maharashtraprimenews
ठळक बातम्या
महाराष्ट्र

मॅडव्‍हर्स म्‍युझिकचे भारतातील प्रतिभावंतांना प्रोत्साहन

मुंबई, १२ ऑगस्ट २०२३: मॅडव्‍हर्स म्‍युझिक या इंडिपेंडन्‍ट आर्टिस्‍ट्ससाठी आघाडीच्‍या व्‍यासपीठाने आपल्‍या जागतिक समुदायामध्‍ये ८००० हून अधिक प्रतिभावान आर्टिस्‍ट्सना ऑनबोर्ड करत मोठा टप्‍पा गाठल्‍याची घोषणा केली आहे. संगीताच्‍या माध्‍यमातून देशाला एकत्र आणण्‍याच्‍या मिशनसह मॅडव्‍हर्स म्‍युझिक आर्टिस्‍ट्सना त्‍यांची प्रतिभा दाखवण्‍यासाठी आणि जगभरातील विविध प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्‍यासाठी एक-थांबा सोल्‍यूशन देते.

मॅडव्‍हर्स म्‍युझिकची भारतातील सर्व प्रमुख शहरांमध्‍ये उपस्थिती आहे. दिल्‍ली, मुंबई, बेंगळुरू, जयपूर, पुणे, लखनौ, अहमदाबाद, हैदराबाद, इंदौर व नागपूर या अव्‍वल १० शहरांमधील मोठ्या संख्‍येने आर्टिस्‍ट्स आहेत. या शहरांमधील प्रतिभावान आर्टिस्‍ट्स त्‍यांची कला दाखवत चाहत्‍यांसोबत दृढ नाते तयार करत आहे.

गल्‍लीबोळातील मुलांपासून सिक्रेट सुपरस्‍टार्सपर्यंत मॅडव्‍हर्स प्रत्‍येक कलाकाराला कोणत्‍याही अडथळ्यांशिवाय इंडस्ट्रीमध्‍ये अव्‍वलस्‍थानी पोहोचण्‍यासाठी आणि स्‍वत:ची स्‍वप्‍ने साकारण्‍यासाठी मंच प्रदान करत आहे.

मॅडव्‍हर्स म्‍युझिकचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रोहन नेशो जैन म्‍हणाले, “आम्‍हाला आमच्‍या प्‍लॅटफॉर्मवर ८००० हून अधिक आर्टिस्‍ट्स ऑनबोर्ड करण्‍याचा हा उल्‍लेखनीय टप्‍पा गाठण्‍याचा आनंद होत आहे. देशातील लहान शहरांमधील टॅलेंट पुढे येत असल्‍याचे पाहून अधिक आनंद होत आहे. मॅडव्‍हर्स म्‍युझिक स्‍वावलंबी आर्टिस्‍ट्सना त्‍यांची सर्जनशीलता दाखवण्‍यासाठी पाठिंबा व सर्वसमावेशक संधी देण्‍याप्रती कटिबद्ध आहे. जगाच्‍या कानाकोपऱ्यामधील प्रतिभावान आर्टिस्‍ट्सना एकत्र आणत आमचा सर्वोत्तम संस्‍कृती, संगीत शैली व कलात्‍मक अभिव्‍यक्‍ती निर्माण करण्‍याचा मनसुबा आहे, जे जागतिक स्‍तरावरील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतील.”

मॅडव्‍हर्स म्‍युझिकने झपाट्याने आपली पोहोच व उपस्थिती वाढवली आहे. सध्‍या भारत, व्हिएतनाम, इंडोनशिया, कोरिया, युके, यूएस, नायजेरिया व इतर देशांमधील २०० हून अधिक शहरांमध्‍ये कार्यरत आहे. आर्टिस्‍ट्सना सक्षम करण्‍याप्रती कटिबद्ध असलेल्‍या व्‍यासपीठाने जगभरातील विविध टॅलेंट्सचे लक्ष वेधून घेतले आहे, तसेच संगीतकारांच्‍या वैविध्‍यपूर्ण समुदायाला चालना देत आहे.

Related posts

कोका-इंडिया आणि अंजू बॉबी स्‍पोर्ट्स फाऊंडेशन यांच्‍यामधील दीर्घकालीन सहयोग महिला अॅथलीट्सना सक्षम करत आहे ~ कोका-कोला इंडिया सरावासाठी मोठे मैदान आणि दर्जात्‍म‍क

Shivani Shetty

अजित पवारांची फडणवीसांसोबत चर्चा; तर निरोपासाठी आलेल्या नार्वेकरांना शरद पवारांनी गाडीत बसवलं!

cradmin

स्‍प्राइटकडून आयसीसी मेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कपदरम्‍यान ‘थंड रख’ ब्रॅण्‍ड जाहिरातींचे अनावरण

Shivani Shetty

Leave a Comment