. आमच्या काही विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठित मीडिया संस्थांकडून लाखो रुपयांची शिष्यवृत्ती मिळवली आहे.

या प्रदर्शनाविषयी बोलताना सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या प्रकल्प (कला आणि मीडिया) उपाध्यक्षा राजश्री कदम म्हणाल्या, “आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अपवादात्मक प्रतिभा दाखवण्यासाठी द कोरम मुंबईसोबत सहयोगाने एक अविश्वसनीय व्यासपीठ उपलब्ध करून देताना आनंद होत आहे. आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅमेरावर्कद्वारे थीमचे सार इतक्या सुंदरपणे टिपण्यात मदत केल्याबद्दल आम्ही द शारी अकॅडमीचे आभारी आहोत. आमच्या विद्यार्थ्यांसाठी हे पहिले व्यावसायिक प्रदर्शन असल्याने आम्हाला आशा आहे की, ते या प्रदर्शनातून आणि आतापर्यंतच्या प्रवासातून खूप काही शिकतील.”

Related posts

कॉर्पोरेट ट्रॅव्हल बुकिंग व्यासपीठ पॅक्सेस संपूर्ण भारतात लॉन्चसाठी सज्ज

Shivani Shetty

मेलोराकडून ब्लॅक फ्रायडे सेलची सुरूवात

Shivani Shetty

३० मार्चला प्रदर्शित होणार ‘घर बंदूक बिरयानी’

Shivani Shetty

Leave a Comment