maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

ज्वेलरी सेव्हिंग मंच ‘प्लस’ने नवीन अॅप लॉन्च केले

मुंबई, १३ सप्टेंबर २०२३: दागिन्यांची खरेदी आणि बचतीच्या क्षेत्रामध्ये मोठा बदल घडवून आणत, प्लस या भारताच्या ज्वेलरी सेव्हिंग अॅपने आज आपल्या आयओएस व अँड्रॉइड उपकरणांवरील मोबाइल अॅप्लिकेशनची घोषणा केली. प्लसचा प्लॅटफॉर्म भारतातील गृहिणींना दागिने खरेदीसाठी पैशांची बचत करण्याची क्षमता देतो. त्याचप्रमाणे त्यांच्या गुंतवणूकीवर एक्सक्लुजिव १० टक्क्यांचा वार्षिक अंतर्गत परतावा दर देतो.

दागिन्यांच्या स्वरूपातील बचत बाजारपेठेमध्ये एक चाकोरीबाह्य सोल्यूशन पुरवत, प्लसने वापरकर्त्यांना एका अॅपद्वारे हजारो ज्वेलर्सचा शोध घेऊन त्यांच्या स्वप्नातील दागिने खरेदी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. २२ मे २०२२ रोजी राज परख आणि वीर मिश्रा यांच्याद्वारे समाविष्ट करण्यात आलेला हा नवोन्मेष्कारी प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना मासिक १००० रुपये एवढ्या कमी रकमेपासून एसआयपी पद्धतीने बचत सुरू करण्याची किंवा एकरकमी बचत करण्याची मुभा देतो. वापरकर्ते वार्षिक १० टक्के आयआरआरने त्यांच्या बचतीतील वाढीचा आनंदही घेऊ शकतात. त्यासोबतच वापरकर्त्यांना अत्यंत रोख स्वरूपातील बचतीचा लाभ असतो. ही बचत त्यांना गरज भासल्यास केवळ टी+२ दिवस (ट्रेड डेटनंतर २ दिवसांत) एवढ्या कालावधीत काढली जाऊ शकते.

प्लसचे संस्थापक वीर मिश्रा म्हणाले, “प्लसचे अॅप आणल्याची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हा भारतातील क्रांतिकारी अलंकार बचत प्लॅटफॉर्म आहे. अधिक चांगल्या संधींच्या माध्यमातून आमचा प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना, हजारो ज्वेलर्सचा विनासायास शोध घेऊन, अलंकार खरेदीची क्षमता देतो. शिवाय, पुढील मोठ्या खरेदीसाठी एक्सक्लुजिव सवलती उपलब्ध करून घेण्याची मुभाही देतो. आमचा प्लॅटफॉर्म सर्व ग्राहकांना सुलभता, पारदर्शकता व सुरक्षितता देतो आणि यामुळे भारतीय गृहिणींसाठी दागिन्यांकरता बचत करण्याच्या बाजारपेठेचे स्वरूपच बदलून जाणार आहे. दागिन्यांसाठी बचत अधिक सोपी, परवडण्याजोगी व सोयीस्कर होणार आहे.”

शिवाय, प्लसच्या अॅपवरून वापरकर्ते ज्वेलर्स शोधू शकतात, एका टॅपद्वारे व्हिजिट्स बुक करू शकतात आणि तत्काळ अलंकार खरेदीवर अनेक एक्सक्लुजिव सवलतीचे प्रस्ताव मिळवू शकतात. हा प्लॅटफॉर्म वापरून ऑफर्स अत्यंत सोप्या पद्धतीने शोधल्या जाऊ शकतात. त्याचप्रमाणे वापरकर्ते १० टक्के आयआरआरने जमवलेल्या बचतीद्वारे देशातील कोणत्याही दुकानात खरेदी करू शकतात. शिवाय, प्लसच्या अॅपवरील ज्वेलरी पार्टनर्स ग्राहकांना सणासुदीच्या काळात खरेदीसाठी देशभरात अत्यंत स्पर्धात्मक दरांना सोन्याची नाणी व बारही देऊ करतात.

Related posts

फिजिक्‍सवालाने युजीसी नेट २०२४ साठी ‘मिशन जेआरएफ’ सिरीज लाँच केली

Shivani Shetty

अॅबॉटच्‍या ‘हेल्‍दी लिव्हिंग: द रोल ऑफ व्हिटॅमिन सी’ सर्वेक्षणामधून निदर्शनास येते की, ३ पैकी २ ग्राहकांचा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्‍यासाठी व्हिटॅमिन सप्‍लीमेंट्सवर विश्‍वास आहे

Shivani Shetty

जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय, 24 नोव्हेंबरला घेऊन येत आहेत महाराष्ट्राच्या लाडक्या चित्रपटाचा सिक्वेल ‘झिम्मा2!’

Shivani Shetty

Leave a Comment